पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/429

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ १४ लो० टिळकांचे केसरींतील लेख. विद्येचा पिढ्यान पिढ्या कांहीं संस्कार नाहीं अशाकरतां आहेत; आणि तीहीं सेर्गे ज्या ठिकाणीं शास्रीय पद्धत आहे ती उपटून टाकण्याकरतां केलली नाहीत हैं विद्याखात्यानें पकें लक्षात ठेविले पाहिजे. आधींग शिकवू, मग म शिकवृं, आणि अशा त-हेर्ने सर्व वर्ण शिकल्यावर मग क, ख, ग, घ, ङ हा क्रम सांगू नाही असे नाहीं; असा कदाचित् बुक-कमिटीचा आमच्या म्हणण्यावर आक्षेप निघेल. पण या आक्षेपात काही अर्थ नाहीं. मुलांस वर्णमालेची जी पहिली ओळख व्हावयाची तीच शास्त्रीय पद्धतीनें आज इजारों वर्षे आम्ही करून देत आले आहो. त्यामुळे झोपेंत देखील आमचीं मुलें व्यजनें म्हणू लागल्यास क, ख, ग, घ, ङ, या क्रमानें म्हणतात. ग, म, भ, र, ड, त, ह अशा अव्यवस्थित रीतीने म्हणत नाहीत; मुलांस प्रथमत:च किंबहुना जन्मतःच असें जें शिक्षण मिळतें तें बुडवून टाकून सुधारणेच्या नावावर त्यांना गाढव बनविण्यास आम्ही साफ तयार नाहीं. करता बुक-कमिटीस व विद्याखात्यास आमची आग्रहाची अशी सूचना आहे कीं, त्यानी योजलेली वेडेपणाची सुधारणा सोडून देऊन शाळेत पहिल्यानें विद्याथ्यांकडून वर्णमालेचीं जाँ अक्षरं पाठ करवावयाचीं तीं हल्लींच्या क्रमानेंच करवावी. अशा रीतीनें अक्षरें पाठ झाल्यावर तीं लिहिण्यास शिकविणें तेंही याच क्रमानें इष्ट आहे; तथापि एखाद्या मठ्ठ विद्याथ्याँस ग-च आधीं सोपा वाटत असेल तर शिकवा. पण हा नियम अपवाद आहे. कसेंही असो; वर्णमालेचा क्रम हल्लीं आहे तसाच अगदीं पहिल्या दिवसापासून शिकविला पाहिजे. एरवीं ही शास्त्रीय पद्धत त्याचे हाडीं खिळणार नाहीं. आम्ही म्हणतों हें सयुक्तिक आहे की नाही, याबद्दल जर्मनी, फ्रान्स, अमेरिका इकडील शब्दशास्त्रकोविदास पाहिजे तर खुशाल विचारा. आमची अशी पक्की खात्री आहे कीं, बुक-कमिटीच्या मेबराप्रमाणें ते अद्यापि सौलभ्यवादी झालेले नाहीत; किंवा पूर्वी असल्यास प्रतिशाख्यें, अष्टाध्यायी वगैरे ग्रंथांच्या अध्ययनानें ते शास्त्रवादी झालेले आहेत. यापेक्षा आमच्या वर्णमालेंतील हल्लीच्या क्रमाच्या समर्थनार्थ जास्त काही लिहिण्याची जरूर आहे असें आम्हास वाटत नाहीं. बुक-कमिटीला ही नसती उठाठेव कोणीं सांगितली होती कोण जाणे ? विद्याखात्यास आणि सरकारास आमची अशी विनंति आहे की, त्यानीं हा अव्यापारेषु व्यापार एकदम बंद करावा. हिंदुस्थानात जर कोणत शास्र फार प्राचीन काळापासून पूर्णतेस आले असेल तर ते व्याकरण होय; केमिस्ट्री नाहीं, किंवा पदार्थविज्ञानही नाहीं. या दुस-या दोन शास्रात युरोपियन लोकाचे अग्रेसरत्व आम्ही कबूल करूं; पण व्याकरणाची गोष्ट अशी आहे कीं, युरोपियन लोकांनीं व विद्वानानीं त्यात आमचेच अग्रेसरत्व कबूल केलें आहे. अशा स्थितींत आम्हीं आमच्या वर्णमालेचा खून करून युरोपियन लोकाप्रमाणें अ, ब, क, ड, ई, ( A, B, C, D, E, ) अशी वर्णमालेतील स्वरव्यंजनाची खिचडी करावयास लागावें हें आमच्या अभिमानास, शास्रीय ज्ञानास, परंपरेस