पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/489

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७२ लो० टिळकांचे केसरींतील लेख. यांच्या सरकशींतील घोड्यावर कसरत करणारा इसम ज्याप्रमाणे एकावर एक जाकिटें घालून येतेो, त्याप्रमाणें द्रौपदीही एकावर एक अशा साङथा नेसून आली होती असे म्हणणारे लोक केवळ नास्तिक नव्हे तर अरसिक आणि मूर्ख आहेत, असे आम्ही समजतों !रा.ब. वैद्य यांनी यासंबंधाने जेो शरा दिला आहे तो फार मार्मिक आहे. सन्मार्गानें वागणा-या मनुष्यास आपत्काली भगवंताचे अकल्पित कसे साहाय्य मिळते, याचे द्रौपदीवस्रहरण हैं एक महत्वाचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवून हिंदुधर्मातील अनेक साधुपुरुषानीं धैर्याने व भक्तिभावाने आपला आयुष्यक्रम कंठिलेला आहे; व भारतधर्मातील सर्व लोकास या उदाहरणावरून आज हजारों वर्षे समाधान व भरवसा वाटत आलेला आहे. हे समाधान हा भरवसा आणि हा आधार आधुनिक शास्राच्या मदतीनें तोडून टाकण्यास प्रवृत्त होणें हैं अत्यंत साहसाचे काम होय. अवतारी पुरुषाच्या किंवा भगवंताच्या कृपेनें काय होईल व काय नाहीं याचा नीट निर्णय अद्याप तरी कोठे लागला आहे ? थि अॅीसफेिस्ट अशा प्रकारच्या पुष्कळ गोष्टी गुह्य विद्येनें शक्य आहेत असे म्हणतात व त्याबद्दल शास्रीय पुरावाही देतात. कसेंही असेो एवढी गोष्ट खरी आहे की, अशा प्रकारचे जे मोठे मोठे महाभारतात प्रसंग आहेत ते जशाचे तसेच देणें हैं आमचे कर्तव्य आहे. काही थोड्या किरकोळ गोष्टी सोडून रा. ब. वैद्य यानी आपल्या ग्रंथात हाच मार्ग स्वीकारला आहे व याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आम्ही आभनंदन करती. असे. महाभारतासारख्या विस्तीर्ण, राष्ट्रीय ग्रंथावर जितकें लिहांव तितकें थोडेच आहे. याला बाजू व दिशा अनेक आहेत व त्या सर्व दिशानीं भारतवासी हिंदु लोकाच्या राष्ट्रीयत्वाचे तो परिपोषण करीत आहे. अशा ग्रंथाचे परिशीलन करण्याचा प्रसंग गेले एक दोन महिने रा. ब. वैद्य यानीं आणून दिला याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतों. चिंतामणरावजीस आमची अशी सूचना आहे कीं, त्यानीं आरंभिलेलें कार्य आपल्या फुरसतीचे वेळात जितकें लवकर होईल तितकें पुर करावें. भारताप्रमाणेंच रामायणावरही एक लहानसा ग्रंथ लिहिण्याचा त्याचा विचार आहे. हा ग्रंथ लवकरच प्रसिद्ध व्हावा इतकंच नव्हे तर दोन्ही ग्रंथाची मराठीत भाषांतरै होऊन तीं मराठी वाचकांच्या हातात पडण्याची लवकर तजवीज करावी अशी रा. ब. वैद्य यास आमची सूचना आहे. त्याचप्रमाणें संस्कृत, महाभारत ग्रथाचीही एक शुद्ध प्रत अनेक प्रातांतील प्रतीशीं ताडून पाहिललीं प्रसिद्ध होणें जरूर आहे. ऋग्वेदासंबंधाचे हें काम प्रेो. मॅक्समूलर यांनी केलेले आहे व दुस-या युरोपियन पंडितानी दुसरे वैदिक ग्रंथही अशाच प्रकारें छापून काढले आहेत. वैदिक प्रथानतर हिंदु लोकाच्या धार्मिक वाङ्मयांत महत्त्वाचा ग्रंथ म्हटला म्हणजे महाभारत हा होय. यास पाचवा वेदच समजतात. अशा प्रकारचा ग्रंथ नुसता छापून काढणे हेच मोठ्या खर्चाचे व श्रमाचे काम होते पण हें काम झाले आहे. राहिली गोष्ट एवढीच कीं, नवीन पद्धतीनें शेोध करून या सर्वमान्य राष्ट्रीय