पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/458

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ४ ४ ३ आहेत; व त्यांत * रसात्मक काव्यं ’ अशी काव्याची व्याख्या देऊन दृश्य, श्रव्य, वाच्य, व्यंग असे काव्याचे अनेक भद करून काव्यदोष कोणते आणि काव्यगुण केोणते, रस किती प्रकारचे, वगैरेही पुष्कळ विस्तार आहे. परंतु इंग्रजीतु ज्यास * एपिक पोएम ’ म्हणतात, ज्याचे भाषांतर आर्ष-महाकाव्य ’ या शब्दानीं आम्ही केले आहे, त्याचे स्वरूप काय, कालिदासादि प्रणीत महाकाव्यापासून तें कसें ओळखावें, याबद्दल साहित्यशास्त्रावरील ग्रंथांतून कोटेंही फारसा विचार केलेला दिसत नाहीं. साहित्यदर्पणाच्या सहाव्या परिच्छेदांतः-- सर्गबंधेो महाकाव्यं तत्रैकी नायक: सुरः । सद्वंशः क्षत्रियो वापि धीरोदात्त गुणान्वितः । एकवंश भवाभूपाः कुलजा बह्वोऽपि वा । बृंगारवीरशातानामेकोऽङ्गी रस इष्यते ॥ अंगानि सर्वेऽपि रसाः सर्वे नाटकसंघयः । इतिह्रासेIभवं वृत्तमन्यद्वा सज्जनाश्रयम् ॥ इ ० याप्रमाणे महाकाव्याची व्याख्या दिली आहे; व पुढे सदर काव्यांत सकाळ, सायंकाळ, ऋतु, मृगया, वगैरेचे वर्णन असावे असें सागितले आहे. पण हैं लक्षण रघुवंश, शिशुपालवध, किंवा नैषध इत्यादि काव्यासच अनुलक्षून असल्यामुळे महाभारत किंवा रामायण यासारख्या आर्षमहाकाव्याचे स्वरूप त्यानें चागलें व्यक्त होत नाहीं. महाभारतादि काव्य व रघुवंशादि काव्य यांमध्यें “ अस्मिनार्षे पुन: सर्गा भवन्त्याख्यान संज्ञका: ” एवढाच काय तो भेद दिला आहे. परंतु हा भद अगदीं क्षुल्लक आहे. रघुवंश, कुमारसंभव, शिशुपालवध, किरातार्जुनीय, किंवा नैपध याच्यामध्ये आणि आर्षमहाकाव्यामध्यें जमीनअस्मानाचे अंतर आहे; आणि ते एकातील प्रकरणास सर्ग म्हणतात व दुस-यातील प्रकरणास आख्यान म्हणतात, असला किरकोळ भेद दाखवून व्यक्त करणे अशक्य आहे. साहित्यशास्त्रावरील आमच्या ग्रंथकारास महाभारतादि ग्रंथाची योग्यता समजत नव्हती असें आमचे म्हणणें नाहीं; परंतु हीं ऋषिप्रणीत महाकाव्यें साहित्यशास्त्रांवरील ग्रंथकाराच्या अधिकाराबाहेरचीं आहेत, अशी त्याची समजूत असावी. कसेही असो; शंकडो अलंकारामधील सूक्ष्म भदांची नैय्यायिकरीतीनें ज्या साहित्यग्रंथात चर्चा केलेली सापडते, त्यात * आर्षमहाकाव्या 'च्या लक्षणाबद्दल फारसा ऊहापोह कोठे आढळत नाही, हे खरे आहे.इंग्रजी वाङग्नयातील साहित्यशास्रांवरील ग्रंथात ही उणीव भरून काढलेली आहे; आणि आर्षमहाकाव्य या नात्यानें महाभारताचे जें परीक्षण रा. ब. वैद्य यानीं केले आहे त्यास आधारभूत म्हणून सदर काव्याचे लक्षण इंग्रजी साहित्यकाराच्या ग्रंथांवरूनच त्यास ध्यार्वे लागले आहे. होमरचे‘ ईलियड ’ हें पाश्चिमात्य राष्ट्रातील पहिलें * आर्ष महाकाव्य ’ होय; व ऑरिस्टॉटलपासून ती आजपर्यंत अशा प्रकारच्या महाकाव्याच्या लक्षणांचा उहापेाइ होऊन साहित्यशास्रश आनॉल्ड यानें