पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/435

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

g Ro ली० टिळकांचे केसरींतील लेख. सर्व पक्षाचा सारासार विचार करून आणि मुख्यत्वेंकरून दृक्प्रत्यय जेणेकरून चुकणार नाही अशा धेोरणावर नवीन करणग्रथ करण्याचीं तत्त्वें या निर्णयात दाखल केली आहेत. तथापि, हा निर्णय संस्कृतांत असल्यामुळे त्यापासून हल्लींच्या पंचांगावर काय परिणाम घडेल याचे थोडेसें विवेचन करणें जरूर आहे; व तें आज करण्याचा आमचा विचार आहे. सूर्य, चंद्र आणि ग्रह याच्या गति-मानावरून काल ठरविण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. मनुष्यकृत शक किंवा युर्गे हीं जरी ठिकठिकाणीं प्रचलित असली तरी आकाशांतील ग्रहस्थितीवरून कालाचे मान जितकें निश्चयात्मक निघते तितके मानवी कालविभागावरून निघत नाही. यामुळे कोणत्याही देशाचे प्राचीन किवा अर्वाचीन पचाग घेतले तर तें आकाशांतील चेद्र, सूर्य व ग्रह याच्या स्थितीस धरूनच केलेले असतें असे आढळून येईल. परंतु सूयांची, चेद्राची किंवा दुस-या केोणत्या ग्रहाची नाक्षत्रिक स्थिति काल मोजण्यास साधन घेणें हें सर्वस्वी पंचागकत्र्याच्या इच्छेवर अवलंबून असल्यामुळे पंचागात नेहमी भेद नजरेस येतो. उदाहरणार्थ वर्ष हा शब्द घ्या. सामान्य लोकांचा असा समज आहे की, वर्ष म्हणजे तीनशेंसाठ दिवस. पण हें ठोकळमान झाले. त्यास ज्योतिषशास्त्रात सावनवर्ष म्हणतात. याखेरीज दुसरीं वर्षमाने पुष्कळ आहेत. सूर्य एका नक्षत्रापासून निघून त्याच नक्षत्राजवळ पुनः येण्यास जो काल लागतो त्यासही वर्षच म्हणतात. या वर्षाचे मान वास्तविक तिनशेंपासष्ट दिवस, पंधरा घटिका, बावीस पळे आणि लेपन्न विपळे आहे, व त्यास नाक्षत्र सौरवर्ष म्हणतात. परंतु याखेरीज दुसरें एक सौरवर्ष संपातापासून संपातापर्यंतचे असून संपात मार्गे मार्गे सरत असल्यामुळे त्याचे मान वरच्याहून थेोर्ड कमी आहे. याखेरीज चंद्राचे वर्ष म्हणजे बारा चाद्रमासाचे वर्ष सुमारे तीनशें चौपन्न दिवसाचेच बसतें. तसेच गुरु दरएक राशीस एक एक वर्ष राहतो असें मानून गुरूचे वर्षही काहीं प्रसंगी मानण्याचा प्रघात आहे. या निरनिराळ्या वर्षमानानें मोजणी केली तर कालगणना निरनिराळी होते हें सागावयास नकोच. मुसलमान लोक चाद्रवर्ष मानतात, आम्ही चाद्र व नाक्षत्रसैौर यांचा मेळ घालतों; आणि युरोपियन लोक हल्लींच्या काळात शुद्ध संपातसौर स्वीकारतात. यामुळे प्रत्येकाच्या कालगणनेत थेोडाबहुत फेर पडून ग्रहगति सर्वोनीं एकच मानिली तरी अखेरीस कालाचे निरनिराळ्या रीतीनें केलेलें माप लौकिकांत भिन्न भिन्न दृष्टीत्पत्तीस येते. वर जो भेद सांगितला तो निरनिराळे ग्रहांच्यागती वर्ष मोजण्यास घेतल्यामुळे झाला आहे, सबब तो काढून टाकणें शक्य नाहीं. पृथ्वीवरील सर्व देशातील लोकांनीं एकच प्रकारचे चाद्र किंवा सौर वर्ष घेतलें तरच हा भेद नाहींसा होणार आहे, एरव्हीं नाहीं. व सध्यां आपल्या पुढे ती प्रश्नही नाही.

  • ヘ、, *、

पंचागशोधनाची वेळेोवळी जी आवश्यकता वाटत आली आहे तिचे कारण