पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/466

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. 998. असा प्रश्न करून त्याचा निर्णय उत्तरार्धाच्या दुस-या भागांत अस्तिपक्षी केला आहे. चितामणराव वैद्य यांचा हा निर्णय आम्हांस कबूल आहे; पण त्या निर्णयाचा कोटिक्रम जितका जेोरदार व्हावयास पाहिजे होता तितका कांहीं गैरसमजुतीमुळे रा. वैद्य यांस करतां आला नाहीं. यासाठी सदर भागाचे येथे थोडे जास्त विवेचन करणें जरूर आहे. पहिल्यानें वाचकानीं ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, * महाभारत ग्रंथ ' आणि * भारतीय युद्ध ? या दोन गोष्टी अगदीं स्वतंत्र आहेत. महाभारत युद्धाचे काळीं व्यास होते, त्या व्यासांनीच महाभारत आपल्या शिष्यांस सांगितलें, आणि तेंच वैशेपायनाने जनमेजयास व सौतीनें शौनकास कथन केले; म्हणून महाभारत ग्रंथाचा काळ आणि भारतीय युद्धाना काळ एकच आहे, कधीही भिन्न होऊं शकत नाहीं; अशी आमच्याकडील सामान्य लोकांची समजूत आहे. पण ही समजूत सूक्ष्म परीक्षणाचे कसोटीस टिकत नाहीं; हें या विषयावरील दुस-या निबंधांत आम्हीं दाखविलेंच आहे. अशा दृष्टीनें पाहिले म्हणजे भारतीय युद्ध ही एक स्वतंत्र गोष्ट घेऊन तिचा विचार निराळा करावा लागतो; आणि महाभारत हा ग्रंथ निराळा मानून त्याच्या रचनचा विचारही निराळा होतो. वर पांडवांच्या ऐतिहासिक अस्तित्वाबद्दल जो प्रश्न दिला आहे तो भारतीय युद्धाबद्दलचा आहे, ग्रंथाबद्दलचा नव्हे. महाभारत ग्रंथ झाला तेव्हां चारी वेदांच्या संहिता, ब्राह्मण, आरण्यक किंवा उपनिषदे उपलब्ध होतीं, ही गोष्ट निर्विवाद आहे. कारण सर्वोपनिषदाचे सार गीतेंत आहे, आणि वेदाचे चार विभाग करून व्यासांनी ते आपल्या शिष्यास पढविले, असाही भारतात उल्लेख आहे; इतकेंच नव्हे तर शातिपर्वाच्या तीनशे सोळाव्या अध्यायांत ततः शतपथं कृश्स्नं सारइस्ये ससैंग्रह्रम् । वक्रे सपरिशेषं वि हृषॆण परमेण इः । याप्रममाणे पहिलें ९ व मागाहूनचे ५ एकूण १४ कांडांचे शतपथ ब्राह्मण याज्ञवल्क्याने प्रसिद्ध केले, असें म्हटले आहे. आणि शातिपर्वाच्या ३४२व्५ा अध्यायांत यास्काचाही उल्लेख आला आहे. यावरून ब्राह्मणादि ग्रथ झाल्यानेतर महाभारतास इल्लींचे स्वरूप प्राप्त झाले असावें, असे उघड होतें परंतु भारतीय युद्धाचा काळ किंवा पाडवाचे ऐतिहासिक आस्तत्व तेवढ्यावरून सिद्ध होत नाहीं यासंबंधानें युरोपियन पंडिताची कोटी अशी आहे कीं, शतपथ ब्राह्मणांत व ऐतरेय ब्राह्मणांत पारीक्षित जनमेजयाचा स्पष्ट उल्लेख असून एकांत त्यानें इद्रोत दैवाप शौनकाच्या साह्यानें अश्वमेध करून ब्रह्महत्त्या घालविली, व दूस-यात तुरकावषेय यानें त्यास महाभिषेक केला असे स्पष्ट सांगितले आहे. हा पारीक्षित जनमेजय म्हणजे सदर पंडितांच्या मतें भारतीय युद्धांतील अर्जुनाचा पणतू आभमन्यूचा नातू व पारीक्षिताचा पुत्र जनमेजय होय; आणि या जनमेजयाचा जर ब्राह्मणात उल्लेख आहे आणि युधिष्ठिरादि पांडवांचा