पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/490

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाणभट्ट आणि श्रीहर्ष. ४७३ ग्रंथाची एक शुद्ध संस्कृत प्रत छापून निघावी. हें काम करण्यास रा. बं वैद्य यांच्यासारखे दुसरे योग्य गृहस्थ मिळणें कठीण आहे. करितां त्यांस शेवटची आमची अशी विनेति आहे कीं, हा ग्रंथ संक्षिप्त करून व त्याचे ऐतिहासिक परिक्षण करून लोकप्रिय करण्याचे श्रेय ज्याप्रमाणे त्यानीं संपादिले, त्याचप्रमाणे या विस्तृत ग्रंथाची अनेक प्रतींवरून तपासून शूद्ध केलेली प्रत त्यानीं तयार करावी आणि हल्लीच्या काळांत प्रमाणभूत मानली जाईल अशी महाभारताची प्रत तयार करून ती आपल्या देशबाधवास नजर केल्याच श्रेय नीलकंठ चतुर्धराप्रमाणे संपादार्वे. या कृत्यास राजाश्रय व लोकाश्रय बराच पाहिजे हें खरे आहूँ. पण रा. ब. वैद्य यांच्यासारखे गृहस्थ पुढे सरसावल्यास तो मिळण्याची पचाईत पडेल असें आम्हांस वाटत नाहीं. असेो; पुन्हा एकदां रा ब. वैद्य याचे हल्लींच्या पुस्तकाबद्दल अभिनंदन करून भारतातील ही लेखमाला संपवितों. कित्येकास ही कदाचित् कंटाळवाणी वाटली असेल पण चर्चेचे मुद्दे कांहीं शास्त्रीय व कांहीं साहित्य विषयक असल्यामुळे आणि वर्तमानपत्रांतील लेख संक्षिप्त रीतीनें लिहिणें जरूर असल्यामुळे ही अडचण सर्वोशीं दूर होणें बहुतेक दुरापास्त होतै; व त्याबद्दल आमचे वाचकही आम्हांवर रागावणार नाहीत अशी आम्हास उमद आहे.

  • बाणभट्ट आणि श्रीहर्ष.

वे. सं. रा. रा. पांडुरंग गोविंदशास्री पारखी यानी अनेक इंग्रजी ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट व संस्कृत ग्रंथ यांच्या आधारें लिहून नुकताच प्रसिद्ध केलेला :संस्कृत कवि बाणभट्ट याजवरील निबंध आभिप्रायार्थ आमच्याकडे आलेला आहे. रा. पांडुरंगशास्री पारखी हे कादंबरीसार, मित्रचंद्र, षड्रिपुवर्णन, कृष्णाकुमारी, बोधामृत, हंसिका वगैरे अनेक गद्यात्मक किंवा पद्यात्मकं महाराष्ट्र ग्रंथाचे कर्ते असल्यामुळे त्याच्या भाषासरणीचा महाराष्ट्र वाचकास बराच परिचय झालेला आहे. आणि कादंबरीसार ग्रंथावरून बाणभट्टाच्या ग्रंथाचेही त्यानीं चागले परेिशीलन केले आहे हें व्यक्त होते. मराठींत किंवा संस्कृतात सुबोध व सरस पद्य[चना करण्याची हातोटी यांना चागली साधली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांची गद्यरचनाही तशाच प्रकारची शुद्ध आणि प्रौढ असते, हे त्याचा कोणताही गद्यग्रंथ पाहिला असतां सहज कळून येणार आहे. तेव्हा प्रस्तुतच्या बाणभट्टावरील नबंधांत हे गुण चांगल्या प्रकारें आढळून येतात. आणि त्यामुळे त्यांनी लिहिलेले बाणभट्टाचे चरित्र मनोवेधक झाले आहे हे निराळे सागावयांस नको. तसेच बाणभट्टप्लव्या कादंबरी आणि श्रीहर्षचरित या दोन्ही ग्रंथातून कवीची योग्यता वाचकाच्या

  • ( केसरी, ता. २५ जुलई १९०५ ).