Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/499

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

?く* लो० टेिळकांचे केसरींतील लेख. ढिलें होऊन लोक नीतिभ्रष्ट होतील. यास्तव आत्म्याच्या अनस्तित्वाबरोबरच ( Maximum good of the maximum number ) * 3Ifàaga iìræII staसमूहाचे अतिशय मोठे कल्याण ’ हें तत्त्व सृष्टिशास्रवेत्त्यांस प्रसिद्ध करावें लागले. जणेकरून मनुष्यजातीचे कल्याण होईल ती नीति, अशी व्याख्या त्यास बनवावी लागली. तथापि खिस्ती-धर्मखाते व शास्त्रनिपुण विद्वान् लोक यांमध्यें वितुष्ट आलेंच: कारण, धर्मोपदेशक लोकास सयुक्तिक रीतीनें प्रमाणसिद्ध असें आत्म्याच्या अस्तित्वाचे माप शास्त्रीमंडळींच्या पदरात घालता येईना ! ते फक्त बायबलातील वाक्यावर बोट ठेवून, त्यात सांगितले म्हणून ‘ आत्मा ’ आहे, असे म्हणत ! पण हें बाबावाक्य शास्त्रवत्त्या मंडळीस कसें पटणार ? तथापि हा वाद येथेच थाबला नाहीं. खुद्ध शास्त्रज्ञमंडळीतच शंका निघू लागल्या तेव्हा या प्रश्नाचा कायमचा उलगडा करण्याच्या उद्देशानें इ. स. १८७३ या वर्षी महान् महान् शास्रकोविदांचे एक मंडळ स्थापन झाले. ह्या मंडळाचे मोठमोठे रसायनवेते व पदार्थविज्ञानवेते पंडित सभासद होते * सोसायटी ऑफ सायकेिकल रिसर्च ’ इं नांव धारण करून ह्या लोकानीं आत्म्याच्या निरनिराळ्या स्थितींत प्रयोग करण्यास सुरुवात केली. मनुष्य निद्रास्थितींत असता काय होतें, मरण येतें तें काय, अपस्माराच्या लहरींत मनुष्याच्या चैतन्यशक्तींत काय फेरफार होतात, वेड लागल्यानंतर जेो चित्तविभ्रम होतो त्याचे स्वरूप काय आहे, अंगांत भूतसंचार झाला असता एखाद्या मृत माणसाच्या इच्छेचा पगडा जिवंत माणसाच्या इच्छाशक्तीवर कसा बसतो,मेस्मेरिझमच्या योगानें एका मनुष्याच्या मनावर दुस-याचा अधिकार पूर्णत्वाने कसा चालतेो, दूर दूर रहात असणाच्या मनुष्याच्या चित्तवृत्तींत सुखदुःखाचा उद्भव एकाच काळी एकाच कारणास्तव त्यांच्या नकळत होतो, त्यात * आतरः कोऽपि हेतुः ’ असला पाहिजे, तो काय, इत्यादि अनेक प्रकारचे प्रयोग करून त्यावरून शास्त्रानुरोधार्ने अनुमानें ह्या मंडळीनें बसविलीं. ह्या सर्व शेोधांचे फळ म्हणून सदरहू मडळीचे वतीने मेयरसाहेबानें १९०३सालीं या विषयावर प्रमाणभूत असा एक मोठा ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला आहे. ह्या ग्रथात वर सागितलेल्या प्रत्येक प्रश्नासंबंधाने केलेले सर्व प्रयोग, त्याचे परिणाम व त्यावरून निघणारे सिद्धांत, इत्यादि सर्व माहिती संगतवार ग्रथित केली आहे. व त्या सगळ्याचा निष्कर्ष म्हणून ह्या पंडितानीं जो सिद्धान्त ठरविला तो हा कीं,“आत्मा हें जड सृष्टीच्यापेक्षां अत्यत भिन्न असें आदितत्त्व आहे, तें अविनाशीं आहे. तें सर्वव्यापी आहे, तें जड पदार्थाच्या मिश्रणाचे किंवा एकीकरणाचे फल नसून तें स्वतंत्र आहे.” याच सिद्धान्ताचा अनुवाद करणार दुसरेही ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. सूर्थाचे किरण काचेच्या लोलकातून पलीकडे दवडले असतां Spectrum म्हणजे किरणाचा एक पट्टा पडतो. त्यात सात प्रकारचे मूळ रंग Primary colours ) स्पष्ट दिसतात, त्यावरून बरेच दिवसपर्यंत प्रकाशशास्रवेत्त्यांची अशी समजूत होती कीं, सूर्यकिरण म्हणजे केवळ ह्या सात रंगांचे मि ण होय. पण