पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/484

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत, ४ ६७ कनिष्कापर्यंत सुमारें चारशें वर्षांचा काल येती व इतक्या अवधींत २० पिढया धरल्या तर परिक्षितापासून कनिष्कापर्यंत सुमारें ३९+२०=५९ पिढया होतात;आणि हीं संख्या गोनर्दापासून अभिमन्युपर्यंत काश्मीरच्या गादीवर बसलेल्या राजांच्या संख्येशीं पाच सहाच्या फरकानें जुळते. यावरून असें अनुमान निघर्त की, परिक्षितापासून नंदापर्यंत सुमारें चाळीसच पिढया असाव्या. पुराणांत दिलेली ही माहिती पूर्वीच्या ऐतिहासिक आधारावरून दिलेली असल्यास पांडवापासून नंदापर्यंत सुमारें १० ० ० । १२०० वर्षांचा काल गेला असावा असे मानणे भाग येते. हे अनुमान सर्वोशी बिनचूक आहे असें सध्याच्या स्थितीत सांगतां येणें कठिण आहे. तथापि, काल्पनिक ग्रहस्थितीवरून काढलेल्या कलियुगारभकालापेक्षां किंवा भारतात दुहेरी ग्रहस्थिति आहे असें मानून कै. विसाजी रघुनाथ लेले यांनीं ठरविलेल्या भारतीय युद्धकालापेक्षा पांडवापासून नंदापर्यंत किती पिढया गेल्या हे पाहून त्यावरून कालनिर्णय करण्याची पद्धत अधिक निर्दोष व सशास्र आहे असे कोणाही विचारी मनुष्यास उघड दिसणार आहे. पृथ्वीराज वगरे रजपूत राजे पाडवापासून आपली वंशावळ देतात हें प्रसिद्ध आहे. या वंशावळींतील पिढया मोजल्या तरीही पाडवापासून नंदापर्यंत वर लिहिल्याप्रमाणेच पिढयांची संख्या निघते. आता एवढी गोष्ट खरी आहे कीं, रजपूत राजांच्या वंशावळींत प्रत्येक राजाच्या कारकीर्दीचीं वर्षे ब-याच ठिकाणी ५०|६० च्या वर दिलेलीं असून त्यांची सरासरीही दर पिढीस २०॥२५ वर्षापेक्षां जास्त पडते. पण सरासरीने हें मान घेता येत नाहीं, असे मि. अय्यर यानी इंग्लंड देशाच्या राजांच्या इतिहासाचे प्रमाण घेऊन आपल्या ग्रंथात दाखविलें आहे. इंग्लेडाखेरीज इतर देशांचा इतिहृास घेतला तरी हेंच अनुमान निघतें. महाराणी व्हिक्टोरियासारखी एखादी राणी किंवा राजा चैोसष्ट वर्षे राज्य करील नाही असें नाही. पण पन्नास साठ राजाच्या कारकीर्दी पाहून प्रत्येकाची सरासरी ठरवावयाची असते, करितां ती सरासरी २०२५ वर्षांपेक्षा जास्त निघत नाहीं.मि. अय्यर यांनी इतिहासावरून गणित करून असें दाखविले आहे कीं, इंग्लंड देशांत एका राजाचे कारकीर्दीचा सरासरीनें काल २२ वर्षे येतो, फ्रान्सात २४, जर्मनीत २३, रशियात १९ आणि जपानांत २१ वर्षे असा येतो. हीच सरासरी आम्ही घेतली पाहिजे, आणि ती घेतली म्हणजे पिढयाच्या गणनेवरून परिक्षितापासून नंदापर्यंत सुमारें १००० वर्षाचा काल गेला असावा असे मानणे भाग येतें. नदाच्या कालापर्यंत गणित करण्याचे कारण असें कीं, नंदानंतर चाणक्याने राज्यावर बसविलेला चेद्रगुप्त राज्य करीत असतां हिंदुस्थानावर ग्रीस देशाचा राजा अलेक्झांडर यानें स्वारी केली होती; आणि ग्रीसच्या इतिहासावरून ही अलेक्झाडरची स्वारी खिस्तीशकाच्या पूर्वी ३२५ व्या वर्षी झाली हें सिद्ध आहे. चंद्रगुप्ताचा हाच काल होय. या पूर्वी नंदराजांनीं १०० वर्षे राज्य केले. अथात नंदाचा काल खिस्ती शकापूर्वी ४२५ वर्षे येतो. त्यांत १० १५ मिळविले म्हणजे