पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/430

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आमच्या वर्णमालेचा खून. ४ १५ आणि आज हजारों वर्षे चालत आलेल्या वहिवाटीस लांछनास्पद होय. बुककमिटीनें या गोष्टीचा कांहीं विचार केला आहे असें आम्हास वाटत नाहीं; व अद्यापही ते आपला दुराग्रह तसाच कायम ठेवतील तर प्रकरण सरकारापुढे किंबहुना जगांतील सर्व विद्वानांपुढे माडणे आम्हास जरूर पडेल. सरतेशेवटीं महाराष्ट्रांतील लोकासही आमची अशी सूचना आहे की, त्यांनी कमिटींनी सुचविलेली ही खुळी पद्धत अमलांत आणू नये म्हणून विद्याखात्याचे अधिकारी डायरेक्टरसाहेब याजकडे अर्ज पाठवावे. अर्ज मराठीत असले तरी चालतील; परंतु त्यात स्पष्टपणे असा उल्लेख असला पाहिजे कीं, वर्णमालेची जी ढवळाढवळ करण्याचा बुक-कमिटीचा विचार आहे, तो आम्हांस बिलकूल पसंत नाही. विद्याखात्याची योजना आमची भाषा बिघडविण्याकरितां झालेली नाहीं, हें लोकांनीं व विद्याखात्यानें नेहमीं लक्षात ठेविले पाहिजे. हा कांहीं राजकीय विषय नव्हे, की परकीय राज्यकत्यांनीं यात पडावें आज यापेक्षां जास्त कांहीं लिहीत नाही; पुढील प्रकार कसा काय होतो तें पाहून मग जास्त लिहिण्याची जरूर वाटल्यास लिहूं.

  • मराठी भाषेचा उत्कर्ष

सुमारे वीस दिवसापूर्वी लंडन येथील नॅशनल इंडियन असोसिएशनचे दिवाणखान्यात मिस्टर जी. के. बेथम् नावाच्या गृहस्थाने “ महाराष्ट्र सारस्वत ” ह्या विषयावर व्याख्यान दिलें. मिस्टर बेथम् हें येथील जंगलखात्यात नोकरीवर होते, त्या वेळी त्यांनी मराठी भाषेचा बराच अभ्यास केला असावा असे दिसतें. यांच्यासारख्यानी स्वदेशी गेल्यावर आपल्या देशबाधवास मराठी भाषेतील ग्रंथसंग्रहाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करावा, हें खरोखर अभिनंदनीय आहे. व्याख्यानाचे वेळीं येथील माजी कौन्सिलर मिस्टर बर्डवुड अध्यक्ष असून इतर बरीच मंडळी हजर होती. अध्यक्ष व डॉ. पोलन आणि पूर्वी कैलासवासी न्यायमूर्ति रानडे यांचे बरोबर नेहमी असणारे मिस्टर कोलासकर याची साधकबाधक भाषणे झालीं. मराठी भाषा बोलणारे एतद्देशीय गृहस्थ हल्लीं लंडन येथे बरेच असतील परंतु त्यांमध्ये मराठी भाषेवरील व्याख्यानास हजर राहून प्रसंगोपात त्यातील चुका दाखवण्याची तसदी घेणारे राजेश्री कोलासकर हें एक तरी निघाले हें त्यास भूषणावह होय. परदेशांत पाय ठेवताना स्वदेश व स्वभाषा विसरून प्रतिसाहेब बर्नू पाहणा-या सर्व विद्याथ्यांनीं राजश्री कोलासकर याचा कित्ता गिरवण्यासारखा आहे. बेथमसाहेबाचे व्याख्यान किंवा त्यावरील कोलासकर यांची टीका हीं आज आमचे हातीं नसल्यामुळे त्यासंबंधाने काहीं लिहिता येत नाहीं. व्याख्यानानेतर अध्यक्ष

  • (केसरी, तारीख २२-११-१९०४),