३२ लो० टिळकांचे केसरींतील लेखं आधीं कोण ? राजकीय कीं सामाजिक ?* गेल्या सोमवारी मुंबई येथील * स्डूडंट्स लिटररी अॅड सायन्टिफिक सोसायटी ’ पुढे ऑनरेबल का. त्रिं. तेलंग यांनीं ** राजकीय सुधारणा आधीं कीं सामाजिक सुधारणा आधीं ’ या विषयावर व्याख्यान दिले. हा विषय आमच्या कानांत दुमदुर्मू लागल्यास बरेच दिवस झाले. ज्या इंग्रज लोकांस आमची राजकीय धडपड रुचत नाहीं, त्यांचा आम्हास नेहमीं उपदेश चाललेला असतो कीं, ** आर्यलोकाग्रणीनो, राजकीय प्रकरणांत इतक्यांत तुम्ही पडू नका, अगेोदर आपली गृहस्थिति सुधारा, आमच्यापाशीं राजकीय हक्कांसाठी मागणें घालण्यापूर्वी आपल्या बायकांस, आपल्या मुलींस, आपल्या बहिणीस गृहदास्यांतून सोडवा, ब्राह्मणक्षत्रियादि जातिभद लयास न्या, स्त्रीशिक्षणाचा परिपाठ घाला, गतभर्तृकांच्या पुनर्विवाहास यथच्छ संमति द्या, एकवीस बावीस वर्षेपर्यंत मुली अविवाहित ठेवून त्यांच्याकडून पितृगृहीं असतां विद्याभ्यास करावा, इ० इ० हें जोपर्यंत तुमच्यार्ने झालें नाहीं तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य भेोगण्यास तुम्ही पात्र झालां असे होणार नाहीं. दाराच्या अांत तुम्हांला बादशाही अम्मल गाजवायला पाहिजे व दाराच्या बाहेर जिकडे तिकडे लोकसत्ता झळकली पाहिजे. ही असंभवनीय गोष्ट कधीही होणार नाहीं. तर तुमच्या हिंमतीचा ओघ प्रथम गृहसुधारणेकडे लागूं द्या. ' क्षुद्रदृष्टि इंग्रजांनी आम्हांस असा उपदेश करावा हें त्याना योग्यच आहे. आम्ही मात्र तो कितपत अनुसरावा हें विचारणीय आहे. मि, मलबारी यांनीं शिशुपरेि. णय व असेमतवैधव्य या दोन विषयांवर आपल्या टांकानें आणि ओठानें हुल्लड करून देण्यास आरंभ केल्यापासून या विषयाकडे बयाच लोकाचे चित्त वेधलें आहे. वर दिलेला मायावी उपदेश आमचे नाना फडणीस सर आक्लड कालवेिइन् यांनी मि. मलबारी याच्या टिप्पणांस उत्तर देतांना केला. कालव्हिन्साहेब जाड बुडाचे ढेल पडल्यामुळे त्यांच्या लेखावर नेटिव्ह प्रेसाकडून बरीच टीका झाली. पण या पंधरवड्यांत या वादानें पुनः उचल खाण्यास मि. वर्डसवर्थ यांनी मि. मलबारीस धाडिलेले पत्र कारणीभूत झालें ! त्यांनी त्या पत्रांत आम्हास वरील प्रकारचा उपदेश करणाच्या इंग्रजांची खाशी खरड काढून टाकेिली आहे, व विशेषतः पाद्री लोकांवर चागलाच चाबूक ओढिला आहे ! त्यांच्या पत्रांतील मुख्य आशय असा आहे कीं, सामाजिक सुधारणेसाठीं अगदीं जीव सोडण्याची गरज नाहीं; राजकीय सुधारणा होत चालली म्हणजे तिच्या कधीं बरोबर, कधीं किंचित् पाठीमागून, सामाजिक सुधारणा होत जाते. हाच सिद्धान्त काशिनाथपंतांनीं आपल्या व्याख्यानांत विशेष खुलाशानें सिद्ध करून दाखविला आहे. काशिनाथपंतांची वाक्शैली, विचारसरणी, कोटिक्रम, वाचनव्याप्ति व विनय-याविषयीं
- { वर्ष ६. अंक ९, १०, सन १८८६)