पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/450

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ४३५ क्षण आमच्यापैकी कोणीं तरी पुनः करावयास पाहिजे होतें. अशा परीक्षणानें ग्रंथाच्या महत्त्वाची हानि होईल अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. जगन्नाथाच्या मूर्तीवर किंवा रणजितसिंगाच्या मुकुटांत केोहिनूर हिरा जितका देदीप्यमान दिसत होता, तितकाच आज तो एडवर्ड बादशहाच्या मुकुटात विराजमान होत आह.महाभारताची गोष्ट अशाच प्रकारची आहे. त्यांतील कथानकाचे, आख्यानांचे, विषयाच आणि इतिहासाचे महत्त्व सदर ग्रंथ नव्या कसोटास लावण्यानें कमी होईल अशी आम्हास बिलकूल भीतेि वाटत नाहीं. व्यासांनीं जी ही देणगी आम्हांस देऊन ठेविली आहे ती चिरकाल टिकणारी आहे; आम्हीं मात्र त्या देणगीचे स्वरूप न विसरतां तिचा उपयेाग करून घेतला पाहिजे. सारांश, महाभारतासारख्या राष्ट्रीय ग्रंथावर पाश्चिमात्यांचे जें कांहीं आक्षप असतील किंवा शंका असतील त्यांचे समाधान करून या ग्रंथाचे खरें स्वरूप आमच्या लोकांपुढे मांडणें हें काम आमचे आम्हींच केले पाहिजे. रावबहादूर चिंतामण विनायक वैद्य यांनीं हल्लीं जेा ग्रंथ लिहिला आहे हा अशाच प्रकारचा आहे; व म्हणूनच त्याजबद्दल आम्हीं त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. महाभारत ग्रंथाचे अध्ययन इंग्रजी शिकणा-या विद्याथ्यांकडून व्हार्वे म्हणून आनीबिझांटबाईंनीं हिंदु कॉलेजातील विद्याथ्यांकरितां भारतातील कथा संक्षिप्त रीतीनें इग्रजीत प्रसिद्ध केलेली आहे. परंतु या ग्रंथांत महाभारताचे काव्य या नात्यानें परीक्षण किंवा ल्यासन, वेबर वगर पाश्चिमात्य ग्रथकाराचे खेडन नसून विद्याथ्यांकरितां केवळ कथाभागच मनोवेधक रीतीनें दिला आहे. रावबहादुर यांचा ग्रंथ जरी बिझांट बाईंच्या ग्रंथाएवढा असला तरी त्यांत महाभारताचें निरनिराळ्या दृष्टीनें परीक्षण केलेले आहे. महाभारत यास आर्ष महाकाव्य कां म्हणावें, आर्ष महाकाव्याचे लक्षण काय,त्यांत जे गुण असावयास पाहिजत ते महाभारतांत आहेत कीं नाहीं,महाभारताची ग्रंथरचना कशी झाली म्हणजे एकट्यार्ने हा ग्रथ लिहिला किंवा निरनिराळ्या ग्रंथकारांनीं मूळच्या भारतात उपाख्याने ढकलून त्याचे महाभारत केल, ह्या गोष्टी केव्हा घडल्या, पांडव हे ऐतिहासिक पुरुष होते किंवा नाहीं, ग्रंथाचा काल कोणचा, युद्धाचा काल कोणचा वगैरे प्रश्नांचा रावबहादुर वैद्य यांनी आपल्या ग्रंथांत थोडक्यांत पण व्यवस्थित विचार केलेला आहे. इतकेंच नव्हे तर आपल्या पुस्तकाच्या उत्तरार्धात त्यांनीं भारतीय कथेचा जो संक्षिप्त इतिहास दिला आहे तोही अत्यंत सरस आणि चटकदार लिहिला गेला आहे. भारतांतील विस्तीर्ण कथेचा अशा सरस रीतीनें संक्षेप करणें हें काम कांहीं कमी परिश्रमाचे किंवा विद्वतेचे आहे असें नाहीं. कथेमध्यें सरस वस्तु कोणती हें समजण्यास संक्षपकाराच्या अगीं एक प्रकारची विशिष्ट रसज्ञता किंवा मार्मिकता लागत असते व ती रावबहादूर वैद्य यांच्या अंगीं पूर्णपणे आहे असे त्यांच्या हल्लीच्या ग्रंथावरून व त्यांनी केलेल्या संक्षिप्त भारतावरून स्पष्ट दिसून येतें, व ह्याचकरितां तरुण पिढीतील विद्याथ्यांनीं रावबहादूर वैद्य ह्यांचे हे ग्रंथ अवश्य वाचावे अशी आमची शिफारस आहे. लक्ष