पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/460

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ??い विचित्रार्थ पदाख्यार्न सूक्ष्मार्थ न्यायबृहतम्। रोमहर्षणकृत् काव्यमनकसमयान्वितम् । मह्ाकाव्य वरिष्ठम् तन्मह्ार्थ चार्घ संज्ञितम् । या लक्षणात आणि आनंौल्डसाहेबाच्या लक्षणात पुष्कळ फरक आहे हे वाचकाच्या सहज लक्षांत येईल. रघुवंशादिक महाकाव्यें आणि * एपिक * महाकाव्ये याच्या कत्यांमध्ये च प्रथमत: भेद असतो: व तो * आर्ष? या पदार्ने फार चागला दाखविला जातो. महाकाव्याचा कर्ता ऋषि म्हटला म्हणजे त्यासंबधाने एकप्रकारची पूज्यबुद्धि उत्पन्न होते. काव्याच्या नायकासबंधानेही असाच प्रकार आहे. काव्यातील नायक केवळ मोठ्या वशाचे व धीरोदत्त असून त्याचे चरित्र लोकांत शील व चरित्र याचे वर्धन करणारे असले पाहिजे. रा. वैद्य यानीं * एपिक ' काव्याच्या इंग्रजी लक्षणांतील हा दोष अखेरीस दाखविला आहे. * एपिक ’ काव्यात नैतिक तत्त्व कांहीं नसतें; परंतु महाभारताची तशी स्थिती नाही, असे भारताच्या अखेरीस * भारत सावित्री ' म्हणून जे चार छोक आहेत, त्यावरून स्पष्ट होतें, असें मोठया मार्मिक रीतीने रा. वैद्य यांनीं प्रतिपादन केले आहे. * आर्ष ’ काव्य जर देशातील सामान्य लोकाच्या अंगीं शौर्य, धर्म, अभिमान, उत्साह किंवा सत्यनिष्ठा यांची जागृति करणार नाही, तर त्या काव्याची योग्यता आज लोक मानतात तितकी कधीही मानली जाणार नाहीं. वरील लक्षणात * शीलचारित्र्य वर्धनं ’ असें ज पद आहे, ते आमच्या पदरचे नाही; तर खुद्द व्यासानीच आपल्या भारतास * शीलवर्धन ’ असे एके ठिकाणीं म्हटल आहे, व त्यावरून तें आम्ही घेतलेले आहे. पाश्चिमात्य लोकांच्या आर्षमहाकाव्यात उपाख्यानाच्या रूपान अद्भुत जुन्या कथाचा सग्रह केलेला नसतो. महाभारतात तसा सग्रह आहे म्हणून महाभारतास वरील लक्षणाचा हा भाग जितका लागू पडतो, तितका पाश्चिमात्य आर्षमहाकाव्यास लागू पडणार नाही हे खर आहे. पण आर्षमहाकाव्याचे आम्ही जे लक्षण बाधावयाचे तें प्रथमत: आमच्या महाकाव्यास लागू पडेल असेच असले पाहिजे. वरील लक्षणांतील शवटच्या चार ओळी तर फार महत्त्वाच्या आहेत. व व्यासांचे महाभारत आाण होमरचे ईलियड़ यांजमध्यें भद कोणता, हे त्यावरून चागले होते. या चार ओळीत * लोकयात्राक्रम ', * सूक्ष्मार्थन्याय ' ' अनेकसमयान्वत ’ आणि * महार्थ ' अशी जीं पदे आहेत, ती आम्ही नवीं योजलेली नसून व्यासाच्या महाभारतांतीलच आहेत. प्राचीन थोर पुरुषांचे चरित्र ज्यांत वर्णन केलेले आहे तें काव्य वाचल्यानें वाचकाचे शील व चरित्र वाढते, इतर्केच नव्हे तर काव्यातील थेोर पुरुषांवर संसारात जेव्हां अनेक त-हेचे प्रसंग ( समय ) येतात तेव्हा ते वर्तन कसें करितात हे ऐकून सामान्य लोकानीं आपला लेोकयात्राक्रमही शुद्ध कसा ठेवावा, हें त्यास कळून येते. त्याचप्रमाणे कोणतेही कर्म नीतिदृष्टया शुद्ध कीं अशुद्ध याचा निर्णय करण्याची संसारात जेव्हां वेळ येते तेव्हा निर्णय 苓