पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/491

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9V9? ली० टिळकांचे केसरींतील लेख. लक्षांत येण्याकरितां शास्रीबुवांनीं जे उतारे दिले आहेत तेही मार्मिकपणानें निवडले असून एकंदर बाणभट्टाच्या रसाळवाणीचा त्यामुळे थेोडाबहुत तरी अनुभव वाचकांस मिळण्यासारखा आहे. संस्कृत कवींपैकी विशेषत: करून गद्यग्रंथकारांपैकीं बाणभट्ट हा खरोखरच अग्रेसर आहे, अशा कविचा जितका होईल तितका महाराष्ट्र वाचकांस परिचय करून देणें हें संस्कृत कवितेचा अभ्यास करणारांचे कर्तव्य आहे; व तें कर्तव्य रा. पांडुरंगशास्री यानीं चांगल्या रीतीनें बजावलें आहे, असें म्हणण्यास आम्हास बिलकूल हरकत वाटत नाहीं, तथापि पांडुरंगशास्री यांनीं हल्ली जे बाणभट्टाचे चरित्र लिहिलें त्याबद्दल त्याचे आम्ही आभिनंदन करतों तें केवळ वरील कारणाकरितां नव्हे. बाणभट्टाची कवि या नात्यानें योग्यता किती होती याचे कै. विष्णुशास्री चिपळूणकर यानी आपल्या बाणकवीवरच्या निबंधांत चांगलें प्रतिपादन केलेले आहे; परंतु निबंधमालाकारांच्या वेळेस बाणभट्टाबद्दल जी माहिती उपलब्ध होती ती हल्लींच्यापेक्षा फारच कमी होती. हर्षचरित हा ग्रंथ त्या वेळेस नुकताच सांपडला होता; आणि बौद्धधर्मी चिनी यात्रेकरू हुएनछंग यानें आपल्या प्रवासवर्णनांत श्रीहर्षाचा उल्लेख केला आहे; असें जरी माहीत होतें तरी श्रीहर्ष राजाबद्दल जी एकंदर माहिती आज सर्वोस उपलब्ध झाली आहे तशी त्या वेळेस उपलब्ध नव्हती. यामुळे बाणभट्ट इ, स. ६५० च्या सुमारास हयात होता यापलीकडे विष्णुशास्री यांच्या निबंधांत विशेष कांहीं ऐतिहासिक माहिती दिलेली नाहीं. * हर्षचरित ? तर आम्हीं पाहिले नाही असे विष्णुशास्री यांनी आपल्या निबंधांतच लिहिलेले आहे. अर्थात् कै. विष्णुशास्री याचा निबंध केवळ बाणभट्टाच्या कादंबरी ग्रंथावरच आहे, असे म्हटलें तरी चालेल. पांडुरेगशास्री यांचा प्रस्तुतचा निबंध कादंबरी आणि हर्षचरितच नव्हे तर चिनी प्रवासी हुएनछंग याचे ग्रंथ आणि शिलालेख व ताम्रपट वगैरे साधनांनीं उपलब्ध झालेली माहिती यावरून लिहिलेला आहे; व त्यांत निदान महाराष्ट्र वाचकास तरी पुष्कळच नवी ऐतिहासिक माहिती मिळण्यासारखी आहे. मुसलमान लोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी या देशाची स्थिती कशी होती हें ध्यानांत येण्यास ही ऐतिहासिक माहिती फारच उपयेोगी आहे; आणि याच दृष्टीनें पांडुरंगशास्री यांचे हा निबंध लिहिल्याबद्दल आम्ही अभिनंदन करितीं. इंग्रजी वाचकांस ही माहिती भिन्न भिन्न ठिकाणीं किंवा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्मिथसाहेबांच्या हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासांत मिळण्यासारखी आहे. पण मराठींत आजपर्यंत ती कोणीही एकत्र केलेली नव्हती; इतकेंच नव्हे तर इंग्रजीतही बाणभट्टाचे कवि या नात्यानें, आणि श्रीहर्षाचे इसवी सनाच्या सातव्या शतकांतील एक प्रसिद्ध चक्रवर्ती या नात्यानें एकत्र वर्णन केलेलें आमचे पाहाण्यांत नाहीं. ही उणीव पांडुरंगशास्री यांच्या प्रस्तुतच्या बाणभट्टाच्या चरित्रानें दूर झाली आहे; आणि संस्कृत शिकणाच्या शाळेतील व कॉलेजांतील विद्याथ्यानचि नव्हे, तर हिंदु