४५५
६०४२ वर्षांचा काल गेला असे मानतात. तसेंच मथुरेमध्ये शौरसेन लोकांनीं पूज्य मानलेला हिरॉक्सि हा डायोनिसॉसपासून १५ वा पुरुष होता. असे आपणस माहीत असल्याचे मेग्यास्थिनीस याने लिहिले आहे. या दोन वाक्यावर रा. वैद्य यानी बरीच टोलेजंग इमारत उभारली आहे. हिरॉक्लिस म्हणजे हर्क्यूलस हा ग्रीक लोकांच्या पुराणांत पहिला मोठा दैवी योद्धा कल्पिला आहे. पण मथुरेचा आणि शौरसेन लोकांचा त्याच्याशी मेग्यास्थिनीसनें जो संबंध जोडला आहे त्यावरून वरील वाक्यांत हिरॉक्किस या शब्दानें हरी किंवा श्रीकृष्णच अभिप्रेत असावा असे रा. वैद्य यांचे म्हणणे आहे व तें काही गैरवाजवी दिसत नाहीं. आतां डायो- निसॉसपासून १५ वा श्रीकृष्ण आणि डायोनिसॉसपासून १५३ वा चंद्रगुप्स. तेव्हां अर्थातच श्रीकृष्णापासून चंद्रगुप्तापर्यंत १५३-१५-१३८ पिढ्या झाल्या. चंद्र- गुप्ताचा काल ग्रीक इतिहासाने निश्चित झाला असून तो खि. स. पूर्वी ३१२ वर्षे धरण्यांत येतो. याच्यापूर्वी १३८ पिढ्या श्रीकृष्ण; म्हणजे दर पिढीस सुमारें २० वर्षे धरिली तरी १३८x२० = २७६० इतकी वर्षे चद्रगुप्ताच्यापूर्वी श्रीकृष्ण झाला असे निष्पन्न होतें. सारांश, चंद्रगुप्ताचा काल खि. स. पूर्वी ३१२ वर्षे धरिला तर श्रीकृष्णाचा काल खि. स. पूर्वी ३१२+२७६० = ३०७२ वर्षे येतो आणि तो कलिकाळाच्या आरभाच्या जवळ येतो म्हणून ग्राह्य आहे असे रा. ब. वैद्य यांनी प्रतिपादन केले आहे. ही कोटी रा. वैद्य यानी प्रथमच काढली असून नवीन आहे हैं वर सांगितलेच आहे.
आमच्या मतें हा कोटिक्रम चुकीचा आहे. मेग्यास्थिनीस याने १५३ पिढ्यांस ६०४२ वर्षे लागलीं असें लिहिलें आहे म्हणजे सरासरीने दर पिढीस सुमारे ४० वर्षे पडतात; आणि ४० वर्षांची एक पिढी या मानानें १३८ पिढ्या धरल्या म्हणजे श्रीकृष्णास चंद्रगुप्तापूर्वी १३८x४० = ५५२० वर्षे मार्गे घालावे लागते. अशा रीतीनें गणित केले म्हणजे श्रीकृष्णाचा काल खि० पू० ३१२ + ५५२० = ५८३२ वर्षे येतो. म्हणजे कलियुगाच्या आरंभापूर्वी सुमारे २८०० वर्षे श्रीकृष्ण किंवा पांडव झाले असे मानावें लागतें. रा. वैद्यांनीं दर पिढीस सुमारे २० वर्षे धरून हा विरोध टाळला आहे. पण त्यामुळे दुसरा एक निराळाच विरोध उत्पन्न होतो, हे त्याच्या लक्षांत आलें नाहीं असें वाटतें. कारण वीस वीस वर्षांच्या १३८ पिढ्या भोजल्या म्हणजे त्या सोडून डायो- निसॉसपासून श्रीकृष्णापर्यंत १५ पिढ्यांस ६०४२-२७६० - ३२८२ वर्षे धरावी लागतात. अर्थात् अशा रीतीनें या १५ पिढ्यांतील प्रत्येक पुरुष २०० किंवा २२५ वर्षे राज्य करीत होते असें मानावे लागते ! या विरो- धार्चे समाधान कसे करावयाचें, हे आम्हांस समजत नाहीं. डायोनिसॉसपासून श्रीकृष्णापर्यंत १५ पिढया दीर्घायु ( दर एक २०० वर्षांची ) आणि श्री- कृष्णानंतर कलिकालास सुरवात झाल्यामुळे पुढील १३८ पिढया अल्पायु ( दर
५७