पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/494

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाणभट्ट आणि श्रीहर्ष. ?V9wó बाकीचे शरण आल्यावर त्यांस जीवदान दिलें किंवा क्षमा केली असा जो पांडुरंगशास्री यानीं तर्क केला आहे तो संभवनीय दिसतो, श्रीहर्षाचा दर्पशांत नांवाचा हत्ती मदोन्मत्त होऊन कुमार राजाच्या अंगांवर धांवून गेला असतां श्रीहर्षानें आपल्या तरवारीनें त्याचे निवारण करून हत्तीस रानांत घालवून दिलें, या कथेस अनुलक्षूनही एक लोक आहे. परंतु अशा प्रकारच्या छेषानें इतिहासाचे ज्ञान श्रीहर्षाच्या कालीं जरी हेोत असले तरी पुढे ती परंपरा कायम राहणें अशक्य होतें. सारांश, हुएनर्छग याच्या प्रवासाचे वर्णन जर आपणांस मिळाले नसते तर हे छेष समजले नसते इतर्केच नव्हे तर बाणानें वर्णन केलेला श्रीहर्ष सातव्या शतकातील चक्रवर्ति होता हें देखील समजण्याची मारामार पडली असती. बाणकवीचा उद्देश इतिहास लिहिण्यापेक्षां ऐतिहासिक कादंबरी किंवा आख्यायिका लिहिण्याचा होता असे मानले तरी तत्कालीन लोकास्थतीबद्दल छेषघटित विशेषणांत जी माहिती मिळते त्यापेक्षां अधिक माहिती मिळू नये ही मोठ्या आश्वयीचीच गोष्ट होय. या वेळीं बौद्धधमास श्रीहर्षाचा पुष्कळ आश्रय मिळाला होता. किंबहुना हर्षाचा भाऊ राज्यवर्धन बौद्धधर्मी असून श्रीहर्षानेंही पुढे त्याच धर्माचा स्वीकार केला होता. इटसिंग तर असे म्हणतो कीं, नागानंद हे नाटक श्रीहर्षाने बौद्धधमीचा स्वीकार केल्यावर लिहिलें; आणि जीमूतवाहनाचे सोंग स्वत: घेऊन राजा आपल्या नाटक मंडळीकडून त्याचा संगीतांत प्रयोग करवीत असे. बाणकवीस अशा प्रकारची माहिती आपल्या आख्यायिकॅत देणे काहीं अशक्य नव्हतें. तसेंच श्रीहर्ष आपणास कुमार म्हणवी, राजा म्हणवीत नसि असेद्दी ’ अत्रदेवेन नाभिषिक्तः कुमार: ' यावरून दिसून येतॆ. पण बाणकवीने त्याचा स्पष्ट उल्लेख कोठे केला नाहीं. ऐतिहासिक कादंबरी लिहिण्याची ही पद्धत हल्लीच्या काळात कोणासही पसंत पडेल असें वाटत नाहीं; विशेषेकरून आपल्या समकालीन किंबहुना पुरस्कत्र्या राजाची कथा सागताना तरी बाणानें इतिहासाकडे अधिक लक्ष द्यावथास पाहिजे होतें. पण तसा प्रकार घडला नाहीं. यावरून जुन्या महाकवींचे किंवा महापंडिताचे राजकीय विचार कसें असत याचे अनुमान होतें. बाणास इतिहासाची माहिती काहीं कमी होती असें नाही. गुप्तवंशाच्या राजानीं त्याच्या पूर्वजास आश्रय दिला होता असें त्यानींच कादंबरीच्या प्रस्तावनेंत सागितले आहे. तसेच गुप्त राजानंतरच्या किंवा पूर्वीच्या राजांनी किंवा राजकीय पुरुषांनीं जीं जीं विश्वासघाताचीं कृत्र्ये केलीं तीं स्कंदगुप्ताच्या तोडानें त्यानें हर्षचरितांत वदविलीं आहेत; व यापैकी ब-याच गोष्टी ऐतिहासिक आहेत याबद्दल आतां प्रत्यंतर पुरावा मिळालेला आहे. अशा ऐतिहासिक माहितीचा ज्याच्याजवळ संग्रह होता व सरस्वती वश असल्यानें ज्यास हर्षराजानें * वश्यवाणी कविचक्रवर्ति ’ अशी पदवी देऊन अपरिमित द्रव्य दिले होतें त्याच्या हातून स्वस्थपणें तत्कालीन अथवा पूर्वीच्या इतिहासावर आख्यायिकेपेक्षां अधिक तपसीलवार ऐतिहासिक