पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/438

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंचांगशोधन. ४ २३ लोकांची अखेरीस, कांहीं कालाने का होईना, र्फतुं समजूत पटते; आणि ते शुद्ध पंचांगाचा स्वीकार करितात. % परंतु धर्मप्रिय आक्षेपकांची समजूत यांच्याइतकी लवकर पडत नाहीं. याचे कारण उघड आहे. धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्र हीं दोन अगदीं निरनिराळ्या प्रकारचीं शास्ने आहेत. धर्मशास्त्राचे प्रयोजन अदृष्टार्थक तर ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन दृष्टार्थक आहे. आकाशात चंद्राचे किंवा सूर्याचे ग्रहण केव्हा होईल हें ज्योतिषशास्रांत सांगितलें असतें; व गणिताप्रमाणें ग्रहण न दिसल्यास ग्रहण खरै आणि गणित खेोर्ट असे म्हणणे भाग पडतें. कोणी असे म्हणत नाहीं की, माझें गणित वेदोक्त असल्यामुळे खरे आहे, परंतु सूर्यचेद्रांच्या दाडगाईमुळे ग्रहणात चूक झाली आहे. धर्मशास्राची गोष्ट याहून निराळी आहे. ज्योतिष्टोम केला असतां स्वर्गप्राप्ति होते, असें धर्मीत सागितले आहे. पण स्वर्गप्राप्ति डोळ्यानीं दिसणारी नसल्यामुळे ज्योतिष्टोम आणि स्वर्गप्राप्ति यामध्ये गणित आणि ग्रहण यासारखा विरोध येऊं शकत नाहीं. ज्योतिष्टोभानें स्वर्गप्राप्ति होते हैं विधान नेहमीं अबाधित व सत्य असतें. ज्योतिषाची गोष्ट तशी नाहीं. ** प्रत्यक्षं ज्योतिषं शास्त्रं चेद्राकी यत्र साक्षिणी ” असें म्हटले आहे. म्हणजे ज्येोतिषाच्या गणिताची साक्ष प्रत्यक्ष आहे, गणिताप्रमाणें जर सूर्यचंद्र आकाशांत दिसतील तर तें गणित खरै; नाही तर खोटें. साराश, धर्मशास्त्र अदृष्टफलक आहे आणि ज्येोतिषी शास्त्रदृष्टफलक आहे; अर्थीत् धर्मशास्त्री व ज्योतिषी याच्या विचारसरणीची किंवा अनुमानें काढण्याची दिशा नेहमीं भिन्न असावयाची. धर्मशास्री वेदातील वाक्य सर्वस्वी बिनचूक आहे म्हणून म्हणणार आणि ज्योतिपी आपलें शास्र नवीन वेधाप्रमाणे दुरुस्त करण्यास तयार असणार. ज्योतिष आणि धर्मशास्त्र याच्यामधील हा भद पंचांगशोधनाच्या कायांस प्राचीन काळापासून आड येत आला आहे व तसा तो आड येणे स्वाभाविक आहे असे वरील उपपत्तीवरून दिसून येईल. अलीकडे युरोपियन लोकात पंचागाचा उपयेोग धमीकडे फारसा न होतां नौकागमनाकडे विशेष करण्यात येतो.यावरूनच त्याच्या पंचागास**नाटिकल आल्मनाक” असे म्हणतात. परंतु प्राचीन काळीं, किंवा सध्यां हिंदुस्थानातही पंचांगाचा उपयोग धर्मकृत्यॆ किंवा धर्मसंस्कार याचे काल ठरविण्याच्या कामीं करीत असत व करितात. आमच्यामधील लग्न, मुंज वगैरे संस्कार, यज्ञयागादि श्रौतकर्मे आणि व्रतवैकल्यादिक कार्थे काल समजल्याखेरीज करितां येत नाहीत हैं सांगावयास नको, खिस्ती लोकात आणि त्याच्यापूर्वी इजिप्त, खाल्डिया वगैरे देशांत पंचांगाचा असाच उपयोग होत असे. म्हणजे पंचागांत दिलेल्या कालाप्रमाणेच त्या देशातील लोक आपापलीं धर्मकृत्यें करीत. ही धर्मकृत्याची आणि पंचांगाची सांगड नेहमीं वस्तुस्थितीस धरून शुद्ध पाहिजे येवढी गोष्ट सर्वास मान्य असे. पण धर्मशास्रयांस अदृष्टफलकमीमासेची नेहमी संवय असल्यामुळे ते ज्योतिषी