पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/441

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२६ लो० ಸ್ಟ್ರ केसरींतील लेख. झाला त्याचा थोडाबहुत खुलासा करून या विषयावरील आमचा लेख आम्ही संपविणार आहॅी. *. * सूर्यचंद्रादिक ग्रहांच्या गतीचे ज्ञान उत्तरोत्तर आधिकाधिक सूक्ष्म होत असतें, व त्यामुळे पंचागातील वर्षमान वेळेोवळी सुधारून घेऊन पंचांग दुरुस्त करणें अवश्य आहे, येवढे शास्रदृष्टया निर्विवाद आहे. परतु याखेरीज पंचाग शोधनाची दुसरीही एक व्यावहारीक बाजू आहे. प्राचीन काळीं हिंदुस्थान म्हणजे छपन्न देशाचे एक मीठे खेडच हेोते असे म्हटले तरी चालेल. अशा स्थितीत निरनिराळ्या प्रांतातील ज्योतिषानीं वेध घेऊन पूर्व ग्रथातल्या ज्या चुका दाखविल्या किंवा दुरुस्त केल्या, त्या फक्त त्या त्या प्रातातच अमलात आल्या आहेत. उदाहरणार्थ, आमच्या इकड ग्रहलाघवावरून पंचाग तयार करतात तर इतर देशात करणप्रकाश, करणकुतूहल वगैरे ग्रंथ प्रमाण धरतात. कै. दीक्षित यांनी असे लिहिले आहे कीं, हल्ली हिंदुस्थानच्या सुमारे पाचषष्टाश भागात साप्रतच्या सूर्यसिद्धान्ताचे वर्पमान घेतात, मारवाडात ब्रह्मपक्षाचे, द्रावीड आणि मलबार यांत आर्यपक्षाचे आणि काश्मिरात मूल सूर्यसिद्धान्ताचे घेतात. निरनिराळ्या प्रांतातील पंचागात तिथीचा वगैरे जो भद पडतो त्याचे कारण हेच होय. आमच्याकडील अर्वाचीन ज्योतिषानीं जुन्या ज्योतिष ग्रंथातील चुका दाखविल्या नाहीत असें नाहीं. आर्यभट्टापासून ती गणेश दैवज्ञाप fत सवींनी आपापल्या परीनें ग्रहृग्रतींचीं माने शुद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे; पण कोणताही एक ग्रंथ सर्व हिंदुस्थान देशभर एकसारखा प्रचारात आलेला दिसत नाही. त्यामुळे हल्लीं जी पंचागसुधारणा करावयाची ती दोन गोष्टीत व्हावयास पाहिजे आहे. पहिली गोष्ट अशी कीं, अलीकडील सुधारलेल्या यंत्राच्या साह्यानं जे सूक्ष्म वेध घेतां येतात, त्यावरून समजलेली ग्रहग्रतीची सूक्ष्म मानें घेऊन पंचाग तयार करावयाचे किंवा नाहीं. दुसरी गोष्ट अशी की, अशा त-हेने पंचाग करावे असें ठरल्यास त्याचा बंगाल, पंजाब, नागपूर, राजपुताना, काशी, गुजराथ, महाराष्ट्र, द्राविड, तेलंगण वगैरे हिंदुस्थानांतील सर्व प्रातात प्रसार होण्यास काय युक्ति करावी. युरोपियन लोकानीं केलेले शोध व वेध इकडील लोकास आज बरीच वर्षे माहीत झालेले आहेत, व काशीचे बापुदेव शास्त्री, मद्रासचे रघुनाथाचार्य किंवा आमच्या पुण्याच केरुनाना यांच्यासारख्या गृहस्थानीं नवीन वेधाचा खरेपणा कित्येक वर्षे स्वत: अनुभवून पाहून त्याप्रमाणें नवीन सुधारलेलीं पंचागें आपापल्या प्रांतात प्रसिद्ध केललीं आहेत. मद्रास इलाख्यांतील तिरूवादीचे सुदरेश्वर श्रीनि आणि काशीचे हल्लींचे महामहोपाध्याय सुधाकरशास्री याचीं अशा रीतीनें केललीं पंचांगेंही हल्ली काहीं ठिकाणीं प्रचारांत आहेत. यापैकी प्रत्येक पंचांगकाराची जुन्या ग्रंथास चालनें देण्यासंबंधाची कल्पना निरनिराळी आहे. सर्वाचा कटाक्ष दृक्-प्रत्ययावर आहे खरा, पण जुन ग्रंथ जमेस धरून दृक्-प्रत्यय कसा साधावा याबद्दल त्यांची मतें मिन्न भिन्न आहेत. सारांश, केरोपंत, बापूदेवशास्री, रघुनाथाचार्य वगैरे महा.