पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/492

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाणभट्ट आणि श्रीहर्ष. 9 \9 ادا स्थानच्या प्राचीन इतिहासाची ज्यास गोडी आहे त्यांनाही हें पुस्तक निदान एकवार तरी वाचण्यासारखें झाले आहे. रत्नावलि, प्रियदर्शिका, नागानंद वगैरे नाटकांचा कर्ता श्रीहर्ष याच्याच आश्रयास बाण कवि होता ही गोष्ट निर्विवाद असल्याबद्दल पांडुरंगशास्री यांनी जे पुरावे दिले आहेत ते, आणि भवभूती मयूर वगैरे कवीसंबंधानें मधून नधून जी माहिती दिली आहे ती निदान महारा . वाचकास तरी नवी, मनोरंजक, आणि बोधप्रद वाटेल यांत शंका नाही. साराश, बाणकवीचे चरित्र या नात्याने हा ग्रंथ वाचनीय झाला आहे. पुस्तकाचे बाह्याग हल्लीपेक्षा अधिक रम्य असतें तर दुधांत साखर पडती. पण ती गोष्ट शास्रीबुवाच्या हातची नव्हती. असो; वर सागितलेंच आहे की, आम्ही या ग्रंथाचे जें अभिनंदन करतें तें केवळ साहित्यदृष्टया नसून ऐतिहासिक दृष्टया होय. पांडुरंगशास्री यांनींच एके ठिकाणीं असे म्हटले आहे कीं, बाण-श्रीहर्षाच्या कालीं जिकड तिकडे पराक्रमाच्या चळवळी होत्या आणि त्यामुळे देशाचे स्वरूप आतांप्रमाणे शांत न दिसता कांही निराळेच दिसत होतें. हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासासंबंधीं ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. श्रीहर्ष राजा, ज्यास हर्षवर्धन किंवा नुसतें हर्ष असेही म्हणत, हा. स. ६०७ मध्यें गादीवर बसून सन ६४८ सांत मृत्यु पावला असें अलीकडील शोधावरून निश्चित झाले आहे. या वेळची हिंदुस्थानची किंवा उत्तर हिंदुस्थानची स्थिती फारच चमत्कारिक होती. ग्रीस देशातील प्रसिद्ध योद्धा अलेक्झाडर हा हिंदुस्थानावर स्वारी करून परत गेल्यानंतर त्याच्यामागें जे ग्रीक योद्धे झाले त्यांनी हिंदुस्थान आपल्या हस्तगत होण्याची खटपट केली होती. पण चंद्रगुप्तानें त्यांचा पराभव केल्यामुळे हिंदुस्थानात मौर्य राजाचे साम्राज्य स्थापन झाले आणि त्याच वंशांतील अशोकाच्या कारकीर्दीत सदर साम्राज्याच्या वैभवाची पराकाष्ठा होऊन बौद्धधर्मास उतजन मिळाले. मौर्य साम्राज्याचा पुढे शक नावाच्या परकी लोकांनी मोड केला; व कांहीं दिवस हिंदुस्थानांत या परकीय राजाचा अंमल चालू होता. कालिदासानें मालविकाग्निमित्रांत उल्लेख केलेल्या पुष्पमित्र, अग्निमित्र वगैरे राजांनीं या परकीयांचा मोड करून पुनः एकवार हिंदुसाम्राज्याची स्थापना केली. तथापि पुन्हा हूणाचे प्राबल्य होऊन उत्तर हिंदुस्थानचा पश्चिमेकडील बराच भाग त्यांच्या ताब्यांत गेला. परंतु गुप्तवंशांतील राजांनीं या परकीयांचा पराभव करून अशोकाच्याही पेक्षा अधिक विस्तीर्ण असें हिंदुसाम्राज्य स्थापन केलें. कालातरानें हेंही सामाज्य लयास जाऊन हूणाची सरशी होती की काय अशी भीति पडली. ही भीति ज्याच्या कारकीर्दीत नाहींशी झाली व ज्यानें पुन्हां हिंदुस्थानांत स्वदेशी साम्राज्याची स्थापना केली तोच हर्षचरितांत वर्णिलेला श्रीहर्ष होय. श्रीहर्षाचा बाप प्रभाकरवर्धन याचे वर्णन करतांना त्यास बाणानें ‘ हूण-हरिण-केसरी' असें विशेषण दिले आहे. प्रभाकरवर्धनास दोन