लोकांचे सुधारणेस नेहमीं आया, असे प्राचीन इतिहासावरून आढळून येते. पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते असे प्रतिपादन करणाऱ्या ग्यालिलियोचा ख्रिस्ती भटांनी केलेला छळ सुप्रसिद्धच आहे. पण पचागशोधनासंबंधानें ख्रिस्ती धर्मातील पायांनी जो हटवाद माजविला होता त्याचे एक मासलेवाईक उदाहरण नुकतेच प्रसिद्ध झालेले येथे देतो म्हणजे खिस्ती धर्मशास्त्री किंवा पाद्री यांज- कडूनही पंचांगाचे शोधनास कसे अडथळे आले याची वाचकास कल्पना येईल. खिस्ती धर्माप्रमाणे 'ईस्टर ' हा मण फार महत्त्वाचा आहे. हा सण वास्तविक संपातानंतर पहिली जी पौर्णिमा येते तिच्यापुढे पहिल्या रविवारी पडतो. म्हणजे तो केव्हां येतो हे समजण्यास वासतिक संपाताचे किंवा सूर्यगतीचे, आणि पौर्णिमेचे म्हणजे चंद्रगतीचे सूक्ष्म ज्ञान अवश्य लागते. संपात हा बिंदु आका- शात चल आहे. करिता तत्संबंधी सूर्यगतीचे ज्ञान तर फारच सूक्ष्म असावें लागते. परंतु प्राचीनकालीं हीं मानें सूक्ष्म रीतीने माहीत नव्हती. अशा वेळीं म्हणजे सुमारे इसवी सन तीनशेंपंचवीस साली निशाय येथे भरलेल्या ख्रिस्ती धर्माध्यक्षांच्या सभेने त्या वेळी प्रचलित असलेले चाद्र व सौरमान घेऊन ईस्टर- च्या सणाचे गणित अमुक प्रकारें करावें असे ठरविलें. पायाच्या सभेचा हा निर्णय त्या वेळच्या ज्योतिषाचे ज्ञानाप्रमाणें बरोबर होता; पण पुढे असें आढळून आलें कीं, या पाद्रीसभेने स्वीकारलेले चाद्रमान आणि सौरमान ही दोन्हीही चुकीची आहेत. पाद्रीसभेने स्वीकारलेल्या सौरमानात दरवर्षी सुमारे अकरा मिनिटांची चूक होती. त्यामुळे सुमारे एकशे अट्ठावीस वर्षात एक दिवस या मानानें वसंतसंपात पाद्याच्या सभेने ठरविलेल्या दिवसापूर्वी पडूं लागला; आणि पोर्णिमा ही तीनशे दहा वर्षांनी एक दिवस मांग येऊं लागली. अर्थात् पाद्याच्या सभेने ठरविल्याप्रमाणे गणिताप्रमाणे काढलेला ईस्टर आणि खरा ईस्टर यामध्ये अंतर पडूं लागले; आणि हळू हळू पाद्याच्या गणितावरून आलेली पौर्णिमा आणि खरोखरीची पौर्णिमा यामध्ये इसवी सन बाराशेच्या सुमारास तीन दिवसाचे अंतर पडूं लागलें. म्हणजे गणिताप्रमाणे जी पौर्णिमा यावयाची त्या पूर्वीचे तीन दिवस आकाशांत वास्तविक पौर्णिमा होऊ लागली. अशा रीतीनें पौर्णिमंत फेर पडल्यावर मग ईस्टरच्या सणात फेर पडणारच व पडला. तेव्हां लोक पाद्यास विचारू लागले कीं, " असे का व्हावें ? निशाय येथे पायांच्या सर्भेत ख्रिस्तीधर्मशास्त्राप्रमाणें जो निर्णय झाला तो का चुकावा ? ख्रिस्ती भटास या प्रश्नाचे उत्तर देणे अवश्य होते. निशाय येथील धर्मपरित्र- देच्या निर्णयास दोष देण्याची कोणाही खिस्तीभटाची छाती होईना. तेव्हा एकाने अशी युक्ति काढली कीं, सूर्यचंद्राच्या गतीत जे हे अंतर पडलें आहे हे मनुष्यांच्या पापामुळे पडले आहे; कांहीं वर्षे लोटलीं म्हणजे चंद्रसूर्य शिवाय येथील धर्मसभेच्या आज्ञापत्राप्रमाणे चालूं लागतील ! पण ही कल्पना मास्टर कॉन्रॉड् यास पसंत पडली नाहीं. हे ख्रिस्ति- ""
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/439
Appearance