पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/481

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ ६४ लो० टिळकांचे केसरींतील लेख.

  • महाभारत.

नंबर ७ भारतीययुद्धाचा काल निश्चित करण्याचे बाबतीत जीं कांहीं साधनें उपलब्ध आहेत त्यापैकीं तीन साधनाचा विचार आजपर्यंतच्या लेखांत केलेला आहे. महाभारतांत दिलेली ग्रहस्थिती दुहेरी म्हणजे सायन-निरणयात्मक धरून त्याचप्रमाणें गणीत केले असतां भारतीय युद्धकाल खिस्तीशकापूर्वी सुमारें पांचहजार वर्षे येतो असें सायनवादी कै. लेले व मोडक यांनीं प्रथम प्रसिद्ध केले होतें. परंतु हें गणित बरोबर असले तरी भारतांतील ग्रहस्थिति वास्तविकरीत्या दुहेरी नसल्यामुळे ज्या आधारावर हें गणित केलें तोच चुकलेला होता असें केसरीपत्रांत मार्गे आम्हीं लिहिले होते व तेंच मत पुढे सायनवादी कै. दीक्षित यांनीही मान्य करून आपल्या भारतीय ज्योतिषशास्रग्रंथांत नमूद केले आहे. रा. ब. वैद्य यांचही मत कै. दीक्षित याच्या मताप्रमाणे आहे. सारांश भारतांतील ग्रहस्थिति दुहेरी आहे अशा समजुतीवर कै. लेल व मोडक यांनी काढलेलें अनुमान आतां चुकीचे ठरले आहे ही एक पक्षाची वाट झाली. भारतीय युद्धकालनिर्णयाचा दुसरा मार्ग म्हटला म्हणजे कलियुगारभ काल होय. पण कलियुगारभ काल हा कलियुगाच्या प्रारंभापासून हल्लीं आम्हीं शककाल मोजतों त्याप्रमाणे पिढ्यानुपेिढ्या प्रत्यक्ष मोजीत आलेला नसून शककालानंतर काहीं काल्पनिक ग्रहस्थितीवरून गणिताने ठरविलेला आहे असे गेल्या अंकीं आम्हीं दाखविलें आहे. या मार्गाप्रमाणें भारतीय युद्धाचा काल खिस्तीसनापूर्वी ३१०१ येतो परंतु ज्या काल्पनिक ग्रहस्थितीवरून हा काल काढला आहे ती खरी नसल्यामुळे हेंही अनुमान (गणित बरोबर असले तरी) ऐतिहासिकदृष्टया अग्राह्य होय. रा. ब, वैद्य यांनीं या अनुमानाच्या पुष्टीकरणार्थ मेग्यास्थनीसचा उतारा देऊन व डायोनिसापासून श्रीकृष्णाच्या १५ पेिढया धरून मेग्यास्थिनीसनें दिलेल्या कालाचा सध्यां प्रचारांत असलेल्या कलियुगारंभकालाशीं मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण रा. ब. चिंतामणराव वैद्य यांनीं मेग्यास्थिनीसच्या वाक्यावरून काढलेलें अनुमान बरोबर नाहीं असेही आम्हीं दाखविले आहे. अर्थात सध्यां प्रचारांत असलेल्या कलियुगारंभकालाचे स्पष्टीकरण रा. ब. वैद्य यांनी काढलेल्या नव्या युक्तीनें होऊं शकत नाहीं. करितां ऐतिहासिकदृष्टया हाही काल धरावा लागतो. म्हणजे भारतीययुद्ध खिस्ती सनापूर्वी पाच हजार वर्षे निदान ३१०० वर्षे तरी झाले अशी जी दोन मर्त आहेत तीं दोन्ही गणिताला बरोबर असली तरी ऐतिहासिकदृष्टया चुकीचीं व टाकाऊ ठरतात. आतां याखेरीज भारतीय युद्धाचा काल निर्णित करण्याची दुसरी काहीं साधनें उपलब्ध आहेत की काय, असल्यास

  1. (केसरी, ता. २३ मे १९०५ )