एक २० वर्षांची ) झाल्या असें तरी एक मानिले पाहिजे; अथवा मेग्या- स्थिनीस यानें दिलेल्या पिढ्या घेऊन त्याने सांगितलेली वर्षसंख्या अजिबात सोडून दिली पाहिजे; दुसरा मार्ग नाहीं.
वरील हिशेबावरून रा. वैद्य याची या कामी कांहीं तरी चूक झाली आहे हैं उघड आहे. ही चूक म्हणजे डायोनिसिसॉस हा कोण हें त्यानीं प्रथ- मतः ठरविलें नाही ही होय. मद्रासचे मि. अय्यर असे म्हणतात कीं, डायो- निसॉस म्हणजे इक्ष्वाकू. आता पुराणात पाहिले तर त्रेतायुगीं इक्ष्वाकूपासून रामापर्यंत ६२ पिढया होतात; द्वापारात कुशापासून बृहद्बलापर्यंत ३५; आणि कलियुगात जरासंधापासून शेवटच्या नंदापर्यंत ५०; मिळून एकंदर इक्ष्वाकू- पासून नंदाच्या अखेर किंवा चंद्रगुप्तापर्यंत १४७ पिढद्या येतात. पुराणात दिलेल्या या पिढया आणि मेग्यास्थिनीस याने दिलेल्या १५३ पिढ्या यांज- मधील अंतर फार थोडे आहे. तेत्रा ३०००, द्वापर २०००, आणि परि- क्षितीपासून नंदापर्यंत १०१५ वर्षे धरिली म्हणजे एकंदर वर्षांची संख्याही ६०१५ म्हणजे मेग्यास्थिनीसने सागितलेल्या संख्येपेक्षा २७ वर्षांनी कभी येते. अर्थात् डायोनिसॉस म्हणजे इक्ष्वाकु धरावा, असें जे मि. अय्यर यांचे म्हणणे आहे, ते बरेच सयुक्तिक दिसते. डायोनिसॉस हे नाव हिरॉक्लिस या नांवा- प्रमाणेच ग्रीक लोकाच्या प्राचीन पौराणिक पुरुपाचें आहे; आणि मेग्यास्थि- नीस यानें तें हिंदु लोकाच्या कोणत्या तरी प्राचीन पौराणिक पुरुषास समा- नार्थक म्हणून लाविलें आहे. करिता, हिरॉक्किस याचा अर्थ जसा मधुरेच्या संदर्भावरून निश्चित केला, तसाच डायोनिसॉसचाही अर्थ निश्चित करण्यास कांही साधन आहे कीं काय हैं पाहाणें जरूर आहे. पण मि. अय्यर किंवा रा. ब. वैद्य यापैकी कोणीही हा संदर्भ पाहिलेला नाहीं. मेग्यास्थिनीस एके ठिकाणीं असे म्हणतो कीं, " डायोनिसॉस याचा ' स्पटेक्स (Spatembas ) नावाचा एक सहचर असून या स्पटेक्सास बौध्य ( Boudyas) नावाचा एक पुत्र होता; व तो त्याच्यानंतर गादीवर आला. ( मॉकू किंडल, पृ. २०० ) येथे बौध्य म्हणजे गौतमबुद्ध ध्यावा असे काही इंग्रज म्हणतात; पण मग गौतम बुद्धा- पासून चंद्रगुप्तापर्यंत (सुमारे ३९० वर्षांत ) १५० पिढया मानाव्या लागतात. अर्थात् ही कल्पना चुकीची आहे. हिंदु लोकांच्या प्राचीन पौराणिक राजवं- शांत मनूची कन्या इला इचा बुधाशी विवाह होऊन त्याच्या पोटीं पुरूरवा जन्मला असे वर्णन आहे. आतां डायोनिसॉस हा प्रथमपुरुप, आणि त्याच्यामागें बौध्य दुसरा व पुढें चंद्रगुप्तापर्यंत १५० पिढया, मेम्यास्थिनीस देतो है लक्षात आणिलें म्हणजे सोमवंशाचा पहिला पुरुष बुध हाच भेग्यास्थिनीसने सांगितलेला बौध्य पदानें विवक्षित आहे असे मानावे लागते, बुध किंवा इला यांच्या मागचा पुरुष मनु होय, व त्यासच स्पटेक्स ( स्वयंभू ? ) असें म्हटलें असावेंसें वाटतें. मनूच्या किंवा स्पर्धेबसच्या मागचा पुरुष डायोनिसॉस म्हणजे दाक्षायणीचा पुत्र
"
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/473
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५६
लो० टिळकांचे केसरीतील लेख.