पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/476

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ४५९ दुसरा व श्रीकृष्ण १५वे, आणि चेद्रगुप्त १५३वा अशी माहिती मेग्यास्थिनीस यास मिळाली; व प्राय: जशीच्या तशीच त्यार्ने आपल्या ग्रंथात नमूद केली. पण डायोनिसँॉसपासून श्रीकृष्ण १५ वे, म्हणून पांडवही १५ वेच असले पाहिजेत, असें एवढयावरून अनुमान करणें अगदीं धाडसाचे काम होय. कारण, पुराणात ज्या पुरुषापासून श्रीकृष्ण १५ वे सांगितले आहेत त्याच पुरुषापासून पाडव ३० वे किंवा ४५ वे आहेत असें म्हटलें आहे. ह्या पिढयाचा मेळ बसत नाहीं, हें खर आहे; पण तेवढ्यावरून त्यापैकी श्रीकृष्णांची पिढी खरी असे धरून त्यावरून पाडवाचा काल निश्चित करणे अगदीं गैराशस्त आहे. पांडवांपूर्वी किंवा श्रीकृष्णापूर्वी मानवी सृष्टीची उत्पात होऊन पंधराच पिढ्या झाल्या होत्या काय ? नाही. मग डायोनिसँसपासून श्रीकृष्ण १५ वा सागितला म्हणून त्यावर पांडवाच्या कालाची इमारत रचणे अप्रशस्त नव्ह काय ? मेग्यास्थिनीस यानें डायोनिसँसपासून हिरॉक्लिस १५ वा पुरुष होता असे का म्हटलें याची उपपति जर आता आपणास महाभारतात सापडत आहे, तर उगाच आडरानांत शिरण्यांत काहीं अर्थ नाहीँ डायोनिसँसपासून श्रीकृष्णाची शाखा व डायोनिसँसपासून चेद्रगुप्तापर्यंतची वंशावळ या दोनही अगदीं स्वतंत्र आहेत. आणि त्यामुळे एकीवरून दुसरीत उडी मारणें कधीही योग्य होणार नाहीं. रा. वैद्य यानीं काढलेली ही नवी केोटी अशा तन्हेने लंगडी पडली म्हणजे त्यानीं भारतीय युद्धाच्या व पाडवाच्या कालासबंधाने केलेलें अनुमानही सोडून द्यावे लागतें, पण स्थलसंकोचास्तव त्याचा विचार करणें आज तहकूब ठेवणें भाग आहे.

  • महाभारत

नंबर ६. जनमेजय एकच झाला होता असे मानून आणि गर्ग शककालापूर्वी झाला होता असें कल्पून रा. ब. वैद्य यानीं जीं अनुमानें काढली आहेत. तींबरोबर नाहीत; व मेग्यास्थिनीसनें श्रीकृष्णाच्या पिढ्याबद्दलची जी माहिती दिली आहे त्यावरून रा. ब. वैद्य म्हणतात तसें अनुमान निघत नाही हें पूर्वीच्या लेखातून आम्हीं दाखविलेंच आहे. मेग्यास्थिनीस आपणास श्रीकृष्णाच्या पिढ्यांबद्दलची माहिती हिंदु लोकाकडूनच मिळाली असें स्पष्ट म्हणत आहे, आणि विवस्वान् आदित्यापासून श्रीकृष्णापर्यंत पंधरा पिढया होतात. ही माहिती भारत व हरिवंश

  1. { केसरी, ता. १६ माहे मे १९०५ )