पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/496

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाणभट्ट आणि श्रीहर्ष. به فا في؟ बाणानें केलेल्या स्कंदगुप्ताच्या वर्णनांत * निजनृप वंशदीर्घ नासावंशं दधानः ? या लोकांबद्दल (तो नीट न समजता) जरी बाणाची थट्टा केली आहे तरी बाणाची वर्णन करण्याची शैली अपूर्व व जेोरदार आहे ही गोष्ट त्यांनी कबूल केली आहे. अशा प्रकारच्या वश्यवाणी कविचक्रवतींच्या भाषेर्ने हिंदुस्थानचा इतिहास लिहिला गेला नाहीं हें आमचे दुर्दैव होय. वे. सं. पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी याच्या हल्लींच्या निबंधावरून जे थेोडस ऐतिहासिक विचार सुचले ते वर दाखल केले आहेत. आतां खुद्द निबंधासंबंधानें एकदोन गोष्टींत असलेला मतभेद सरतेशेवटीं सागावयाचा तो सांगून हा लेख पुरा करितों. बाणभट्टाच्या नावावर मोडत असलेलें पार्वतीपरिणय नाटक कुमारसंभवावरूनच घेतलेले आहे, असें कै. विष्णुशास्री चिपळूणकर यांजप्रमाणें आमचेंही मत आहे. हें नाटक बाणकवीच्या कवित्वास शेोभत नाहीं, हे खरै आहे. पण श्रीहर्षाच्या दरबारांत लोकांच्या रंजनार्थ नागानेदासारखी नाटकें करीत असत तर तत्कालिन नाटकमंडळीच्या विनंतीवरून बाणार्ने कुमारसंभवाचेच नाटक करून दिले असेल, असेही म्हणता येईल. हल्लीच्या काळांत राजाज्ञेवरून बाणाच्या कादंबरीचेही नाटक झालेले आहे, हे लक्षांत आणलें म्हणजे पार्वतीपरिणयाची कल्पना आम्हांस काहीं असंभाव्य दिसत नाहीं. तसेच हालसाहेबानीं रत्नावलीतील व श्रीहर्षचरित्रातील एका ठीकाचें जें साम्य दारवविलें आहे तेंही आमच्या मतें बरोबर आहे. आता एके ठिकाणीं दैवाची अनुकूलता व दुस-या ठिकाणीं प्रतिकूलता वर्णिली आहे हे जरी खरी आहे तरी दैवाच्या साधनविषयक कल्पनेचे आणि पद्यरचनेचे साम्य कायम राहतें ते राहतेंच. हर्षचरित हा ग्रंथ कदाचित् अपुरा राहिला असावा असें पाडुरंगशास्री म्हणतात; पण तसा प्रकार झाल्याचें आम्हांस आढळून येत नाही. हर्षचरिताची जी टीका आहे त्यावरूनही हल्लींचा ग्रंथ पूर्ण आहे असे दिसून येतें. हर्ष व राजवर्धन या दोघा भावाचे राज्यश्रविर असलेल प्रेम, राज्यश्रीची दैवामुळे झालली विपन्नावस्था, संकटसमयी श्रीहर्षाकडून तिची अकल्पित सुटका, इत्यादि आख्यायिकेस अवश्य लागणाच्या गोष्टीपलीकडे हर्षचरित लिहिण्याचा बाणाचा उद्देश होता असें दिसत नाहीं. नाहीपेक्षां हुएनछंग यार्ने लिहिल्याप्रमाणें दक्षिणेत ज्यानें त्या वेळीं साम्राज्य स्थापन करून श्रीहर्षास नर्मदा उतरूं दिली नाहीं त्या सत्याश्रय पुलकशी राजाचाही हुएनछंगाप्रमाणे बाणाने उल्लेख केला असता. अथवा प्रयाग येथे दर पांच वर्षीनीं श्रीहर्ष आपली संपत्ति याग न करता लोकांस वांटी याचेही वर्णन या आख्यायिकेंत आले असतें. कादंबरीच्या प्रस्तावनेंत हर्षाचा उल्लेख नाहीं, गुप्ताचा आहे. यावरून गुप्तानीं आश्रय दिलेले ब्राह्मण विद्वानांचे घराणें श्रीहर्षाच्या राज्यांत पुष्कळ दिवस त्याच्या आश्रयावांचून पण चांगल्या स्थितीत होतें असे दिसून येतें. हुएनछग यानें असे लिहिले आहे कीं, ६०