पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/442

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पचांगशोधन. ४ २७ विद्वान् ज्योतिषांनी हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांत पंचांग शोधनाकरितां आज पंचवीस तीस वर्षे जरी प्रयत्न केले होते तरी देशांतील लेाकाच्या तत्कालीन स्थितीप्रमाणे हे सर्व प्रयत्न एकदेशीय राहूनं त्याची एकवाक्यता झालेली नव्हती. अशा वेळीं जी मुंबईस पंचांगशोधन कमिटी स्थापन झाली तिचे कर्तव्य दोन प्रकारचे होते. केरोपताच्या कालापासून म्हणजे सुमारे गेल्या चाळीसपन्नास वर्षात ग्रहलाघवासारख्या जुन्या करणग्रंथावरून केलेले पंचाग चुकर्ते अशी सामान्य जनाची सुद्धां आतां खात्री झालेली आहे. हा प्रभाव कालाचा आणि केरोपंत, बापुदवशास्री वगैरे ज्या मोठ्या विद्वानानीं या कार्यास पहिल्यानें सुरुवात केली त्याच्या उद्योगाचा आहे. अर्थात् जुन्या करणग्रंथात दुरुस्ती केली पाहिजे. याबद्दल आता कोणाचाही फारसा मतभेद नाहीं; व एका महाराष्ट्रपुरताच जर विचार करावयाचा असत। तर केतकीसारखा एखादा नवा करणग्रंथ लौकर प्रचारांत आला असता. परंतु मुंबईच्या कमिटीची उमेद याहून जास्त व्यापक आहे. हल्लीच्या दिवसात राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेचा प्रसार अधिक जोराने होत चालला आहे. हिमालयापासून सेतुबधापर्यंत व सिंधुनदापासून ब्रह्मपुत्रा किंवा इरावतीपर्यंत इंग्रजसरकारचा अंमल अबाधित स्थापन झालेला आहे. आणि ह्या बरोबरच या सर्व देशाकरिता एकच दिवाणी किंवा फौजदारी कायदा अथवा पेिनल कोड सरकारनें प्रचारात आणलेले आहे; व देशातील वजर्ने, मार्प, नाणे वगैरेही एक करण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा स्थितीत देशातील सर्व हिंदू लोकाचे पचागही का एक असू नये, असा प्रश्न सहजच उद्भवतो. वास्तविक म्हटलें म्हणजे हा प्रश्न ज्यूलियस सीझरप्रमाणें लॉर्ड कझैनसारख्या व्हाइसरायाने हातात घ्यावयास पाहिजे. परतु आमचे सरकार परकीय पडल्यामुळे आणि पंचांगाचा धमाशी संबंध असल्यामुळे ही गोष्ट कोणाही व्हाइसरायास करितां येत नाहीं; शिवाय: अप्रळि सप्तंबर जून अाणि नोव्हेंबरा नित्य तशीच जाणि । तैसाचि अट्टाविशि फेब्रवारी एकाधिकी तीस दुजें प्रचारीं ॥ हें इंग्रजाचे पंचाग ह्यानी सर्वत्न सुरू केले असल्यामुळे त्यास सर्व हिंदु लोकाचे हिंदुस्थानात एक पंचाग झाले काय आणि न झाले काय सारखेच. पोप ग्रेगरीच्या वेळात युरोपात वर लिहिलेल्या इग्रजी पंचांगात जी सुधारणा झाली, व जी अमलात आणण्याकरिता दहा दिवसाचा एकदम क्षय करावा लागला, तेव्हां लोकानी काही ठिकाणी दंगे व मारामाच्या केल्या, आणि युरोपांतल्या काहीं राष्ट्रानीं तर (विशेषेकरून सुधारलेल्या प्रॉटेस्टंट राष्ट्रांनीं) पुढे कित्येक वर्षे हें पंचांग स्वीकारण्याचे नाकबूल केलें; आणि रशियाने अद्यापही ते घेतलें