पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/488

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मेहाभारतं, ४७१ नर आणि नारायण यांचे जें सारखें महत्त्व कित्येक ठिकाणीं गाइलें जातें त्यांतील बीज हेंच होय. धर्म, राजनीति, व्यवहारचातुर्य आणि बाहुबल यांचा समागम असणे किती जरूर आहे, आणि तसा समागम घडला असता कोणतें देशकार्य होतें हें महाभारतावरून शिकण्यासारखें आहे. महाभारतांतील योद्धे किंवा मुत्सद्दी यांनीं निरनिराळ्या प्रसंगी काढलेले उद्गार किंवा केलेलें वर्तन अनेक प्रसंगीं व्यक्तिश: अनुकरणीय किंवा बोधप्रद आहे यांत शंका नाहीं. पण या व्यक्तीदृष्टीपलीकडे जाऊन धर्मदृष्टया किंवा राजदृष्टया विचार केला तरीही महाभारतापासून आम्ही पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. किंबहुना आम्हा भारतधर्मीयांच्या राष्ट्रीयत्वाचा हा ग्रंथ आज हजारों वर्षे आधारभूत होऊन आमच्याठायीं उन्नतीची तत्त्वें जागृत करण्यास कारणीभूत झालेला आहे. भारतग्रंथाचा जेो काल आम्ही ठरविला आहे तो बुद्धाच्या जन्मानंतरचा आहे. अर्थात् त्याकालीं बौद्ध धर्माच्या उत्कर्षामुळे भारतधर्मास ग्लानी येण्याचा संभव होता; तेव्हां तसा प्रकार घडू नये म्हणून तत्कालीन थोर पुरुषांनीं पूर्वापार चालत आलेलें श्रीकृष्णाचे व पांडवांचे चरित्र एकल करून हल्लीं महाभारत ग्रंथाचे जे स्वरूप आहे ते त्यास दिले असावे, असा कित्येकांचा तर्क आहे. कसैही असो; एवढी गोष्ट निर्विवाद आहे कीं, केवळ इतिहासदृष्टया नव्हे तर धर्मदृष्टयाही भारताचे अतिशय महत्त्व असून या दृष्टीनें त्याचा स्वतंत्र विचार झाला पाहिजे. रा. ब. वैद्य हे पुढे प्रसिद्ध होणाया तिसया भागांत याबद्दल जास्त विचार करणार आहेत. पण हल्लीं प्रसिद्ध केलल्या ग्रंथांतही हैं धोरण कित्येक ठिकाणीं त्यांनीं अधिक लक्षात ठेवावयास पाहिजे होतें. हल्लींच्या ग्रंथाच्या दुस-या भागात त्यानीं पाडवांची जी संक्षिप्त कथा दिलेली आहे ती फारच मार्मिक रीतीनें दिलेली आहे, असें मार्गे आम्ही सागितलेंन्व आहे. साहित्यशास्त्राच्या दृष्टीनें काव्यातील चटकदार प्रसंग सांगण्याची हातोटी रा. वैद्य यास चागली साधली आहे यात शंका नाहीं; व रामायणावर ते जेो हल्लींच्या ग्रंथा प्रमाणें ग्रंथ लिहिणार आहेत तोही असाच वठेल अशी आम्हांस उमेद आहे. राम आणि कृष्ण हे दोघेही अवतारी पुरुष असून हिंदुस्थानच्या भावी उत्कर्षास त्यांच्या चरित्राचे परिशीलन अत्यत आवश्यक आहे, असेही रा. ब. वैद्य यांचे मत आहे, असे दिसून येतें. किंबहुना इल्लींचा ग्रंथ लिहिण्याचा त्यांचा हेतुही तोच असावा असे म्हणण्यास हरकत नाहीं, अशा प्रकारच्या ग्रंथात रामचंद्राच्या किंवा श्रीकृष्णाच्या चरित्रांतील अद्भत गोष्टींचे जेव्हां वर्णन येतें. तेव्हा त्यास आधुनिक शास्रीयपद्धतीनें एखादे उष्णतापापक यंत्र लावून त्याची किती शहानिशा करावी, हा एक मोठा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, द्रौपदीवस्रहरणाचीच गोष्ट ध्या. कौरवसभेत झालेला हा चमत्कार भगवंताच्या कृपेनें घडलेला नसून, आगाऊ बातमी कळल्यामुळे, प्रेो. छत्रे ५९