पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/497

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9 С, с लो० टिळकांचे केसरींतील लेख. श्रीहर्षाच्या सैन्याचा तळ गंगातटाकीं असतां श्रीहर्ष बौद्धांचा अभिमानी म्हणून एक माथेफिरू वेड्या ब्राह्मणानें त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता, व त्यामुळे काहीं दिवस राजाची ब्राह्मणांवर गैरमर्जीही झालेली होती. ही गोष्ट जर खरी असेल तर विद्वतेनें व गुप्ताच्या आश्रयानें लोकमान्यतेस चढलेले बाणाचे ब्राह्मण घराणेही श्रीहर्षाच्या गैरमर्जीत काही दिवस तरी असण्याचा संभव आहे. बाणाच्या तारुण्यात त्याच्या हातून गैरवर्तन झाले असावें व त्यास अनुलक्षून बाणाच्या प्रथम भटीच्या वेळी * महानयं भुजग: ? असें श्रीहर्ष बोलल्याचे बाणानेंच श्रीहर्षचरितात लिहिले आहे. भुजंग म्हणजे जार असा पाडुरंगशास्री अर्थ घेतात. पण त्यात यापेक्षा स्पष्टार्थ नाहीं तर व्यंगार्थ तरी जास्त असावा असें वाटतें. कसेंही असो; श्रीहर्षाच्या कारकीर्दीत ब्राह्मण पंडित व कवि यांस बौद्ध भिक्षूसारखाच आश्रय व सन्मान मिळत असे एवढी गोष्ट निर्विवाद आहे. बौद्धाच्यासबधानें दिवाकरामत्राचे उदाहरण आहेच; पण हुएनछंग याचाही मोठा मान ठेवून श्रीहर्ष त्याचा उपदेश भक्तीनें ऐकत असे, असे स्वत: हुएनछंगानच वर्णन केले आहे. श्रीहर्षाच्या पुढे कांहीं वर्षानी कुमारिल व शंकराचार्य हे उत्पन्न होऊन ही स्थिति पालटली आणि ब्राह्मण धर्माचे वर्चस्व पुनः स्थापन झालें, ही गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे. •••••••=*•••••

  • देह आणि आत्मा

मनुष्याचा जड देह व चैतन्यरूप आत्मा या दोन भिन्न भिन्न वस्तु आहेत, किंवा सृष्टीतील कांही विशिष्ट जड द्रव्ये अथवा तत्त्वें हीं एकच झाल्यानंतर होणारी चेतना हाच आत्मा होय. हा वाद पुरातन आहे. उपनिषदांत आत्म्याचे स्वरूप सांगितले आहे. तत्कालीन ऋषीच्या मतें आत्मा सर्वव्यापी व अविनाशी आहे आणि तो सृष्टींतील जड द्रव्यापासून अगदी भिन्न आहे. वेदान्तात या प्रश्नाचा विचार करीत असतां आत्म्याच्या भिन्नतेबद्दल प्रमाणे दिली आहेत. * युष्मदस्मत्प्रत्ययीभूत प्रमाण ’ हें पहिलें प्रमाण होय. आत्म्याचे देहाव्यतिरिक्त अस्तित्व तुमच्या आमच्या प्रत्ययास येतें. आपण * मी ’ शब्द उच्चारतों तेव्हां आपल्या अगचा कोणताही एक अवयव किवा सर्व अवयवांचा समुच्चय असा आपल्या बोलण्याचा अर्थ नसून शरीरव्यतिरिक्त असणारा शरीराचा स्वामी असा त्याचा अर्थ समजतो. देहापासून आत्म्याची भिन्नता दाखविणारे दुसरें प्रमाण * निद्राप्रमाण ’ हें होय. मनुष्य निजतेो तेव्हां सर्व शरीरव्यापार बंद पडतात. ( * केसरी, ता. १९-९-१९०५)