पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/437

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२२ लो० टिळकांचे केसरींतील लेख. आर्यभट ब्रह्मगुप्त, वराहमिहिर, भास्कराचार्य यांनी हीच पद्धत अंगिकारलेली आहे; आणि ज्या ज्या वेळीं जें जें ग्रहादिकांचे गतिमान ज्याच्या ज्याच्या नजरेस आलें तें तें खरें धरून त्यानें पूर्वीच्या ग्रंथात सुधारणा केली आहे. ही सुधारणा कोठे स्वतंत्ररूपाने दिली आहे व कोटें बीजसंस्काराच्या रूपाने सांगितली आहे. बीजसंस्कार म्हणजे प्राचीन एखाद्या सर्वमान्य ग्रंथांतील ग्रहादिकांचीं गतिमानें घेऊन त्यांत अमुक एक भाग उणा किंवा अधिक करण्यास सांगणें हें होय. उदाहरणार्थ, सूर्यसिध्दान्तातलें नाक्षत्र सौर वर्षमान हल्लीं सूक्ष्म वेधानं निघालेल्या वर्षमानापेक्षां आठ पळे आणि काहीं विपळे जास्त आहे. तर हें नर्वे वर्षमान घ्यावे असें एकदम न म्हणतां सूर्यसिध्दान्तातलेंच वर्षमान घ्यावयाचे, पण ह्यास सुमारें आठ पळांचा बीजसंस्कार देऊन घ्यावयाचे असे म्हणण्याचा प्रचार आहे. दोहोंचा अर्थ एकच, पण एकात जी प्राचीन परंपरा दाखविली जाते ती दुस-यांत दाखविली जात नाहीं. वर ज्या चुका दाखविल्या त्या सौरवर्षमानातल्या आहेत, परंतु सूर्याच्या गतीप्रमाणेच चंद्र, बुध, मंगळ, बृहस्पती, शुक्र आणि शनि यांच्या गतीही पूर्वीपेक्षां आतां जास्त सूक्ष्म रीतीनें समजल्या आहेत. अर्थात् पूर्वीच्या ग्रंथांवरून केलल्या या ग्रहासंबंधीं गणितांत आणि हल्लीं च्या वेधावरून ठरलेल्या गतीप्रमाणे केलल्या गणितात चूक येते व येणार, हें उघड आहे. गतिमाने चुकली म्हणजे ग्रहणें, अस्तेोदय, युती वगैरे चुकतात व ज्याकरिता पंचाग करावयाचे तो हेतु वेळेवळीं पंचाग दुरुस्त केल्याखेरीज सिद्धीस जात नाहीं. पंचागशेोधनाचे खरें प्रयोजन हेंच होय; व अशा रीतीनें पंचाग शुद्ध करणे अवश्य आहे असें कोणीही विचारी मनुष्य कबूल करील. परंतु पंचागशेाधन किती जरी युक्तिसिद्ध असले तरी तें नको म्हणणारे जगांत दोन प्रकारचे लोक आहेत. एक पुराणप्रिय आणि दुसरे धर्मप्रिय. पैकी पहिल्यांचे म्हणजे पुराणप्रिय लोकांचे असे म्हणणे आहे कीं, पूर्वीच्या ऋपनिीं किंवा विद्वानानीं सूर्यचेद्रादिकांच्या गतीचीं जी मानें सागितलीं ती चुकली म्हणण्याचा नवीन लोकास अधिकार नाहीं. जुनें काव्य, जुनं पुराण, जुने वैद्यक, जुन ज्योतिषग्रथ, ज्यांनी रचले ते कांहीं वेडे होते काय ? त्यांनी जी गोष्ट लिहिली ती आम्ही कधीहीं खोटी मानावयाचे नाहीं. परंतु हा आग्रह किंवा दुराग्रह फार दिवस टिकत नाहीं. दृष्टीस जी गोष्ट नेहमीं पडणार ती चूक म्हणून काय उपयोग ? ग्रहणें घटका दोन धटका चुकतात असें जर एकसारखें पाचपंचवीस वर्षे प्रत्ययास आलें तर चंद्रसूर्याला दोष न घेतां ज्या ग्रंथांवरून ग्रहणें वर्तवितात त्यांसच दोष देणें अधिक योग्य आहे, अशी हळूहळू खात्री होत जाते; आणि तशी खात्री झाल्यावर जुन्या ग्रंथांस चालन द्या किंवा बीजसेस्कार देऊन दुरुस्त करून घ्या असें सर्व लोक म्हणू लागतात. सारांश, “ पुराणमित्येव न साधु सर्वम्” असें जें कालिदासानें म्हटले आहे, तें हळूहळू लोकांच्या प्रत्ययास येऊन या वर्गातील