पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/478

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ४ ६१ त्यांत युधिष्ठिर शकाचा कोठेही उल्लेख नाहीं. तत्पूर्वीचे * काल ' म्हटले म्हणजे महावीर व बौद्ध यांचे होत. युधिष्ठिर शक किंवा काल जर खरोखरच विक्रमापूर्वी ३०४४ वर्षे चालू होता तर त्या कालाचा उल्लेख मागच्या कोणत्या तरी ग्रंथात असावयास नका होता काय ? परंतु तसा उल्लेख कोठेही सापडत नाही. अशा स्थितीत युधिष्ठिर शकाचीं ३१७९ वर्षे गेल्यावर शालिवाहन शक सुरू झाला असा निर्णय प्रथमत: कोणी व कसा केला हा प्रश्न सहज उद्भवतो. शालिवाहन शक सुरू झाला त्यावेळी युधिष्ठिर शकाची ३१७९ वर्षे झालीं होती हें ज्ञान ज्योतिष्यास तत्कालीन प्रत्यक्ष वस्तुस्थितीवरून झालें किंवा अनुमानानें झालें असा प्रश्न आहे. वस्तुस्थितीवरून झालें म्हणावे तर त्यास काहीं आधार सापडत नाही, इतकेच नव्हे तर शालिवाहनाच्या दुस-या शतकात झालेल्या गगनें शालिवाहान शकापूर्वी २५२६ व्या वर्षी युधिष्ठिर झाला असे लिहिले आहे ! काश्मीरचा इतिहास लिहिणारे कल्हण पंडित या दोन गोष्टीचा मेळ असा घालतात कीं, युधिष्ठिर कलियुगाच्या आरंभीं न होतां गतकाली ३ १७९-२५२६=६५३ व्या वर्पी झाला. पण कल्हण पडिताप्रमाणे युधिष्ठिराचे किंवा पाडवाचे कालमान स्वीकारलें तर “ अंतरे चैव संप्रासे कलिद्वारपरयोरभूत । स्यमत पंचके कुरूपांडवसेनयो: । ” या महाभारतातील वाक्याशी विशष विरोध येतो. कल्हणाचे म्हणणें न स्वीकारार्वे तर गगांच्या वाक्याची वाट लागत नाही. गर्गाचे असे म्हणणें आहे की, सप्तर्पिनामक तारे पाडवाच्या वेळीं मघा नक्षत्रांत होते व हे तारे चल असून दर शंभर वर्षांनी एकेक नक्षत्र पुढे सरकतात. वस्तुतः पाहता सप्तर्षीस मुळीच गति नाहीं. ते युधिष्ठिराच्या वेळीही मघात होते. गगाच्या वेळीं मघात होते व हल्लीं मघांतच आहेत. अर्थात् वरील कालगणनेला गगांचायांची कांहीं तरी चूक झाली असावी असे मानणे जरूर आहे. ही चूक काय, किंवा कशी झाली असावी याचा आपण विचार करूं. आमचे असे मत आहे की, कलियुगास आरंभ होऊन किती वर्षे झाली याचा विचार विक्रम किंवा शालिवाहनशकास आरंभ होण्यापूर्वी फारसा कोणी केलेला नव्हता. विक्रम शकापूर्वी सुमारें चारपांचशे वर्षे बौद्धधर्माचेच या देशांत प्राबल्य होतें. व काल गणनाही बुद्धाच्या नियाणापासून करीत असत. विक्रम आणि शालिवाहन याचे शक जव्हा सुरूं झाले तेव्हा बुध्दाच्या पूर्वीच्या कालगणनशीं यांचा मेळ घालणें जरूर पडले व ते काम तत्कालीन ज्योतिषांनीं हातात घेऊन आपल्या समाजाप्रमाणे तडीस नेले. यापैकी पहिला ज्योतिषी गर्ग होय. यानें असें सागितलें कीं, बुध्दाच्यापूर्वीचा काल म्हणजे पांडवांचा किंवा कलियुगाचा काल होय. पाडव केव्हा झाले किवा कलियुगास केव्हा प्रारंभ झाला हें निश्चितकसे करावें असा दुसरा प्रश्न मग सहज उद्भवला. सप्तर्षी चल आहेत. अशी गर्गाची समजूत होती; आणि पाडवांच्या वेळीं सप्तर्षी मघांत होते असाही त्यास कोठे उल्लेख आढळला. गगांच्या वेळीही सप्तर्षी मघांतच