पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/480

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ४६३ वहिवाट आहे; व शक राजे युधिष्ठिरानंतर पुष्कळ वर्षानीं झाले. तेव्हां युधिष्ठिराचा शक ’ हे शब्द * युधिष्ठिराचा सन ’ या शब्दाप्रमाणेंच असंबद्ध किंवा विरुद्धार्थबोधक आहेत. * युधिष्ठिरकाल ? हा शब्द बरोबर होईल, पण तसा शब्द रूढ नाहीं; इतर्केच नव्हे तर युधिष्ठिरकालाची गणना अमलांत असल्याबद्दल शककालापूर्वीचा कोणत्याही प्रकारचा लेख उपलब्ध नाहीं. अर्थात् कलियुगारंभ किंवा युधिष्ठिराचा काल शककालानंतरच्या ज्योतिष्यानीं गणितरीत्या मागाहून ठरविला असावा असें मानणें भाग पडते. गर्गाच्या व आर्यभट्टाच्या गणर्नेत चूक झाली आहे, ती याचमुळे होय, व कल्हण पंडितानें केलली एकवाक्यता जुळत नाहीं त्याचेही कारण हेंच होय. आाथैभट्टानॆ युगारंभी अयनाश शून्य हेर्तेि असे मानून कलियुगारंभ ठरविला; पण कलियुगारंभीं अयनाश शून्य होते यास प्रमाण काय हें , त्यार्ने सांगितले नाहीं व दुस-या कोटें उपलब्धही नाही. अर्थात् आर्यभट्टानें निश्चित केलेला युगारंभकाल गगांच्या कालाप्रमाणेच काल्पनिक ग्रहस्थितीवर अवलंबून आहे. हल्लींचा प्रचार पाहिला तर गर्गानें निश्चित केलेला काल काश्मीरात प्रमाण धरतात, आणि तेथे आर्यभट्टाशी विरोध टाळण्याकरता ( महाभारताचा विरोध मनात न आणतां) पांडव कलियुगाच्या ६५३ व्या वर्षी झाले असें मानतात. काश्मीरखेरीज हिंदुस्थानात इतर ठिकाणीं आर्यभट्टाचे मत ग्राह्य धरून पांडव व कलियुगारंभ शालिवाहन शकापूर्वी ३१७९ व्या वर्षी झाला असे मानतात. वस्तुत: पाहिले तर ही दोन्हीं कालमार्ने शककालानंतर गणितानें ठरविलेली आहेत; प्रत्यक्षापासून परंपरेनें प्राप्त झालेली नाहीत. अर्थात् हीं कालमानें घेऊन पांडवांचा काल निश्चित करणे म्हणजे पाडवाच्या कालीं अयनाश शून्य हेोर्ते किंवा सप्तर्षी मघात होते एवढ्याच गोष्टीवर अवलंबून राहण्यासारखें होय. परंतु हीं दोन्हीं विधानें अन्यप्रमाणानीं सिद्ध होत नसल्यामुळे त्यांच्यायोर्गे निश्चित केलेला पाडवाचा काल ऐतिहासिक दृष्टीनें पाहतां विश्वसनीय मानता येत नाहीं. रा. वैद्य यांस हा आक्षेप माहित होता असे दिसतें कारण एरव्ही मेग्यास्थिनीसची माहिती, गर्गकाल वगैरे साधनानीं आर्यभट्टाने काढलेल्या कलियुगारंभकालाचे त्यांनीं समर्थन केलें नसतें. रा. वैद्य यांनी ही जी नवीन प्रमाणे दिली आहेत ती चुकीचीं आहेत हें आम्हीं वर दाखविलेंच आहे. अर्थात् आर्यभट्टार्ने निश्चित केलेल्या कलियुगारंभ कालाच्या गणनेंतील उणीव भरून निघत नाहीं; आणि ती जर भरून निघाली नाही तर ऐतिहासिकदृष्टया पाडवांच्या कालाचा विचार करतांना हल्लींच्या पंचागांतील कलियुगारंभकालापेक्षां दुसरी साधनें आम्हास शोधून काढिलीं पाहिजेत. हीं साधनें कोणतीं व त्यांचा रा. वैद्य यांनी काय विचार केला आहे याचे विवेचन पुढील खेपेस करूं.