पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/495

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


.लो० टिळकांचे केसरीतील लेख می و با ग्रंथ लिहिला जाऊं नये याचे आश्वर्य वाटतें. श्रीहर्षापूर्वीच्या सहाशें वर्षात हिंदुस्थानावर यवन, शक आणि हूण यांच्या तीनदा स्वाच्या होऊन त्यांच्या ताब्यांत बराच मुलुखही गेलेला होता. पण हिंदुस्थानांतील हिंदु राजांनीं तीनदां त्यांचा पराभव करून देशीं साम्राज्ये स्थापन केली आणि धमचिा अगर जातीचा अभिमान न धरतां बौद्ध, जेन किंबहुना यवन आणि हुएनछेगासारखे अगदीं परस्थ प्रवाशी यांसही समबुद्धीनें वागवून राज्यांत उत्तम बंदोबस्त ठेविला, व प्रजेच्या कल्याणाची अनेक उत्तम कार्मे केलीं, हा विषय केोणाच्याही बुद्धीस सहज स्फुरण आणणारा होता. बाणकवीच्या कवित्वास यामुळे स्फूर्ति मिळाली नाहीं असे नाही. पण हिंदुस्थानांतील एतद्देशीय शेवटला सार्वभैौम श्रीहर्ष याच्या आख्यायिकैत या ऐतिहासिक गोष्टींचा उल्लेख करण्यापेक्षां छेषादि चमत्कार करण्यांतच त्यास अधिक महत्त्व वाटलें. स्वदेशी सार्वभौम राजाचे वैभव किंवा कारकीर्द वर्णन करताना जर ही स्थिति तर जगन्नाथ पंडितानें * दिल्लीवल्लभ - पाणि पल्लवतले नीतं नवीनं वयः ? अशी फुशारकी मारल्यास किंवा गढवालचे पंडित श्रीउवादत्त यांनी हल्लींच्या बादशहावर * एडवर्डवंश ’ म्हणून रघुवेशासारखें काव्य करून प्रसिद्ध केल्यास त्यात नवल तें कोणतें ? देशी साम्राज्य आणि परदेशी साम्राज्य यात भद काय असतो याचे तत्त्व व अशा प्रकारच्या कवीस किंवा पंडेितास कळत नाहीं असे म्हणणे जरा साहसाचे आहे, पण वस्तुस्थिति पाहतां या पंडितास ऐतिहासिक वर्णन करण्याची गोडी नव्हती, अथवा कवित्वाच्या निदर्शनास हा विषय योग्य नाहीं असे त्यांचे मत होते असें म्हणणें भाग येतें. कसैही असो, हर्ष हा मोठा राजा होता; त्यानें अनेक राजे जिकले; बाणकवीस अपार संपत्ति दिली आणि आपला सर्व खजिना गोरगरिबांस वाटला, इत्यादि कांहीं ठरीव गोष्टखेिरीज हर्षचरितांत श्रीहर्षाच्या वेळच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची कांहीं माहिती मिळत नाहीं. कालिदासार्ने एकाच ठिकाणीं म्हणजे मालविकाग्निमित्रात जें ऐतिहासिक कथानक घेतले आहे तें श्रीहर्षाच्या कथानकांपक्षां ऐतिहासिकदृष्टया अधिक चांगलें साधलेले आहे; आणि त्यावरून बाणापेक्षां कालिदासाची ऐतिहासिक दृष्टि अधिक चांगली होती असे दिसतें. तथापि कालनिर्णयासंबंधानें दोघांचीही अनास्था आढळून येते. असो; या विषयांवर वर्तमानपत्राच्या एका लेखांत जास्त चर्चा होणें शक्य नाहीं. अशोक, विक्रमादित्य, श्रीहर्ष वगैरे नंदानंतर झालेल्या चक्रवर्ती राजांची कारकीर्द कशी होती, राज्यांत सुरक्षितपणा कसा होता, पशूकरताही तेव्हा दवाखाने कसे काढीत असत, किंवा कालवे अगर तलाव बाधून इरिगेशन खात्याचे काम कसे चालवीत, याबद्दल जी माहिती हल्लीं मिळाली आहे ती विशेषत: करून परदेशी प्रवाशांनी लिहिलेल्या ग्रंथांवरूनच उपलब्ध झाली आहे; व हल्लींचा एखादा इतिहासकार जर यावेळचे चित्र काढील तर तें हर्षचरितांपेक्षाही अधिक मनोरम वठेल. वर सांगितलेले इंग्लिश इतिहासकार मि. स्मिथ यांनीं