पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/479

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६२ लो० टिळकांचे केसरींतील लेख. होते तेव्हां दरक नक्षत्रास शंभर वर्षे याप्रमाणें २७ नक्षत्रांचा फेरा पुरा होऊन पुन्हा मघांत येण्यास पांडवांच्या कालापासून आपल्या कालापर्यंत २७०० वर्षे गेलीं असावी असें गर्गानें अनुमान केलें. एरव्हीं सप्तर्षीची शंभर वर्षात एक नक्षत्रगति सांगून लगेच शककालांत २५२६ वर्षे मिळविल्यानें युधिष्ठिराचा काळ येतो असें गगनें म्हटले नसते. २५२६ यांत १७४ मिळविले म्हणजे २७०० होतात करिता यावरून असें अनुमान निघतें कीं, गर्ग शककालाच्या १७४ व्या वर्षी झाला व आपल्यापूर्वी २७०० म्हणजे शककालापूर्वी २५२६ वर्षे युधिष्ठिर झाला असा सप्तर्षीच्या काल्पनिक गतीवरून त्यानें निर्णय केला असावा. गर्गाच्या मते हाच कलियुगाचा आरंभ होय. गगांच्या वेळीं शक राजे होऊन गेले होते असें गगीच्या ग्रंथांतील प्रमाण देऊन मार्गे आम्हीं दाखविलेच आहे. पण गर्गानें कल्पिलेली सप्तर्षीची गति वास्तविक नसल्यामुळे गर्गाची चूक पुढील ज्योतिष्याच्या लवकरच नजरेस आली. गर्गाच्या पुढला मोठा ज्योतिषी आर्यभट्ट होय. हा शके ४२१ मध्यें होता. वास्तविक पाहिले तर सप्तर्षी यावेळीं मघाच्यापुढे तीन नक्षले असावयास पाहिजे होते. पण आर्यभट्टास ते मघांतच आढळले व गगांचे अनुमान चुकीचे ठरले. तेव्हा कलियुगाचा आरंभकाल दुस-या कोणत्या तरी साधनार्ने ठरविता येतों की काय याचा आर्यभटानें विचार केला. त्यांच्या कालीं म्हणजे शके ४२१ व्या वर्षी अयनाश शून्य होते व आर्यभट्टानें हेच अयनाश कलियुगाच्या आरंभकाली शून्य असावत असें गृहीत घेतले. अयनांश एकदां शून्य असल्यापासून पुन्हा शून्य होईपर्यंत सूर्यसिध्दान्ताप्रमाणें ३६०० वर्षे लागतात. करिता शके ४२१ च्या पूर्वी ३६०० वर्षे म्हणजे शककालापूर्वी ६००-४२१ = ३१७९ वर्षे अयनाश शून्य होतें. व कलियुगाचा आरंभ झाला असें आर्यभट्टानें ठरविलें. हाच निर्णय पुढील ज्योतिषानीं मान्य करून कलियुगात युधिष्ठिर शक ३०४४ विक्रम शक १३५ व पुढे शालिवाहन शक असा क्रम बसविला. कलियुगामध्ये सहा शककर्ते होतील हें भविष्य अर्वाचीन ज्योतिष ग्रंथाखेरीज इतरत्र कोठे सांपडत नाहीं. निदान असल्याचे तरी अद्याप उपलब्ध झालेले नाहीं. वरील विवेचनावरून असे कळून येईल कीं, आमच्या पंचांगांत कलियुगाचा जेो प्रारंभ-काल दिलेला असतो तो प्रथम गर्ग व आर्यभट्ट यांनीं निरनिराळ्या साधनानीं ठरविला व त्यापैकीं आर्यभट्टानें निश्चित केलेला काल हल्लीं पंचांगांत देत असतात. शालिवाहन शकापूर्वी ३१७९ व्या वर्षी युधिष्ठिर झाला यास आर्यभटाच्या गणनेखेरीज दुसरा परंपरेचा किंवा प्रत्यक्ष गणनेचा काहीं आधार नाहीं. इतकेंच नव्हे तर युधिष्ठिर शकाचा विक्रमापूर्वीच्या ग्रंथांत कोठेच उल्लेख नाहीं. किंबहुना * युधिष्ठिर शक ? हा समासघटित शब्दच असंबद्ध आहे. शकराजांनीं जो काल सुरू केला त्यास * शक ? किंवा * शाक ? असें म्हणण्याची