Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/461

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४६
लो० टिळकांचे केसरीतील लेख.

कसा करावा याचाही अशा प्रकारच्या महाकाव्यापासून राष्ट्रांतील लोकांस बोध होतो. आर्षकाव्य इतिहासप्रधान असावें, केवळ काल्पनिक नको असें लक्षण करण्याचा हेतुही हाच होय. साधारण महाकाव्यांत हा गुण नसतो; व म्हणूनच आर्ष महाकाव्याचे लक्षण पुरं होण्यास आमच्या मते अशा प्रकारच्या काव्याचा जो हा महत्त्वाचा शिक्षणात्मक भाग आहे, त्याचा सदर लक्षणात अवश्य समा वेश झाला पाहिजे. काव्यांतील वृत्ते किंवा वृत्त कानास गोड लागणारे आणि रसास अनुकूल असावें, याचाही जर 'एपिक' काव्याचे लक्षणात आर्नल्ड- साहेबांनी उल्लेख केला आहे तर सदर काव्य सूक्ष्मार्थन्यायाने युक्त, संसारांतील अनेक प्रसंगाचे द्योतक आणि पावन लोकयात्राक्रमाचे प्रतिपादक असावे या गोष्टींचाही त्यात का समावेश होऊ नये हे आम्हास समजत नाही. पाश्चिमात्य महाकाव्यांत हे गुण पूर्णपणे नसले तर त्यामुळे महाभारताची योग्यता कमी न होता अधिक वाढते, हे आम्हीं लक्षात ठेवले पाहिजे.
 में आई महाकाव्याचे लक्षण झालें. महाभारतास हे लक्षण पूर्णपणे लागू पडतें हें आम्ही सागावयास नकोच; कारण व्यासांच्याच शब्दांनी हैं लक्षण आम्हीं बावलें आहे. तथापि आर्नोल्डसाहेबांच्या इंग्रजीलक्षणाप्रमाणे भारतात 'एपिक' काव्याचे सर्व गुण आहेत, असे जे रा. वैद्य यानीं प्रति- पादन केले आहे त्यासंबधाने दोन शब्द लिहिणे जरूर आहे. आमच्यामतें रा. वैद्याचे हैं प्रतिपादन उत्तम साधले असून सर्वांनीं तें एकवार वाचण्यासारखे आहे. सुमारे दोन वर्षापूर्वी रा. व. वैद्य यानी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत जै व्याख्यान दिले होते, त्याचा हाच विषय असून त्याचा साराशही त्या वेळीं केसरीत प्रसिद्ध झाला होता. आर्नोल्डसाहेब म्हणतात कीं, आर्ष महाकाव्याच्या कथानकातील गोष्ट महत्त्वाची, गहन आणि एकार्थसंगत असली पाहिजे मार- ती युद्ध, कीं ज्यांत हिंदुस्थानातील त्या वेळच्या बहुतेक राजानी कोणत्या तरी पक्षास मिळून आपली करामत दाखविली, त्यापेक्षा अधिक महार्थक व काव्यों- पजीवि विषय दुसरा कोणता सापडणार ? 'अनाश्रित्येदमाख्यानं कथा भुवि न विद्यते ' असे जे सौतिने या महाकाव्याच्या कथानकाचद्दल म्हटले आहे, तें अगदी यथार्थ आहे. प्रधान पुरुषाच्या शीलवैचित्र्याबद्दल तर महाभारताचे हात धरणारे दुसरें काव्य क्वचितच सांपडेल. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, कृष्ण, द्रौपदी, द्रोण, भीष्म याच्या स्वभावाची व गुणाची चित्रे इतकी सुरेख वठलीं आहेत कीं, ही पात्रे महाभारत वाचणाऱ्या किंवा श्रवण करणाऱ्यांच्या डोळ्यापुढे मूर्तिमंत उभी राहातात. महाकाव्यातील प्रतिनायक किंवा त्याचे साथीदार मुख्य नायका- हून कमी दर्जाचे असले तरी एकंदरीत त्याच्या तोडीचेच असल्याखेरीज काव्यां- तील कथानकास जितके उदात्त रूप यावें तितकें येत नाहीं, असा साहित्य शास्त्राचा सिध्दान्त आहे. मिल्टनच्या ' पाराडाईज लॉस्ट' काव्यांत सैतान हा ईश्वराचा प्रतिस्पर्धी खरा, पण त्याचे तोंडीं ' स्वर्गात दास्यत्व करण्यापेक्षा