पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/486

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ४६९ लोकांपैकीं अधिकारी पुरुषांचे शील आणि चारित्र्य यांचे वर्णन करण्याचे कामीं या ग्रंथाचा उपयोग होत आलेला आहे. आज शेवटच्या लेखांत महाभारता. संबंधानें आम्ही जे दोन शब्द लिहिणार आहों ते याच दृष्टीनें होत. ग्रंथ कसा झाला, कोणी केला, केव्हां लिहिला वगैरे प्रश्न ऐतिहासिक दृष्टया किंवा आधुनिक विद्वानांच्या चिकित्सक दृष्टीनें महत्त्वाचे असतील किंवा आहेत हें आम्हीं कबूल करितों; परंतु महाभारतासारख्या ग्रंथाने बजावलेली राष्ट्रीय कामगिरी जेव्हा पहावयाची असेल तेव्हां वरच्यासारखे कालगणनेच प्रश्न गौण समजले जातात. इतकेंच नव्हे तर ही कामगिरी मोजताना कालाचे माप जवळ नसले तरीही काहीं अडत नाहीं. दोन्ही दृष्टि अगदी वेगळ्या आहेत; आणि या वेगळ्या दृष्टींचे आज थोडे दिग्दर्शन करून हा लेख आम्ही संपविणार आही. महाभारताच्या वेळी असलेली भारतवर्षाची स्थिति सध्यांच्या स्थितीहून अत्यंत भिन्न होती. शक किंवा म्लेछ राजे यांनी भारतीय युद्धात कोणत्या तरी एका पक्षास साहाय्य केल्याचे भारतात वर्णन आहे. पण या अवैदिक-धर्मी राजाचा हिंदुस्थानच्या कोणत्याही भागावर त्या वेळीं अमल चालू झाला नव्हता. वैदिकधर्म, भारतधर्म, ब्राह्मणधर्म अथवा हिंदुधर्म त्यास कोणतेंही नांव द्यायाचेच त्या वेळीं आसेतुहिमाचलापर्यंत प्राबल्य होते. भारत वर्षातील निरनिराळ्या प्रातात निरनिराळे राजे राज्य करीत असत. परंतु धर्मदृष्टया ते सर्व एक होते. आणि तशा दृष्टीने पाहिले म्हणजे भारतवर्ष हें त्या वेळचे एक मोठे हिंदुराष्ट्र होतें. अशा परिस्थितीत एखाद्या प्राताचा राजा पराक्रमी निघून तो आसपासच्या बयाच राजाचा पराभव करून त्यास माडलीक करून आपण सार्वभौम होई. पण हा सार्वभौमपणा माडलीक राजापासून कर घेण्यापुरताच अमलात येत असे. कोणीही सार्वभैौम राजानें माडलिक राजाचा सर्वाशीं उच्छेद करून त्याचे प्रांत आपल्या प्रांतांस जोडून एकच प्रकारची राज्यव्यस्था सर्वत्र सुरू केल्याचे आमच्या जन्या पौराणिक इतिहासात उदाहरण नाही. आणि तसे असण्याची तेव्हा जरूरीही नव्हती; कारण सर्वच प्रातातील राजे जर एकाच धर्माचे अनुयायी असून एकाच देशांत राहणार होते तर त्यांची सत्ता सर्वस्वीं हिरावून घेण्याची सार्वभौम राजांस काहीं अवश्यकता नव्हती; आणि यदाकदाचित् अवश्यकता असली तरी या मांडलीक राजाच्या जागीं दुसरा जो कोणी अधिकारी सार्वभौम राजाकडून नेमला जाई तो त्याच देशांतील असल्यामुळे त्याचाही मान मांडलीक राजाप्रमाणेंच राहत असे. सारांश, भारतयुद्धाच्या काळची किंवा तदनंतर पुष्कळ शतकेपर्यंत हिंदुस्थानची राजकीय स्थिति पाहिली तर असे दिसून येतें कीं, त्यावेळीं भारतवर्ष म्हणजे अनेक लहान मोठ्या स्वतंत्र भारतधर्मीय राजाचा किंवा त्याच्या ताब्यात असलेल्या प्राताचा एक समुदाय असून त्यापैकीं आज़ एक तर उद्यां दुसरा आणि कांहीं पिढ्यांनीं तिसरा असे निरनिराळे प्रातिक राजे पराक्रमी निघून एका विशिष्ट प्रातांचे सार्वभौमत्व इतर प्रांतांवर स्थापित करीत समुद्राच्या पृष्ठभागावर ज्याप्रमाणे