पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/449

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३४ लो० टिळकांचे केसरींतील लैख. कथेतील पुरुष भरतभूमीत केव्हां अवतीर्ण झाले,इत्यादि गोष्टींचे पद्धतशीर विवेचन कोणींच केलेले नव्हतें. संस्कृत वाङ्मयाचा इतिहास लिहिणारे युरोपियन ग्रंथकार, म्याक्समुलर, वेबर, मॅकडोनल यानीं आपल्या ग्रंथांत महाभारताचा काळ, त्याची रचना, त्यांत सागितलेली राजकीय व सामाजिक स्थिति, आणि त्यांतील इतिहास यासंबंधानें अनेक विचार नमूद केलेले आहेत. पण संस्कृत वाङ्मयातील सर्व ग्रंथांचे, म्हणजे वेदापासून तों तहत पुराणें, शाखें, काव्यें, नाटकें, इत्यादि सर्व ग्रंथाचे सामान्यरीत्या पर्यालोचन करण्याची या ग्रंथकारांची उमेद असल्यामुळे त्यांनी महाभारतासंबंधानें जे विचार प्रगट केले आहेत ते भारत साग्र वाचून केलेले नसून केवळ त्याचें वरवर अवलोकन केल्यानें ज्या गोष्टी नजरेस आल्या तेवढ्यावरून केलेले आहेत. उदाहरणार्थ, कित्येकाची पहिल्यानें अशी समजूत झाली होती कीं, महाभारत हा ग्रंथ खिस्ती शकाच्या पाचव्या सहाव्या शतकात झाला असावा; निदान त्याला महाभारत हैं स्वरूप तरी या सुमारास मिळालें असावे. पण अलीकडे सापडलेल्या शिलालेखामुळे आणि जावा बेटात उपलब्ध झालेल्या महाभारताच्या भाषातरामुळे अशा प्रकारच्या स्वैर विचारास हल्लीं बराच आळा पडत चालला आहे. प्रो. ल्थासन यानीं तर असें मत काढले होतें कीं, ज्या अर्थी शतपथ ब्राह्मणात किंवा तात्कालीन इतर ग्रंथांत जनमेजयाचा उल्लेख सापडतो आणि युधिष्ठिरादिकाचा सांपडत नाहीं त्या अर्थी कौरवपाडव हे ऐतिहासिक पुरुष नसून याची कथा कोणी तरी काल्पनिक रचून त्यावर महाभारत हें महाकाव्य पुढे केलें असावें ! दुसरा एक विद्वान् असे म्हणतो की, भारतीय युद्ध कौरव व पाडव याच्यात झालेले नसून कुरु आणि पाचाल देशातील राजे यांच्यामध्ये झाले आणि त्यांत पांचाल देशांतील सेनेचे नायकत्व मात्र पांडवाकडे हातें. अशा प्रकारें या ग्रंथासंबंधानें एक ना दोन अनेक कल्पना पाश्चिमात्य विद्वानांनीं काढलल्या आहेत. या खन्या किंवा खोट्या, खया असल्यास त्यांत सत्याश किती, आणि खोट्या असल्यास त्या खोट्या कशा याचे अलीकडे उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक साधनानी सशास्रपरीक्षण करून आमच्या देशातील राष्ट्रीय महाग्रंथाचे खरें स्वरूप लोकांपुढे माडणे किंवा खन्या स्वरूपाचा विपर्यास होत असल्यास त्याचे निरसन करून शुद्ध स्वरूप लेोकाच्या निदर्शनास आणून देणें हें देशातील सुशिक्षित पुरुषांचे कर्तव्य होय. पाश्चिमात्य विद्वानांनीं यासंबंधानें कितीही लिहिलें तरी आपल्या ग्रंथांचा आम्हीं होऊनच स्वतंत्रपणे विचार केल्याखेरीज त्यांतील तथ्य आम्हास समजावयाचे नाहीं. महाभारताचा आजपर्यंत कोणींच विचार केला नाहीं असें नाहीं. वर सांगितलेंच आहे कीं, हा ग्रंथ निर्माण झाल्यापासून आतांपर्यंत हिंदुस्थानांतील कवि, धर्मशास्री, विद्वान् किंवा सामान्य जन या सर्वांचे या ग्रथाकडे लक्ष लागलेले आहे. परंतु पाश्चिमात्य शिक्षणार्ने किंवा शेोधांनीं जी एक विचक्षणता प्राप्त होते त्या विचक्षणनेनें या ग्रंथाचे परी