Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/474

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारत.

४५७

आदित्य घ्यावा लागतो. यावरून आदित्यापासून चंद्रगुप्तापर्यंत १५३ पिढ्या झाल्या व६०४२ वर्षे गेलीं असा मेग्यास्थिनीसच्या म्हणण्याचा आशय होता असे दिसून येते.
 परंतु रा. वैद्य असे विचारतील कीं, या कोटिक्रमाने डायोनिसॉस म्हणजे इक्ष्वाकूचा आजा आणि मनूचा बाप आदित्य घेतला तर सूर्यवंशाच्या मूळ पुरुषापासून चंद्रगुप्तापर्यंत मेग्यास्थिनीस याने पिढया सागितल्या असाव्या हे जुळते; पण हिरॉक्लिस म्हणजे जर श्रीकृष्ण तर डायोनिसॉस किंवा आदित्या- पासून श्रीकृष्ण हा १५ वा पुरुष होता असे जे मेग्यास्थिनीस याने कंठरवाने सागितले आहे त्याची वाट काय ? प्रश्न बरोबर आहे; आणि त्यास उत्तरही पण महाभारतांतच यथार्थ दिलेले आहे. अनुशासन पर्व, अ. १४७ ( कल- कत्ता प्रत ) यांत श्रीकृष्ण मानववंशात उत्पन्न झाला असे सांगून दाक्षायण्य आदित्यापासून श्रीकृष्णापर्यंत - आदित्य, मनु, इला ( बुध), पुरूरवा, आयु, नहुषु ययाति, यदु, कोष्टा, वृजिनीवान्, उपद्र, चित्ररथ, शूर, वसुदेव, आणि श्रीकृष्ण- अशा १५ च पिढया दिल्या आहेत.
 यावरूनही डायोनिसॉस कोण होता, याचा सहज निर्णय होतो. दक्षाची कन्या जी दाक्षायणी तिच्यापासून आदित्य झाला आणि आदित्यापासून मनु व मनूपासून इला ( बुध) अशी एक परंपरा आहे. दुसरी परंपरा यदुवंशाची होय. या परंपरेप्रमाणें आदित्यापासून श्रीकृष्ण १५ वा येतो. या दोन परंपरांची मेग्या- स्थिनीस याने दिलेल्या डायोनिसॉस स्पटेंबस, बुध ही एक व डायोनिसॉसपासून श्रीकृष्ण १५ वा ही दुसरी, या दोन परंपरेशी तुलना केली म्हणजे डायोनिसॉस कोण याचा बिलकूल संदेह राहत नाही. आमच्या पुराणांत मनु दोन आहेत; एक स्वायंभव दुसरा वैवस्वत. पण हा भेद लक्षात न आल्यामुळे मेग्यास्थिनीस याने वैवस्वत मनूसच स्वायंभव ( स्पटॅबस ) म्हटले असावें, असें वाटतें. कही असो; बुधापासून मार्गे तिसरा व श्रीकृष्णापासून मार्गे पंधरावा असा पुरुष आमच्या पुराणाप्रमाणे विवस्वान् आदित्य हाच होय. सूर्यवंशाचा मूळ पुरुषही हाच आहे. व म्हणून डायोनिसॉस म्हणजे इक्ष्वाकु घेण्यापेक्षा विवस्वान् आदित्य मानणें अधिक सयुक्तिक आहे. इक्ष्वाकु हा मनूचा मुलगा व आदित्याचा नातु होय. करतां इक्ष्वाकूपासून नंदापर्यंत ज्या १४७ पिढ्या पुराणात सांगितल्या आहेत, त्या आदित्यापासून मोजल्या असता १४९ होतात. ही संख्या भेग्या- स्थिनीसने सागितलेल्या १५३ पिढ्यांपेक्षां दोन चार पिढ्यानींच काय ती कमी येते. सारांश, कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी डायोनिसॉस म्हणजे विवस्वान् आदित्य हेंच अनुमान अधिकाधिक दृढ होतें.
 आतां रा. वैद्य यांनी जी चूक केली आहे तिच्याकडे वळू. डायोनिसॉस. पासून श्रीकृष्ण १५ वा आणि डायोनिसॉसपासून चंद्रगुप्त १५३ वा; म्हणून श्रीकृष्णापासून चंद्रगुप्त १३८ वा असे त्यांनीं अनुमान केलें आहे. आपण हाच