पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/434

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंचांगशेोधन. ४ १९ आहे. परंतु मराठी भाषेतील स्वाभाविक व ऐतिहासिक योग्यता आणि इतर भाषेवरील प्रयत्न याचे मानानें त्यांत विशेष दम नाहींसा दिसून येते. दीड दोन कोटी लेोकांच्या जन्मभाषेत हजारापेक्षां ज्यास्ती ग्रंथ होऊं नयेत ही मोठी लाजिरवाणी गोष्ट होय. मुंबई-गुजराथी ज्ञानप्रसारक मंडळी अमदाबादेस गुजराथी सभा, कलकत्त्यास साहित्य सभा वगैरे भाषेकरितां इाटत आहे. व नागरी प्रचारिणी सभेने तर काशीस पन्नास हजारांची इमारत, टीन हॉल, ग्रंथसंग्रहालय तयार करून आतां विज्ञानकोश म्हणून सर्व शास्राचा संपूर्ण हिंदी शब्दसंग्रह बनविण्याचा उपक्रम केला आहे. अशाच प्रकारचा महाराष्ट्र भाषेकरिता प्रयत्न का होऊं नये ? मराठी भाषेची सर्व बाजूनें अभिवृद्धि करण्यास सतत झटणारी अशी एक कायमची संस्था महाराष्ट्रात अवश्य झाली पाहिजे; व त्या सभेस सर्व लोकाचे पाठबळ असून चालकांनीही भाषेच्या सर्व अंगाचे योग्य परिशीलन करण्याकडे लक्ष पुरविलें पाहिजे. सरकारी बुककमिटी क्रमिक पुस्तकात ढवळाढवळ करूं लागतांच डॉ. भालचंद्र याचे दवाखान्यात काहीं शहाण्यानीं जमून नुसता कागदी गोळीबार सुरू करावा, यापेक्षां एखादी महाराष्ट्रीय सभा स्थापन होऊन तिनें महाराष्ट्र भाषेचे पूर्वापार विचारानें संशेोधन करवावें, हे अधिक योग्य होणार नाहीं काय ? मराठी भाषेतील प्राचीन व अर्वाचीन ग्रंथाचा संग्रह करणें, अप्रसिद्ध ग्रंथ प्रकाशित करणें, ऐतिहासिक लेख व कागदपत्र सुरक्षित ठिकाणीं ठेवून क्रमाक्रमानें बाहेर आणणे, महाराष्ट्र कवींची चरित्र मिळवून प्रसिद्ध करणे, मराठी भाषेचा इतिहास करणें, मराठी भाषेचे व्याकरणदृष्टया व व्यावहारिकरीत्या संशेोधन करविणें, आधुनिक ग्रंथकाराना उतजन देणें व जेणैकरून मराठी भाषेची योग्यता वाढेल, तिचा फैलाव होईल व लोकांत तिची अभिरुचि ज्यास्त उत्पन्न होईल, असे सर्व बाजूंनीं प्रयत्न करणें हें या सभेचे मुख्य कर्तव्य असले पाहिजे; व त्याकरितां सभेचे मुख्य स्थान पुणे किंवा मुंबई येथच असणे जरूर आहे. येत्या दिसबर महिन्यात राष्ट्रीय सभेच्या निमित्ताने ठिकठिकाणची पुढारी मंडळी जमतील त्यावेळीं या गोष्टींचा विचार होऊन काहीं व्यवस्था झाल्यास मराठी भाषेच्या भावी अभिवृद्धीचा चांगला पाया घातला असें होईल. www_...

  • पंचांगशोधन

पुराणमित्येव न साधु सवैम् । न चापि काव्यं नवमित्यवद्यम् । -कालिदास, पंचागशेोधनासंबंधानें मुंबई येथे भरलेल्या ज्योतिषाचे सभेत जो निर्णय झाला तो गेल्या अकीं संस्कृतांत प्रसिद्ध केला आहे. हा निर्णय कोणत्या पक्षास अनुकूल व केोणत्या पक्षास प्रतिकूल आहे हें सागत बसण्यांत काहीं हाशील नाहीं.

  • (केसरी, ता. १७ माहे जानेवारी, १९०५).