Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/467

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५०
लो० टिळकांचे केसरीतील लेख.

नाहीं, तर सदर ब्राह्मणग्रंथ रचले गेले त्या काळीं अश्वमेध कर्ता जनमेजय पारीक्षित माहित होता, पण अश्वमेधकर्ता युधिष्ठिर माहीत नव्हता असे म्हणावे लागतें. कारण अश्वमेधकयी मोठमोठया राजांची नावे जर शतपथ ब्राह्मणात आहेत तर युधिष्टिराचें नांव त्यांत अवश्य यावयास पाहिजे होते. आतां कोणी असे म्हणेल की, जनमेजयाचे नाव आहे तर युधिष्ठिराचे असले काय आणि नसले काय सारखेच; पण यावर उत्तर असें आहे कीं, वैदिक ग्रंथ तोंडपाठ ठेवण्याचा प्रघात असल्यामुळे ते अधिक विश्वसनीय आहेत; व त्यांत युधिष्ठिराचे जर नांव नाहीं, तर जनमेजयाच्या पूर्वीचे पांडव कदाचित् कोणी तरी मागाहून कल्पिले असतील, आणि ते जनमेजयास जोडून महाभारताची कथा लिहिली गेली असेल. पाश्चिमात्य पंडितांच्या मतें शतपथ ब्राह्मणादि ग्रंथ फार झाले तर ख्रिस्ती शकापूर्वी दहाव्या किंवा बाराव्या शतकात लिहिले गेले असावेत. यांत युधिष्ठिराचे नाव नाही, आणि पाणिनीच्या सूत्रात ते नाव आढ ळते; तर वैदिक ब्राह्मण ग्रंथ आणि पाणिनीची सूत्रे याच्या दरम्यानच्या कालात harat काल्पनिक पाडव उत्पन्न केले असावे ! वैदिक ग्रंथात अमुक एक गोष्ट नाही म्हणून ती वैदिककाली नव्हती, असे विधान करणें साहसाचे आहे. कारण या रीतीनें हजारों पशुपक्षी कीं ज्यांचीं नांवे वेदात नाहीत ते त्या काळीं नव्हते असे म्हणावें लागेल. यावर पाश्चिमात्य पंडित असे उत्तर देतात कीं, ही कोटी खरी आहे; पण अश्वमेध कर्त्यामध्ये जनमेजयाचे नाव शतपथ ब्राह्मणांत येते, आणि त्याचा पूर्वज जो युधिष्ठिर त्याचे येत नाही, याची संगति या कोटीनें लागत नाही. मुळी कोणाचीच नावें नसती तर गोष्ट निराळी. पण भारताप्रमाणे प्रसिद्ध असलेला अश्वमेधकर्ता सार्वभौम असा जो युधिष्ठिर तो वगळला जावा, आणि त्याच्या पणतूचा उल्लेख यावा, हे विसंगत दिसते; व पांडव हे कोणी तरी मागाहून कल्पिले असावे अशा प्रकारचे काहीं समाधान मानल्या- खेरीज निर्वाह लागत नाहीं ! युरोपियन पंडितांच्या कोटीचे स्वरूप लक्षात येण्याकरितां ती आम्ही थोड्याशा विस्ताराने येथे सागितली आहे. रा. वैद्य यांस ही कोटी नीट उलगडली गेली नाही, असे त्याच्या लेखांवरून दिसते, त्याचें असे मत आहे कीं, इद्रोत दैवाप शौनकाच्या अनुग्रहाने ब्रह्महत्येचा दोष अश्व- मेशने घालविणारा शतपथ ब्राह्मणांतील जनमेजय आणि सर्पसत्र करणारा जनमेजय प्राय: एकच असावा; कारण शतपथ ब्राह्मणात जनमेजयाचे उग्रसेन, श्रुतसेन आणि भीमसेन असे जे तीन बघु सागितले आहेत तेच सर्पसत्र कर- णा-या जनमेजयाचे बंधू होते, असें आदिपर्वाच्या तिसऱ्या अध्यायाच्या आरंभी सांगितले आहे. रा. वैद्य यात्रे म्हणणे असें दिसतें कीं, जनमेजय हें नांव एखाद्या वंशवृक्षांत दोनदा येऊ शकेल; पण चारी भावांची नांवें सारखीं असा प्रकार दोनदां होणें शक्य नाहीं एतएव शतपथ ब्राह्मणातील जनमेजय आणि सर्पसत्रकर्ता जनमेजय हे एकच होत. परंतु, शतपथ ब्राह्मणांत साग-