Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ लो० टिळकांचे केसरींतील लेख व दुस-याला गुलाम अशा संज्ञा देणें न्याय्य आहे. पण आमच्या घरीं अगदीं उलट स्थिति आहे. साहेबलोक ज्यांना गुलाम म्हणतात त्या स्वामिनी आहेत व ज्यांना ते स्वामी म्हणतात ते त्यांचे बंदे गुलाम आहेत ! बायकांच्या पायांत आम्हीं बिडी घातली आहे असें नाहीं, तर त्या आम्हांस सव्वामणाच्या जड बिडीसारख्या होऊन गेल्यामुळे आमचे पाय हालेनातसे झाले आहेत. अथवा आम्ही बायकांचे किंवा बायका आमच्या गुलाम हाच वाद बरोबर नाहीं. आम्ही-आमच्या बायकाआमच्या बहिणी, मुली-मुलें-आम्ही सारे केस पिकलेल्या अनादिसिद्ध पुराण लोकरूढीरूप जगदंबेंचे अतिलीन गुलाम आहीं ! तिचे उग्र स्वरूप डोळे उघडून न्याहाळण्याचे धैर्य आम्हास होत नाहीं ! ही महिषासुरमथनी भारलेल्या जंतूंप्रमाणे आम्हांस वागवीत आहे व आम्ही वागत आहॅौ ! तेव्हा आम्ही आपल्या बायकांस गुलामांप्रमाणे वागवितो, हा साहेबलोकाकडून आम्हांवर होत असलेला आरोप माझ्यामतें अगदीं निराधार आहे ! आता दुसरा प्रश्न असा आहे कीं, अमुक प्रकारची गृहस्थिति असली तरच अमुक प्रकारची राजकीय स्थिति प्राप्त होईल, नाहीतर व्हावयाची नाहीं-हें जें कित्येकाचे म्हणणें आहे तें इतिहासावरून सिद्ध होत नाही. शिवाजीनें मराठ्याच्या राज्याची स्थापना केली; पेशव्यांनीं गंगेत व सिंधूत दक्षणी तट्टे नाहवून अटकेस भगवा झेंडा फडकविला, तो काय हायस्कुलात जाऊन चवथी इयत्ता शिकणा-या मुलीच्या जेोरावर ? शिवाजी, महादाजी शिंदा, थोरला बाजीराव-हे काय पचविसावे वर्षी लग्न केलेल्या मुलींच्या पोर्टी झाले होते ? त्यावेळेस शूद्रब्राह्मणाची ताटे काय एके ठिकाणीं होतीं ? का त्या वेळेस सती हा शब्द कोणास ऐकूनसुद्धां ठाऊक नव्हता ? कांहीं नाहीं. आतापेक्षां त्यावळची गृहस्थिति विशेष चागली होती असे मानण्यास कांही आधार नाहीं. शिवाजीच्या पूर्वीचा काळ घेतला तरी तेंच दिसून येईल. सातव्या शतकांतील हर्षवर्धन आणि पुलकेशी राजांच्या कारकीर्दीविषयीं जी माहिती उपलब्ध आहे तीवरून त्या वेळेस ह्या देशाची राजकीय स्थिति जरी समाधान मानण्यासारखी होती तरी त्या वेळच्या लोकाची गृहस्थिति आतापेक्षा विशेष बरी होती, असे मानण्यास काहीं आधार नाहीं. आतां कोणी असे म्हणतील, की हें हिंदुस्थानचे उदाहरण काही कामाचे नाहीं. येथला खरा इतिहास सांपडण्याचे साधन नाहीं; सबब ज्या देशाचा खरा इतिहास उपलब्ध आहे त्याचे उदाहरण घेतले पाहिजे. कबूल आहे. अशा प्रकारचा इतिहास इंग्लंडच्या इतिहासाहून दुसरा कोणता आहे ? पण त्या इतिहासावरून सुद्धां देशांतील लोकाची अमुक प्रकारची गृहस्थिति असेल तरच अमुक प्रकारची राजकीय स्थिति असू शकते, हें जें कित्येकांचे म्हणणे आहे तें सिद्ध होत नाही. सतराव्या शतकांत राजकीयसंबंधानें इंग्लिश लोकांचे पाऊल पुष्कळच पुढे पडलें. टयूडर घराण्यांतील राजेराण्याचा जारी अंमल संपल्याबरोबर हक्क मागण्याची जी टीका लोकानीं एकदां हाती धरली ती शंभर वर्षेपर्यंत खालीं ठेविली नाहीं. राजांचे वर्चस्व कमी करून लोकाचे इक्क निश्चित करण्यासाठी एका राजाला