पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/477

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

છે દ્ર ૦ लो० टिळकांचे केसरींतील लेख. यांखेरीज इतरत्र दिलेली आढळत नाहीं. अर्थात् मेग्यास्थिनीसच्या लेखावरून जर कांहीं अनुमान करावयाचे असेल तर तें हेंच कीं, त्याच्या वेळीं भारत ग्रंथ प्रचालत असून त्यास सदर ग्रंथावरूनच तत्कालीन पंडितानीं पूर्वीच्या राजाची माहिती दिली असावी. मग्यास्थिनीसनें दिलेल्या कर्णप्रावरणादि लोकाच्या माहितीवरूनही हेंच अनुमान दृढ होतें. यापेक्षा जास्त पुढे जाऊन १५३ नात १५ पिढ्या वजा घालून पाडवाचा काल मेग्यास्थिनीसच्या म्हणण्यावरून ठरविणें अगदीं चुकीचे होय. विवस्वान् आदित्यापासून पाडवाच्या आणि श्रीकृष्णाच्या पिढया खुद्द महाभारतांतच दिलेल्या आहेत, व त्यासंबंधाने जें अनुमान रा. ब. वैद्य यांनी केले नाही तेंच अनुमान मेग्यास्थिनीसच्या माहितीवरून करणे आम्हांस वाजवी दिसत नाही. आदित्यापासून श्रीकृष्णाच्या पंधरा पिढया होतात हें सांगावयास आम्हास मेग्यास्थिनीस नको. ही माहिती महाभारतात आहे. तिचा मेळ पाडवांच्या पिढयाशीं कसा घालावयाचा एवढाच काय तो प्रश्न आहे व त्याचा उलगडा रा, ब. वैद्य म्हणतात त्याप्रमाणें होऊं शकत नाहीं. असो; शतपथ ब्राह्मणातील जनमेजयाचा उल्लेख, गर्गाचा काल आणि मेग्यास्थनीसची माहिती यावरून रा. ब. वैद्य यानीं काढलेलीं अनुमानें चुकीचीं ठरली म्हणजे भारती युद्धाच्या कालासंबधानें त्यानीं जें अनुमान काढले आहे तेंही विश्वासनीय म्हणता येत नाहीं. चिंतामणरावजीनी असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की, भारती युद्ध कलियुगाच्या आरभी झाले. कलियुगाची हल्लीं म्हणजे शके १८ २७ साली गतवर्षे ५००६ आहेत; म्हणजे शालिवाहन शकापूर्वी ३१७९ व्या वर्षी भारती युद्ध झाले असे रा, ब. वैद्य याचे म्हणणे आहे. हाच काल खिस्ती सनाच्या पद्धतीने मोजला असता खिस्तापूर्वी ३१० १ व्या वर्षी येतो. आमच्या ज्योतिपग्रंथकाराची सामान्य समजूत अशी आहे कीं, कलियुगाच्या आरंभापासून ३०४४ वर्षे युधिष्ठिर शक चालत होता, पुढे १३५ वर्षे विक्रम शक चालू झाला. हीच परपरा खरी असावी व कलीच्या आरंभीं पांडव झाले म्हणून त्यास होऊनही आतापर्यंत ५००६ वर्षे झाली असावी असे रा. ब. वैद्य यानी प्रतिपादन केले आहे; व त्याच्या पुष्टयर्थ मेग्यास्थनीसची माहिती व गर्गाचा काल वगैरे प्रमाणें दिलीं आहेत. हीं प्रमाणे लंगडी आहेत किंबहुना चुकीचीं आहेत हे पूर्वी दाखविलेच आहे. आता मुख्य गोष्टीकडे म्हणजे कलियुगाच्या कालाकडे वळू. अलीकडे मि. आय्यर, प्रेो. रंगाचार्य आणि काही युरोपियन गृहस्थ यांनीं जी माहिती गोळा केली आहे त्यावरून कलिकालाच्या गणनेसंबधानें आमच्या ज्योतिषानीं पुष्कळ घोंटाळा केला आहे असें नजरस येतें. शालिवाहन शकापूर्वी ३१७९ किंवा विक्रम शकापूर्वी ३०४४ वर्षे युधिष्ठिर शक चालू होता यास विश्वसनीय असें कोणतेच प्रमाण अद्याप सापडलें नाहीं. शालिवाहन शकापूर्वीच्या दोन तीन शतकांतले शिलालेख सध्यां उपलब्ध झालेले आहेत. पण