Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/501

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८४
लो० टिळकांचे केसरीतील लेख.

यांची माहिती गेल्या व आजच्या अंकांत आलेलीच आहे. इंग्लंड व अमेरिका यासारख्या देशांतील केवळ पैशाच्या पाठीमागे लागलेल्या माणसास देखील आपल्या चमत्कारिक योगशक्तीने वेदात व योग याच्या तरवाकडे नजर पोंच- विण्यास किंवा त्याचे मनन करण्यास स्वामीनी लावलेले आहे; व विलायतेंत लंडन व बर्मिंगहॅम येथे त्यांनी वेदाताच्या चर्चेसाठी कमिट्या स्थापन केल्या असून त्या कमि ट्याचे हल्ली बरेच सभासद झाले आहेत. स्वामीची अशी समजूत दिसते की, अशा रीतीनें वेदाताच्या खऱ्या ज्ञानाकडे मनुष्याची प्रवृत्ति झाली म्हणजे तो आपपर भेद मनात न आणतां गाजलेल्या लोकाशी सहानुभूति दाखवून गाजणाऱ्या विरुद्ध त्यास मदत करण्यास तयार होतो. विलायत किंवा अमेरिका या दोन्ही देशात अथवा सामा- न्यतः पाश्चिमात्य राष्ट्रात आमच्याबद्दल जर काहीं सहानुभूति उत्पन्न करावयाची असेल तर त्यास हाच राजमार्ग आहे, आणि या मार्गाने सत्याचा अधिक प्रसार होऊन आपले काम जितके अधिक वठेल तितके दुसऱ्या तन्देनें कधींही वठणार नाहीं. उदार बुद्धीचे पुरुष सर्व देशात कमीअधिक प्रमाणाने असावयाचे व असतात. परंतु गाजलेल्या लोकाबद्दल त्याची सहानुभूति उत्पन्न करण्यास सदर लोकाचे व त्याचे विचार कांहीं बाबतींत तरी एक असले पाहिजेत. अशा प्रकारचे विचार दोघांच्याही हिताचे सत्य म्हणून दोघांसही मान्य होणारे वेदांता खेरीज दुसरे ठिकाण सापडणें कठिण आहे. आधिभौतिक शास्त्राची अलीकडे जी झपाट्यानें वाढ होत आहे व परमेश्वर, आत्मा आणि जगत् या त्रिपुटीच्या स्वरूपाबद्दल सदर शास्त्रांच्या ज्या नव्या नव्या कल्पना प्रत्यहीं प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांत वेदाताच्या प्रसाराचे काम एरव्ही अवघड पडले असतें तें उत्तरोत्तर सुलभ होत चालले आहे. ख्रिस्तीधर्म हा काही तत्वज्ञानाच्या पायांवर रचलेला नाही, इतकेंच नव्हे तर सदर धर्माचे मूलभूत असे जे काही सिद्धात आहेत तेही आधिभौतिक शास्त्रांच्या तत्त्वांशीं बऱ्याच अंशीं विरुद्ध आहेत, असे तिकडील लोकाच्या नजरेस आले आहे. सुदैवानें वेदाताची गोष्ट अशी नाही. ज्या तत्वांच्या पायांवर वेदांताची इमारत उभारली आहे व जीं तत्त्वं कधीं युक्तीनें तर कधी दृष्टांतानें, कधीं श्रुतिबलाने तर कधी अभ्यास आणि वैराग्य याच्या साहाय्यामुळे एकाग्र केलेल्या मनाच्या प्रेरणेने आमच्या पूर्वजानीं सिद्ध केलेली आहेत; ती हल्लींच्या आधिभौतिक शास्त्रानेही सिद्ध होण्याचा प्रसंग अगदी नजीक येऊन ठेपला आहे, असें म्हटले तरी चालेल, आधिभौतिक शास्त्रज्ञांच्या तत्व- विचाराचे पर्यवसान अद्याप कायमचें झालेलें नाहीं, म्हणून वेदांताची तत्वे अमक्या एका विशिष्ट आधिभौतिक शास्त्राच्या तत्वाशी सध्याच्या स्थितीत तंतो- तंत मिळणार नाहींत, ही गोष्ट खरी आहे, परंतु त्यामुळे वेदाताच्या तत्वाची काहीं हानी होत नाहीं, आधिभौतिक पाश्चात्य शास्त्रज्ञाच्या तत्वविचाराची दिशा अलीकडे कशी पालटत आहे व तिचे धोरण काय आहे इकडेच सध्या आपणाला लक्ष पुरवावयाचे आहे; आणि तें धोरण काय है मिसेस स्टॅनई यांनी आपल्या दुसऱ्या