पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/462

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. g\9 नरकांत राज्य करणें बरें ? अशा प्रकारचे जें कांहीं उद्दाम उद्गार कवीनें घातले आहेत त्यामुळे वाचकांची मनोवृत्ति क्षणभर तरी या प्रतिपक्षाच्या बाजूची होऊन त्याच्या पराजयाबद्दल वाचकास थोडाबहुत तरी खेद वाटतो. महाभारतात आर्षमहाकाव्याचा हा गुण रामायणापेक्षाहीं चागला साधला आहे. दुर्योधनाचे पांडवाशीं वैर होतें खरे; पण त्याने आपलें राज्य चागल्या रीतीने चालविले होतें व पुष्कळ प्रसंगी त्याच्या तोंडी अभिमानाची व आवशाची जीं भाषणें घातलाँ आहेत ती ऐकून त्याच्याबद्दल वाचकाचे मनात एकप्रकारची सहानुभूति उत्पन्न होते. यासंबंधानें रा. वैद्य यानी दिलेले उदाहरण फारच मार्मिक आहे. भीमाने गदायुद्धाचे नियम मोडून माडीवर प्रहार केल्यामुळे दुर्योधन रणभूमींवर पडला असता त्याची निर्भत्र्सना करून भीम श्रीकृष्ण जेव्हा त्यास टॅौचून बोलू लागले, आणि पापकर्मकारी तूं आपल्या कर्माची फळ भेोगतो आहेस असे म्हणाल तेव्हा दुर्योधनानें त्यास दिलेले उत्तर फारच बाणेदार आणि बहारीचे आहे. दुयोंधन म्हणतेो:-- अधीर्त विधिवद्दत्त भूः प्रशास्ता ससागरा । मूर्धिने स्थितममित्राणां केोऽनु स्वततरेो मया । 领、 ് यदिष्ट क्षत्रबधूना स्वधर्ममनुपश्यताम् । तदिदं निधनं प्राप्तं कोऽनु स्वततरो मया । देवाह मानुषा भोगा प्राप्ता असुलभा नृपैः । ऐश्वर्ये चोत्तम प्राप्तं कोऽनु स्वततं मया । ससुहृत्सानुजधैव स्वर्ग गन्ताहमच्युत । यूयं विहृतसंकल्पा शेोचंतो वर्तयिष्यथ ॥ दुर्योधनाचे वरील उद्गार ऐकून सिद्ध गंधवांनी त्याचे धन्यवाद गाइले आणि आकाशातून त्याजवर पुष्पवृष्टि झाली व श्रीकृष्णासही लाज वाटली असे पुढे महाभारतातच वर्णन आहे. यावरून दुर्योधनाचे हे उतर व्यासाच्या मतेही तारीफ करण्यासारखे होते हे उघड आहे. रा. वैद्य म्हणतात की, यावरून जैमिनीचे भारतांत पाडवापेक्षा कौरवाचीच अधिक प्रशंसा होती, अशी जी आख्यायिका आहे, ती संभवनीय दिसते. वरील दुर्योधनाच्या उक्तीस भीमाचे उत्तर या अध्यायात नाहीं; पण एकदोन अध्यायापूर्वी दिलेले आहे. धृतराष्ट्र पुत्रांच्या अपराधाचा उल्लेख करून, भीम म्हणतोः

  • ते नो हृता: सगणाः सानुबंधा: । काम स्वर्गे नरकं वा पताम: ॥ ' म्हणजे “ वैन्याचे निर्दलन करणे हें आमचे काम होते ते आम्हीं केले, आता वाटेल तर आम्ही स्वर्गात जाऊं किंवा नरकात पडू !” महाभारतात ठिकठिकाणी नाथक किंवा प्रतिनायक याच्या भाषणातून अशाच प्रकारचे उद्दाम, स्पष्ट आणि अभिमानाचे उद्भार घातलेले आहेत. परशराम आणि भीष्म याच्या युद्धाच्या आरंभीं परशरामानें २१ वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी केल्याचा उल्लेख करून