पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/465

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

??く लो० टिळकांचे केसरींतील लेख. इतिहास वगैरे अनेक बाबतीत भारतीय लोकांचे महाभारत म्हणजे एक अनुपम व अक्षय्य ज्ञानभांडार होऊन राहिले आहे.

  • महाभारत

नंबर ४. आहुः केचिन्न तस्यैते (पांडवाः) तस्यैते इति चापरे । अंतरे चैव संप्रासे कलिद्वापरयोरभूत् । स्यमंत पंचके युद्धं कुरु पांडव सेनयोः । -आदिपर्व. महाभारत हें उत्तम काव्य असेल किंवा भारतीय ज्ञानाचा सर्व संग्रहही असेल, त्याबद्दल वाद नाहीं. पण कांही युरोपियन विद्वानांनीं असा प्रश्न काढला आहे कीं, भारतीय युद्धांतील पांच पाडव किंवा शंभर कौरव हे खरोखर ऐतिहासिक पुरुष नसून सद्गुण व दुर्गुण याचीं कवीनें निर्माण केलेलीं तीं रूपकें आहेत. युरोपियन लोकानी ही कल्पना आमच्या वाचकांस अपूर्व वाटेल यात संशय नाही. काव्य किंवा भारतीय युद्ध हीं खरीं मानावयाचीं आणि कौरव पांडव मात्र काल्पनिक मानावयाचे, हें म्हणणें आमच्या कानांस रुचत नाहीं; किंबहुना महाभारताच्या महत्त्वावर हा एक * मूलेकुठार: ’ या न्यायानें * भारवत् ’ आक्षेप आहे, असें भारतधर्मीयास तरी नि:संशय वाटणार आहे. परंतु आम्ही त्यांस एवढे सांगतों कीं, ही कल्पना कितीही चुकीची असली तरी ती केवळ पाश्चिमात्य पंडितांनींच काढली आहे असें नाहीं. आमच्यापैकींही कित्येक पंडित * पांडव ? म्हणजे पंचप्राण आणि द्रौपदी म्हणजे * शरीर ’ अथवा * मनः षष्ठाणींद्रियाणि ’ या वाक्यास अनुसरून पांच पांडव म्हणजे पांच इंद्रियें आणि द्रौपदी म्हणजे मन, असे पाच पांडवांत एकप नी असल्याचे रूपकद्वारा समर्थन करितात ! जीपर्यंत असल विचार केवळ कल्पनातरंगावरच हेलकावे खात असतात तेोपर्यंत त्यांच्या वाटेस जाण्याचे आपणांस कारण नाहीं; इतकेंच नव्हे तर एखादे वेळीं आपल्याही कल्पनेचा वारा सोडून या हेलकाव्याची आपणही मौज पाहण्यास हरकत नाहीं ! पण जेव्हां असले विचार ऐतिहासिक रीतीनें कारणे दाखवून मांडण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हां त्याचे ऐतिहासिकरीत्याच निरसन करणे जरूर आहे. पाश्चिमात्य पंडितांचे पांडवाच्या ऐतिहासिक अस्तित्वावर जे आक्षप आहेत ते अशाच प्रकारचे आहे; आणि एवढ्याचकरितां रा. वैद्य यानीं आपल्या पुस्तकात, “ पांडव हे ऐतिहासिक पुरुष होते कीं नाहीं,”

  • ( केसरी, तारीख २५ एप्रिल १९०५).