४८३
हल्ली X-ray नांवाच्या किरणांचा शोध लागून लोलकांतून पलीकडे जात नाहींत असेही काही किरण असल्याचे शास्त्ररीत्या ठरले आहे. हल्लीं N-ray नांवाचेही नवीन किरण सांपडले आहेत. ह्या प्रकाशशास्त्रातील शोधाप्रमाणेंच वर सांगित- लेला अध्यात्मविद्येतील शोध होय. जड शरीर म्हणजेच आत्मा तत्त्व खोटे ठरून, आत्म्याचें स्वतंत्र स्वरूप आणि मार्गे व पुढे असणारें अस्तित्व शास्त्रीय पद्धतीने ठरविण्यात आले आहे. हा सिद्धात बारीकसारीक क्षुद्र लोकाचा नसून तत्त्ववेत्त्यांचा व शास्त्रज्ञाचा आहे. हें आपण विसरता कामा नये ! तथापि पाश्चात्य पंडितानी प्रयोगाच्या साह्यानें जो सिद्धात दोन वर्षापूर्वी ठरविला, तोच सिद्धात हजारों वर्षांपूर्वी आमचे वेदात ग्रंथात नमूद होऊन राहिला होता. प्राचीन उप- निपत्कारानीं विचाराच्या जोरावर हेंच आत्म्याचें स्वरूप सागून ठेवले. पण नवीन शिक्षणानें मंडळीस हा वेदातांतील सिद्धात चुकीचा वाटून आमच्यातील पुष्कळ लोक पाश्चात्यानी तयार केलेली मतै जशींच्यातशीच ग्रहण करून जडवादी बनलेले आढळतात. नवीन लोक असे दुसन्याच्या ओंजळीनें पाणी पिणारे, तर जुने शास्त्री सनातन ग्रंथांवर हवाला देऊन स्वस्थ बसणारे ! दोघेही डबक्यात सांच- लेल्या पाण्याप्रमाणे आहेत. दोघाच्यादी ठिकाणी जिवंत झरा नाहीं. ज्या वेळीं युरोपीय जडवादाची मते इकडे आली त्या वेळी तीं खरी किंवा आपलीं वेदांतां- तलीं मतें खरी याबद्दल प्रयोग करून आपणासच याचा उलगडा करता आला नसता काय ? ह्या प्रयोगाना उपकरणसामुग्री तरी कांहीं विशेष लागत होती ? नरसोबाच्या वाडीस अंगांत होणारे भूतसचार किंवा अपस्माराचे रोगी थोडे सापड- तात काय ? कदाचित् आपलेकडे अशा लोकाचे प्रमाण वाजवीपेक्षा फाजीलच आहे ! तथापि ही शोधक बुद्धि आमच्यात उत्पन्न झालेली नाहीं. कोणताही सिद्धात शास्त्राच्या कसोटीस लावल्याशिवाय तो हल्लीच्या काळीं ग्राह्य होणे फारसें शक्य नाहीं. अशी शोधकबुद्धि बुद्धिदाता गजानन आपल्या हृदयात उत्पन्न करो, अशी माझी प्रार्थना आहे.
महात्मा अगभ्यगुरु याचे शिष्यत्व पत्करलेल्या मिसेस स्टॅनई यांनी गेल्या आठवड्यात येथे जीं तीन व्याख्याने दिली व स्वामींचे येथील बन्याच मंडळी- बरोबर जे बोलचालणे झाले, त्यावरून आमच्या शहरातील लोकाच्या मनात जर स्वामी विवक्षित अशा रीतीची जागृती उत्पन्न झाली तर त्यांच्या आगमनापासून आम्हांस पुष्कळ कायमचा फायदा झाला असें आम्हीं समजूं स्वामी अगम्यगुरु
*( केसरी, ता. २७ माहे फेब्रुवारी १९०६ ).