पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/459

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

፵ 8 ? लो० टिळकांचे केसरींतील लेख.

    • ज्यांतील विषय, महार्थ, गहन आणि एकार्थसंगत असतो व ज्यांतील प्रधान पात्रे अत्युच्च कुळांत जन्मलेली असून धीरोदात्त असतात; व कथेतील वस्तु रसानुकूल आणि श्रुतिसुख वृत्तांत कोठे संभाषणानें तर कोठे आख्यानरूपोन आणि कोठे आत्मगत भाषणाने सागितलेली असते, तें आर्षमहाकाव्य होय.” असें आर्ष महाकाव्याचे लक्षण बाधले आहे. आमच्या मतें हें लक्षण महाभारतास किंवा रामायणास लावण्यापूर्वी त्यांत बरीच सुधारणा केली पाहिजे. प्राचीन थेोर ऐतिहासिक कुळांतील विभूतिमत् महात्म्यांचे धरोदात्त चरित्र ज्यांत सरस रीतीनें कथन केले आहे, एवढेच लक्षण दिल्यानें महाभारत ग्रंथाची योग्यता मोजली जात नाहीं किंवा त्या ग्रंथाच्या समग्र स्वरूपाचे वर्णनही होत नाहीं. रा. वैद्य म्हणतात त्याप्रमाणें उपाख्यानें महाभारतांतून काढून नुसतें भारती युद्धाचे कथानक शिल्लक ठेवले तर आर्नोल्ड साहेबांनी वर दिलेले लक्षण त्यास लागू पडेल. पण महाभारताच्या उपाख्यानांतील भाग आणि भारतीय युद्धकथा यांच्या सध्यांच्या ग्रंथांत इतका एक जीव होऊन गेला आहे कीं, उपाख्यानें काढून नुसत्या भारतीय युद्धकथेचे महाकाव्य या दृष्टीनें परीक्षण करणे कोणासही प्रशस्त दिसणार नाहीं. पाश्चिमात्य * एपिक ? काव्याची आणि महाभारताची किंवा रामायणाची केवळ तुलना करावयाची असेल तर वरील आनौल्ड साहेबांचे * एपिक ? काव्याचे लक्षण स्वीकारल्यास चालेल; व रा. वैद्य यांनी त्याच हेतूनें तें स्वीकारलें असार्वे असे आम्हांस वाटतें. तथापि, महाभारताचे काव्य या नात्यानेंही खरें स्वरूप लक्षात येण्यास आर्ष महाकाव्याच्या आनॉल्ड साहेबांच्या लक्षणांपेक्षा अधिक व्यापक लक्षण आम्हांस बांधले पाहिजे. अामच्या साहित्यकारांनीं तर हैं लक्षण दिलेले नाहीं; तेव्हा अर्थातच नवीन लक्षण तयार केले पाहिजे. तथापि खुद्द व्यासांनींच महाभारतांत आपल्या ग्रंथाचे ठिकठिकाणीं जे वर्णन दिले आहे, त्यावरून आर्षमहाकाव्याचे अशा प्रकारचे लक्षण बांधण्यास कोणासही फारशी अडचण पडणार नाहीं. महाभारतांत काय आहे, याचे वर्णन महाभारतकार व्यास याचेपक्षा अधिक चांगले कोण देणार ? यास्तव व्यासांचाच आधार घेऊन व इंग्रजी साहित्य शास्त्रांतील आर्ष महाकाव्याची व्याख्या लक्षांत ठेवून आम्ही बहुतेक महाभारतांतील शब्दांनीच आर्ष महाकाव्याचे खालीं दिल्याप्रमाणें लक्षण बांधती:

महृत्सु राजवंशेषु जातानां दिव्य कर्मणाम् । श्री विभूतिमतां वाऽपि प्राचीनानां महात्मनाम् । चरितं कीर्त्यते यत्र पुण्यमकार्थे संगतम् । इतिहास प्रधानार्थ शीलचारित्र्य वर्धनम् ॥ धीरोदात्ते च गह्नं श्रव्यैर्वृतैरलंकृतम्। वाक्यजाति विशेषैश्च रसेोत्कर्ष प्रपोषकैः ॥ अद्भुतार्थाः कथाः यत्र धर्मकामार्थे संश्रिताः । लोकयात्राक्रमश्चापि पावन: प्रतिपाद्यते ॥