पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/468

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. છેખ ૬ तलेलें ब्रह्महत्येचे पाप म्हणजे भारतीय युद्धात मारलेले द्रोणाचार्य यांची इत्त्या धरता येत नाहीं. सर्पसत्रकत्यां जनमेजयार्ने अश्वमेध करणाच्या ब्राह्मणास यज्ञातील अश्व बेफाम झाल्यामुळे शिक्षा केली, असें हरिवशांत सागितले आहे. पण ब्राह्मण शासनाची हो कथा शतपथ ब्राह्मणात सागितलेल्या ब्रह्महत्येच्या कथेच्या अनुरोधानें गैरसमजुतीने मागून कोणी तरी रचली असावी, व याकरितां सौतीनें महाभारतातून ती गाळून टाकली, असा रा. वैद्य याच्या म्हणण्याचा रोख आहे. साराश, रा. वैद्य याच्यामर्त जनमेजय दोन नाहीत, एकच आहे; परंतु ब्रह्महत्त्या म्हणजे भारतीय युद्धातील द्रोणवध नव्हे, आणि युधिष्ठिराचे नाव शतपथ ब्राह्मणात नाही. एवढयावरून पाडव ऐतिहासिक नव्हते, हे म्हणणे बरोबर नाहीं. कारण वैदिक ग्रंथात सर्वाचीच नावें सापडलीं पाहिजेत असा नियम नाहीं. भारतातील गोष्ट वाचतांनाही वाचकांचा अशा प्रकारचाच सहज ग्रह होतो. आमच्या मतें पाश्चिमात्य पडिताचा वरील काटक्रम अगदीं लंगडा आहे. आणि शतपथ ब्राह्मणांतील जनमेजय व सर्प सत्रकर्ता जनमेजय एक मानल्यानें रा. वैद्य याचे उत्तरही लंगडे पडले आहे. शातिपर्वाच्या १५० व्या अध्यायात भीष्मानै युधिष्ठिरास पारीक्षित जनमेजयाची गोष्ट सागितली असून त्यानें इदोप दैवाप शैनिक याच्या कृपेनें अश्वमेध करून आपल्या ब्रह्महत्त्येचे पाप घालविल, अशी पुढे कथा दिली आहे.भीष्म युधिष्ठिर संवादात ज्याचा उल्लेख होतो,तो जनमेजय अर्थातूच युधिष्ठराच्या पूर्वजापैकी असला पाहिजे महाभारताच्या आदिपवांत एकदां ९४ व्या अध्ययात व एकदा ९५ व्या अध्यायात मिळून दोनदा पाडवाची वंशावळ दिली आहे. यात ९४ व्या अध्यायात पाडवाच्या पूर्वजात एक परीक्षित नांवाचा राजा सागितला असून त्यास जनमेजय, उग्रसेन, भीमसन वगैरे सात मुलगे होते असें वर्णन आहे अर्थात् हा परीक्षिताचा पुत्र (पारीक्षित ) जनमेजय युधिष्ठिराचा पूर्वज ठरतेो; आणि त्यास उग्रसेनादि बंधूही होते असे वर्णन आहे. ९५ व्या अध्यायात युधिष्टिराच्या पूर्वजात जो परीक्षित म्हणून आहे त्यास सात पुत्र होते, असे वर्णन नसून फक्त भीमसेन नामक पुत्र होता असें सागितले आहे. परतु दोन्ही अध्यायांची तुलना केली असता युधिष्ठिराच्या पूर्वजात एक परीक्षित नावाचा राजा होता, व त्यास जनमेजय, भीमसेन आदिकरून मुलगे होते असें उघड होते. अर्थात् हा जनमेजय निराळा आणि अर्जुनाचा नातू परीक्षित त्याचा मुलगा जनमेय निराळा, असे मानणे भाग आहे वंशावळींत एकच नाव अनेक येते; कारण आजाचे नाव नातवास देण्याची आमच्यामधील वहिवाट फार प्राचीन आहे. दुर्योधनाचा बाप धृतराष्ट्र आणि युधिष्ठिराचा बाप पाडु यांच्या नांवाचीही त्यांच्या पूर्वजाच्या नांवात द्विरुक्ति झालेली आहे. ( आदि, अ. ९४ लोक ५६) मग जनमेजयाच्याच नावाची द्विरुाक्त होऊं द्या; पण त्याच्या भावांच्या नावांचीही द्विरुाक्त कशी झाली ? पण आम्हांस यात काही अर्थ दिसत नाहीं. सर्प सत्नकत्यां जनमेजयाचे उग्रसेन, मीमसेन आणि श्रुतसेन असे तीन बंधु होते, असें विष्णु