पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/447

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३२ लो ० टिळकांचे केसरींतील लेख. योजावा हा विचार आज सुचण्याचे कारण ग्वालेर संस्थानचे चीफ जज रावबहादुर चिंतामण विनायक वैद्य, एम्. ए., एलूएल्. बी. यांनीं नुकतेंच प्रसिद्ध à èề “ Mahabharata a criticism ” fŁąI HĘTHRātă qĝ8HTI È पुस्तक होय, ही गोष्ट सर्व प्रसिद्ध आहे. ज्यानै महाभारत ऐकिलें नाहीं तो कितीही विद्वान् असला तरी फुकट, असा खुद्द महाभारतांत लोक आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे जे चार पुरुषार्थ आमच्या शास्रकत्यांनी सांगितले आहेत त्या सवांचे विवेचन महाभारतांत आहे. महाभारतांत आहे तें इतर ठिकाणीं आहे, पण महाभारतांत नाहीं तें कोटेंही नाहीं अशी जी व्यासांची प्रतिज्ञा आहे ती शिरोलेखांत नमूद केलेलीच आहे. महाभारत हा ग्रंथ पुण्य आहे, पवित्र आहे, नाना प्रकारच्या प्राचीन अ त कथानीं, ऐतिहासिक गोष्टींनीं, शूर आणि धर्मनिष्ठ पुरुषांच्या चरित्रांनी भरलेला आहे. त्यांत नीति आहे, धर्म आहे व व्यवहारांत प्रत्येक मनुष्यास जे अनेक त-हेचे प्रसंग येतात यांचे त्यात वर्णन असून त्या प्रसंगीं प्रत्येकानें आपलें वर्तन कसें ठेवावें, याचाही सशास्त्र विचार त्यात केला आहे. प्राचीन भूगोल, प्राचीन तत्त्वज्ञान आणि धर्माचे रहस्य हीं सर्व त्वांत प्रसंगानुरोधानें गोविली आहेत. त्यात चातुर्वण्याची हकीगत आहे, समाजव्यवस्था आहे, युद्धकला आहे; किंबहुना * यच्चापि सर्वग वस्तु तच्चापि प्रतिपादितम् ? असें महाभारताचें आरंभींच या ग्रंथाचे वर्णन दिलेले आहे. अशा प्रकारचा सर्वांगसुंदर आणि सर्वोपजीव्य झालेला दुसरा ग्रंथ संस्कृत वाङ्मयांत काय पण इतर देशांच्याही वाङ्मयात आढळत नाही. महाभारत म्हटलें म्हणजे भारतवर्षातील लोकांचे जीवित होय. कारण, आर्य धर्मीतील आचार विचाराचीं सर्व मूलतत्त्वं यांत ग्रथित केलेली आहेत. अशा प्रकारचा ग्रंथ हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागातील सर्व लोकांस प्रिय होऊन त्याची निरानराळ्या प्राकृत भार्षत शेंकडों भाषांतरें झाली असल्यास त्यांत काही नवल नाहीं. हिमालयापासून सेतुबंधापर्यंत निरनिराळ्या प्रातांतील हिंदु लोकाच्या आचारात किंवा विचारात जें कांहीं साम्य आहे तें महाभारत किंवा रामायण या आर्ष-महाकाव्या मुळेच उत्पन्न झाले आहे. व आजमित्तीस जागृत आहे. बंगाल्यांत जा, का३िमरांत जा, किंवा मद्रासेंत जा, रामायण महाभारतातील कथा, उपकथा किंवा आख्यानें हीं लोकांस सारखींच आवडतात, व त्यांच्या श्रवणानें एकसारखेच विचार त्यांच्या मनात उत्पन्न होऊन भरतभूमीच्या राष्ट्रीय ऐक्यत्वाची साक्ष देतात. एकछत्री इंग्रजी राज्य या देशात झाल्यानें निरानराळ्या प्रांतांतील लोकांस आपण एकाच राष्ट्राचे अवयव आहो, अशी नवीन कल्पना येऊं लागली आहे असें कित्येकांचे म्हणणे आहे. राजकीय दृष्टीनें पाहिले तर या म्हणण्यांत बराच अर्थ आहे, नाहीं असें नाहीं. पण वाल्मीकि आणि व्यास या दोन महर्षीनीं आचार, नीति आणि धर्म या बाबतीत भारत वर्षातील लोकांस आपल्या अनुपम महाकाव्यांनीं जें वळण लावून दिले आहे, किंबहुना चारी पुरुषार्था