पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/464

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मेंहाभारतं. 상 g\9 लक्षणांत म्हटलें आहे, त्यांतील बीजही वरील विवेचनावरून वाचकाचे लक्षांत येईल. प्रसंगानुसार नलयुधिष्ठिरासारखें धैर्यशाली महात्मे पुरुषही विपत्तींत गोंवले जातात; पण अशा प्रकारच्या विपत्तींत अशा महात्म्याचे जें वर्तन असतें तेंच जगातील लोकास पुढे अनुकरणीय होतें. महाभारताच्या कथानकांतील प्रधान पुरुषाचीं किंवा देवादिकाचीं जी वर्णनें आहेत तीं अशाच प्रकारची आहेत; आणि रा. ब. वैद्य यानी आपल्या पुस्तकाच्या उत्तरार्धात भारतकथेचा जेो संक्षेप दिला आहे तोही कथेतील अशा प्रकारचीं मासलेवाईक व मार्मिक स्थळे लक्षांत आणून दिला आहे. असो; यासबंधानें वर्तमानपत्रातील लेखात जास्त चची करणे अशक्य आहे. ज्यास अधिक माहिती पाहिजे असेल त्यानीं रा. वैद्य यानी आपल्या ग्रंथात दिलेली भारताची संक्षिप्त कथा नीट लक्षपूर्वक वाचावी म्हणजे झाले. थोडक्यात एवढे सागितले म्हणजे बस्स आहे की, इंग्रजी* एपिक' काव्याचे लक्षण घेऊन जरी महाभारताचे परीक्षण केले तरीही त्यातील प्रमुख पात्नाचे स्वभाववैचित्र्य, त्यांचे समयोचित आणि स्पष्ट भाषण, उदात्त विचार, आणि अनेक प्रसंगी त्यानी दाखविलेलें धैर्य आणि नीतिमत्ता, किंबहुना एकंदर संविधानकाचे गाभीर्य आणि लौकिक अथवा व्यावहारिक महत्त्व या सर्व बाबतीत महाभारताचा नंबर जगातील सर्व आर्ष-महाकाव्यात नि:संशय पहिला लागल्याखेरीज राहणार नाही. पाश्चिमात्य * एपिक ' काव्याचा स्पष्ट हेतु शीलचारित्र्यवर्धक नसतो, असा सदर काव्यात आणि महाभारतात असलेला जेो भद रा. वैद्य यानीं या भागाच्या अखेरीस दाखविला आहे, तोही सवीनीं-विशेषतः भरतभूमीतील लोकानीं--लक्षात ठेवण्यासारखा आहे. नल, राम, युधिष्ठिरांचीं चरित्रे गाऊन किंवा ऐकून आपण क्षणभर करमणूक करून घ्यावी असा सदर काव्यें करणारांचा उद्देश नाहीं. देशांतील पुरुष आणि स्त्रिया याचे आचार-विचार व वर्तन यांवर अशा पुरुषांच्या चरित्रांचा परिणाम झाला पाहिजे; आणि तो जर न होईल तर महाकाव्य करणाराचे व ऐकणाराचे श्रम फुकट होत. भारत-सावित्रींतील जो लोक या भागाच्या अखेरीस रा. वैद्य यानी दिला आहे तोच आम्ही येथे घेतों; महाभारत संपूर्ण करून व्यास म्हणतात: उर्ध्व बाहुर्विरौम्येषः न च कश्चित् शृणेति मा । धर्मादर्थश्च कामश्च स धर्मः किं न सेव्यते । अशा प्रकारचे उद्गार जगांतील कोणत्याही आर्ष-काव्याच्या अखेरीस सापडत नाहीत. भारत-सावित्रीचे चार लोक रोजच्या प्रात:स्मरणात म्हणण्याची जी पुरातन वहिवाट आहे तिचे महत्त्व यावरून लक्षात येईल. सारांश, केवळ ** आर्ष-महाकाव्य ’ किंवा * एपिक ' काव्य या नात्यानें महाभारत सर्व काव्यात श्रेष्ठ आहे. इतकेच नव्हे तर आचार, व्यवहार, राजनीति, धर्म, अध्यात्म, प्राचीन ५६