Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/485

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६८
लो० टिळकांचे केसरीतील लेख.

वरील पद्धतीने पांडवाचा काल ख्रिस्ती शकापूर्वी सुमारे १५०० वर्षे येतो. मद्रा- सचे प्रोफेसर रंगाचार्य आणि कै. शंकर बाळकृष्ण दीक्षित हाच काल ग्राह्य धरतात. मि. आय्यर यात २००१३०० वर्षे कमी करून भारतीय युद्ध ख्रिस्ती शकापूर्वी ११९४ किंवा सामान्यपणे बोलावयाचे झाल्यास १२०० वर्षे झाले असे म्हणतात. कसेही असो; हल्लींच्या कालगणन पद्धतीवरून पाहिले तर भारतीय युद्धाचा काल खिस्ती शकापूर्वी १२०० पासून १५०० वर्षे येतो. या पलीकडे जाऊं शकत नाहीं; व हा काल सोडून देऊन ज्योतिषांचा कलियुगारंभकाल हाच पांडवाचा काल असे मानण्यास रा. ब. वैद्य यानी जी प्रमाणे दिली आहेत तीं आमच्या मते बरोबर नाहीत.
 येथपर्यंत रा. ब. चिंतामणराव वैद्य याच्या ग्रंथाच्या पूर्वार्धातील कांहीं महत्त्वाच्या प्रश्नाचा व विशेषेकरून त्यांतील वादग्रस्त प्रश्नाचा विचार झाला. आता पुढील लेखात त्याच्या ग्रंथातील इतर कांहीं मुद्याचे विवेचन करून या विष यावरील आमची लेखमाला आम्ही पुरी करणार आहो. {{rule}|5em}

* महाभारत
नंबर ८ ( मागील अंकावरून समाप्त ).

या विषयावर आजपर्यंत जे लेख आले त्यात महाभारतीय युद्ध केव्हां झालें, युद्धातील पुरुष काल्पनिक आहेत की ऐतिहासिक आहेत, युद्धाचा इतिहास केव्हा, harit a कसा लिहिला, त्यात वेळोवेळी भर पडली की काय, आणि असल्यास ती सकशी पडत गेली वगैरे मुद्दयासंबंधाने रा. ब. चिंतामणराव वैद्य यांचे सिद्धांत देऊन त्यांत आमच्या दृष्टीनें जें कांहीं उणेपुरे दिसले त्याचे विवेचन केले आहे. परंतु हैं विवेचन वाचताना वाचकांनी एवढे लक्षात ठेविले पाहिजे कीं, महाभारत ग्रंथाची योग्यता व महत्त्व, तें कधीं झाले व केव्हां झाले, या प्रश्नाचे निर्णयावर अवलंबून नाहीं. सामान्यतः एवढी गोष्ट निर्विवाद आहे कीं, जीजस ख्राइस्ट जन्मास येण्यापूर्वी काही शतके - निदान तत्पूर्वी तीन चार शतकें - या ग्रंथाचे स्वरूप इल उपलब्ध आहे त्याचप्रमाणे होते. ख्रिस्तानंतर पांचव्या शतकांतील शिला लेखांत एक लक्षात्मक भारताचा उल्लेख आहे; आणि जावाजवळील बली बेटात याच सुमारास या ग्रंथाचे बली बेटातील भाषेत भाषांतर झाले आहे. मेग्या- स्थिनीच्या वेळीं बहुधा हल्लींचेंच भारत प्रचारांत असावे, असें मागे आम्हीं दाखविलेंच आहे. अर्थात् कर्मीत कमी निदान २५०० वर्षे तरी हिंदुस्थानांतील हिंदुलोकांस हा ग्रंथ प्रिय होऊन व्यासानी म्हटल्याप्रमाणे भारतधर्म पाळणा-या


 * ( केसरी, ता. ३० मे १९०५ ).