पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/475

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9いく लो० टिळकांचे केसरींतील लेख. न्याय जर महाभारतांत सांगितलेल्या सूर्यचेद्रवंशांच्या पिढयांस लावला, तर रा. वैद्य यांच्या काटिक्रमांतील दोष काणाच्याही ताबडतोब लक्षांत येईल. महाभारताच्या आदिपर्वात ९४ व्या व ९५ व्या अध्यायांत वैवस्वत मनूपासून पाडवापर्यंतच्या दोन निरनिराळ्या वंशावळी दिल्या आहेत. या दोन निरनिराळ्या वंशावळी कां, हा प्रश्न स्वतंत्र आहे; कदाचित् या दोन भिन्न वंशावळी दोन निरनिराळ्या ग्रंथांतून घेतल्या असतील; किंवा दोन निरनिराळ्या परंपरेच्या आधारानें दिल्या असतील. कसेंही असेो; ९४ व्या अध्यायातील वंशावळीप्रमाणें विवस्वान् आदित्यापासून पांडव ३०वे येतात; आणि ९५व्या अध्यायातील वंशावळीप्रमाणे ४५ येतात. म्हणजे महाभारतांतच पाडवाच्या दोन वंशावळींमध्यें १५ पिढयांचा फरक आहे. हाही फरक आपण तूर्त सोडून देऊन विवस्वान् आदित्यापासून पांडव ३० वे आहेत असेच गृहीत धरून चालू, श्रीकृष्ण विवस्वान् आदित्यापासून १५ वे आहेत, याबद्दलचा महाभारतातील उल्लेख वर आलाच आहे. श्रीकृष्ण आणि पांडव जर समकालीन होते तर विवस्वान् आदित्यापासून श्रीकृष्ण १५ वे कां आणि पांडव ३० वे कां, असा सहज प्रश्न उत्पन्न होती. इतकंच नव्हे तर इक्ष्वाकूपासून दाशरथी रामापर्यंत कित्येक पुराणांत ६२ पिढया दिलेल्या आहेत; आणि राम तर कृष्णाच्या पूर्वीचे. तेव्हां या पिढयाचा मेळ कसा घालावयाचा ? रा. वैद्य याची केोटी स्विकारली तर आदित्यापासून श्रीकृष्णाची पंधरावी पिढी, म्हणून पांडवाच्या तितक्याच पिढया झाल्या; आणि पाडव रामावतारापूर्वी झाले असें मानाव लागेल ! किंबहुना विवस्वान् आदित्यापासून पांडव जर ३० वे किंवा ४५ वे असा स्पष्ट उल्लेख आहे, तर पांडवांपूर्वीही श्रीकृष्ण १५ पिढया झाले असें मानणें भाग येईल ! हें अनुमान चुकीचे आहे हें सागावयास नकोच. आणि जर चुकीचे आहे तर डायोनिसँॉसपासून मोजलेल्या दोन शाखेच्या पिढयांसही तोच न्याय लागू केला पाहिजे. मेग्यास्थिनीस यानें आपण हेाऊन हिंदुलोकांच्या पुराणाचे अध्ययन केलें नव्हते. त्यास हिंदुस्थानासंबंधानें जी माहिती मिळाली ती जशीच्या तशीच त्यार्ने आपल्या ग्रंथांत दिली आहे. उदाहरणार्थ, कर्णप्रावरण, (कानाचे पाघरुण घेऊन निजणारे) किंवा एक पाद (एक पायाचे) लोक हिंदुस्थानांत आहेत, असें मेग्यास्थिनीसनें लिहिले आहे; व त्याबद्दल युरोपांतील इतर ग्रंथकारानी त्यास नांवेंही ठेविलीं आहेत. पण यांत मेग्यास्थिनीसचा काय दोष ? महाभारतातही कर्णप्रावरण आणि एकपाद लोक युधिष्ठिराचे राजसूय यज्ञाचे वेळीं हजर होते असें वर्णन आहे व ते मेग्या स्थिनीस यास कोणीं सांगितल्यावरून त्यानें आपल्या ग्रंथांत या लोकांचीं नांवें दाखल केलीं असावीं. राजांच्या पेिढयांसंबंधानेही भेग्यास्थिनीस यार्ने आपल माहिती अशाच प्रकारें मिळविली असावी. डायोनिसेंसि हें नांव मेग्यास्थिनीसचे आहे म्हणजे सर्वोचा मूळपुरुष म्हणून जे कोणी हिंदुलोकानीं मेग्यास्थिनीस यास सागि तला त्यास त्यानें आपल्या भाषेत डायोनिसेंस असे म्हटले. या मूळ पुरुषापासून बुध्