पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/487

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9w9 о लो० टिळकांचे केसरींतील लेख. अनेक लाटा उसळत असून त्यांपैकी एका ठिकाणची लाट एकदां उंच तर दुस-यावेळीं दुस-या ठिकाणची लाट उंच गेलेली जशी दृष्टीस पडते, तद्वत् भारत धर्मानुसारी लोकांच्या महासागरावर निरनिराळ्या प्रांतातील राजांच्या लहानमोठ्या लाटा भारतकालीं उसळलेल्या नजरेस येत. अशा परिस्थितर्ति राष्ट्रांतील पुढारी पुरुषाचे कर्तव्य हल्ली राष्ट्राच्या पुढाच्यांचे जें आपण कर्तव्य समजतो त्याहून फार भिन्न होतें. निरनिराळ्या धमांचे किंवा निरनिराळ्या रंगाचे लोक त्यास एक करावयाचे नव्हते. हिंदुस्थानचे मुळचे रहिवासी जे अनार्य लोक त्यांचा या पूर्वीच हिंदुधर्मातील चातुर्वण्यात समावेश झालेला होता; आणि उत्तरेकडून हिंदुस्थानांत आलेले जे आर्य लोक त्याच्याशीं याचा शरीरसंबंध होऊन दोघांच्या संमेलनार्ने एक प्रकारचे नवीनच राष्ट्र तयार झाले होतें. किंवा या लोकावर अथवा या लोकांच्या देशावर बाहेरून कोणी परधर्मी राजा येऊन रुवारी करील अशी कोणासही शंका येण्याचे कारण नव्हर्ते व भीतिही नव्हती. अर्थात् स्वधर्म रक्षण आणि देशांत आपल्याच धमचेि जर कोणी दुष्ट पुरुष किंवा राजे उत्पन्न झाले तर त्याचा क्षय करून पुन्हा धार्मिक व सामाजिक निबंध पूर्ववत् करून लोकास सुखी ठेवावें, एवढाच काय तो त्या वेळचा पुरुषार्थ होता. हा पुरुषार्थ श्रीकृष्णाने किंवा पाडवानीं कसा बजावला, हें महाभारतावरून पूर्णपणे समजून येणार आहे. * परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता । ’ असें जे अवतार घेण्याचे प्रयोजन भगवंतानीं सागितले आहे त्याच्या शब्दार्थाचा खुलासाही वर सागितलेल्या दृष्टीनें चागला करता येतेो. श्रीकृष्णानीं अशा रीतीनें जें अवतारकृत्य केले त्याचा थोडासा उल्लेख रा. ब, वैद्य याच्या हल्लीच्या ग्रथात आलेला आहे. पण त्याबद्दल जितका खुलासा व्हावयास पाहिजे होता तितका झालेला दिसत नाहीं. कदाचित् हा खुलासा रा. ब. वैद्य आपल्या प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे पुढे प्रसिद्ध होणाच्या भागांत व्हावयाचा असेल. असे असल्यास ठीकच आहे. नाहीपेक्षा महाभारताच्या महत्त्वासंबधीं लिहिताना अशा दृष्टीनें सदर ग्रंथाचा त्यानीं अवश्य विचार करावा असें त्यांस आम्हीं सुचवितो. श्रीकृष्णाच्या चरित्राखेरीज भारताची पूर्तता होत नाहीं, असे त्यानी एके ठिकाणीं म्हटलेलेच आहे; व हरिवंश भारतात धरावा लागती याचेही कारण हेंच आहे असें त्यांनी म्हटले आहे. कैौरवपांडवाचे युद्ध हा महाभारतातील मुख्य विषय खरा; व तें युद्ध होण्यास कौरवाचा दुष्टपणा आणि पांडवांचा छळ हीं कारणें झालीं हेंही खरें. पण कौरवपांडवाचे युद्ध हा श्रीकृष्णाच्या चरित्नांतील एक भाग आहे, किंबहुना या इतिहासाचा तो एक चालक आहे. आणि हा इतिहास अशा रीतीने घडवून आणण्यांत त्याचा काहीं हेतु होता हेंही आपण विसरता कामा नये. श्रीकृष्णाचें पांडवांस साहाय्य नसतें तर पांडवास जय मिळाला असता किंवा नाहीं याची शंकाच आहे. आणि जरासंधवधादिक कृष्णावतारांतील जीं कांहीं कृत्यें तीं भीमार्जुनांच्या साहाय्याखेरीज घडलीं नसतीं.